इण्टरेस्टिंग गोष्ट
कधी कधी कुठली गोष्ट कुठे जुळून येईल सांगता येत नाही.
झाले असे की २४ जून ला ऑफिस मधे सहजच चाळता-चाळता एका फोल्डर मधे मागील वर्षाचे काही फोटो सापडले. तारीख होती २५ जून २०१०. नेमका ह्या दिवशी आमच्या मागच्या कंपनीत एच. आर. चा पाठवणी कार्यक्रम होता. त्यावेळी हजर असणार्या सगळ्यांना म्हणजे हेडना फोन लावला कारण आम्ही बहुसंख्य तिथून आधीच कटलो होतो. सगळे एकदम खुश, बोलले की पुन्हा एकदा मागील वर्षी जिथे भेटलो होतो तिथेच भेटूया. थोडीफार फोनफोनि करून जागा ठरवली. डि. एस. ओ. आय. धौला-कुआ, नवी दिल्ली.
तुम्ही मिलीटरी किंवा तत्सम पाठबळचे नसला तर डि.एस.ओ.आय. मधे तुम्हाला प्रवेश नाही.
मिसळपाव