Skip to main content

इण्टरेस्टिंग गोष्ट

लेखक इरसाल यांनी सोमवार, 27/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कुठली गोष्ट कुठे जुळून येईल सांगता येत नाही. झाले असे की २४ जून ला ऑफिस मधे सहजच चाळता-चाळता एका फोल्डर मधे मागील वर्षाचे काही फोटो सापडले. तारीख होती २५ जून २०१०. नेमका ह्या दिवशी आमच्या मागच्या कंपनीत एच. आर. चा पाठवणी कार्यक्रम होता. त्यावेळी हजर असणार्‍या सगळ्यांना म्हणजे हेडना फोन लावला कारण आम्ही बहुसंख्य तिथून आधीच कटलो होतो. सगळे एकदम खुश, बोलले की पुन्हा एकदा मागील वर्षी जिथे भेटलो होतो तिथेच भेटूया. थोडीफार फोनफोनि करून जागा ठरवली. डि. एस. ओ. आय. धौला-कुआ, नवी दिल्ली. तुम्ही मिलीटरी किंवा तत्सम पाठबळचे नसला तर डि.एस.ओ.आय. मधे तुम्हाला प्रवेश नाही. आम्ही घुसलो; कारण आमच्या सोबत होते रिटायर्ड कर्नल तेजिंदर सिंघ शाही आणि एअर फोर्स रिटायर्ड महेंदर सिंघ रोहील्ला मग कोण अडवणार. दि.एस.ओ.आय. ला जाण्यात मजा अशी की तिथे सगळ कस शिस्तबद्ध आणि अदबशीर असत. जागा हेरून खाण्या-पिण्याला सुरूवात झाली. खास दिल्लीचे म्हणून नावाजलेले पदार्थ चखणा म्हणून मागवण्यात आले. सीख कबाब, मवूसुत चिकन तिक्का, तंदुरी मुर्ग, मसाला शेंगदाणे. ह्याच बरोबर फिश् तिक्का ही होताच. नमनाला घडाभर तेल जाळायचे कारण हेच की तिथे मला एक इण्टरेस्टिंग गोष्ट समजली. तशी विश्वास ठेवायला कठीण होती पण सांगणार्‍या माणसाचे लागेबांधे बघता ती गोष्ट खोटी असणे शक्य नव्हते. त्यांचा मोठा मुलगा राहुल गांधी साठी एलेक्शन कॅम्पेनिंग करतो. निवडणुकांच्या काळात सदोदित त्याच्या कामावर. ह्याबदल्यात त्याला सरकारी कामे मिळतात. जसे रस्ते, डी.डीए.चे फ्लॅट बांधणे. साधे पूल, उड्डाण पूल वगैरे वगैरे. एकूण काय तर हा मुलगा राहुल गांधीचा कामाचा माणूस आहे. म्हणूनच ह्याला राहुल गांधीच्या अंतरंगातल्या काही बाबी माहीतआहेत. त्यातलीच एक आहे............................ क्रमश.................................................
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4958
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

नुस्तं तेल लावून वात तशीच सोडली की राव.. पेटवाल तर खरी..

च्या मारी बिस्कुट गोष्ट वाचायला सुरवात करायच्या आधीच संपली की वो इरसाल भौ. वाईच मोटं भाग टाका.

In reply to by किसन शिंदे

हेच्च म्हणतो. निदान आमच्या थत्तेचाचांसाठी पुढचा भाग लवकर टाकावा ही विनंती. ;) - छोटा डॉन

अंतरंगातल्या बाबी कोणत्या असाव्यात याचा साधारण अंदाज बांधला आहे. ;) पण हे घडाभर तेल कशाला घातले ते कळलं नाही. :?

ठासून ठासून सुरुंगाची दारु भरुन वात काढून सुंबाल्या केला का? आता आम्ही बसतो दडी मारुन कधी एकदा बार निघतो त्याची वाट बघत. :)

सगळ्यात अगोदर मीच. नावाला जागले पाहिजे न ? १. हि गोष्ट काही मंडळींना कै च्या कै वाटू शकते. (माझा नाईलाज आहे ). 2. २ पेक्षा अधिक ओळी टंकून मी कायदा मोडला नाहीये. 3. खाली क्रमश टाकल्याने मी, काही मोठ्या मोठ्या लेखातला एक तुकडा पाडून सावकाराची थकबाकी थकवलेल्या कर्जबाजारी लोकांसारखा वाट पाहायला लावणार्यांच्या लायनीत आल्याचा अभिमान बाळगतोय. (महिनोन महिने पुढचा भाग टाकत नाहीत. ) 4. येळ मिळाल्यास पुढचा भाग टाकला जाईल.( हापिसात एवढेच एक काम नसते )

In reply to by इरसाल

ते 'ढिश्क्लेमर' ऐवजी 'पुणेरी पाटी' असं शिर्षक दिलं असतं तर जास्त बेष्ट झालं असतं की. ;) तुम लिवो, हम वाचता हय.

In reply to by धमाल मुलगा

>>ज्यांना तुम्ही राहूल विन्सी/विन्ची म्हणून ओळखता. ओके. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय ? - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आणि त्यांच्या अंतरंगातल्या काही बाबींबद्दल जाणुन घेउन आम्ही काय करु ? हान आता डाण्या मचाक वर कुठल्या नावाने लिहितो ?, मिसळप्रेमीची मालकी कोणाकडे आहे ?, छुपे संपादक कोण कोण आहेत ? , कोण श्री. व सौ. एकमेकांच्या खात्यातुन ऑनलाईन मिपावर येतात ? असल्या काही अंतरंगातल्या बाबी सांगत असाल तर बोला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सोबत ऑफलाईन शिजणार्‍या इतरही बिर्याण्या-पुलावांबद्दलही पराशेठ ह्यांनी माहिती दिली तर उत्तमच.

तुम्हाला हे समजले आहे का कि, भारताच्या "स्वयंघोषित राजपुत्राला" "पुढ्च्या दाराने" प्रवेश करण्यापेक्षा "मागील दाराने" प्रवेश करणे जास्त आवडते.

हाण्ण तेज्यामाताय...... साल्या ल्ह्यायला सुरवात केलीस तीच क्रमश: ने. क्र म शहा चा चेला शोभतोस खरा