Skip to main content

ऑर्किड माझ्या घरी...

लेखक प्रीति सखि यांनी बुधवार, 29/06/2011 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
घरच्या कुन्डी मधे आलेला हा ऑर्किडचा बहर... हे फुल पानाला येते...२ वर्षातून एकदाच... बहर गेल्यावर फक्त पाने माती मधे खोवली की नवीन रोपटे येते!

बुद्धिवादी संस्थांचा व विचारांचा पराभव आधीच झाला आहे

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 29/06/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे. (संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य) आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री.

भडक वक्तव्ये

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 29/06/2011 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी दोन तीन न्यूज चॅनेलवर एक बातमी सारखी सारखी सांगत होते. माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीसांच्या शवपेट्या वाहून न्यायला म्युनिसिपालिटीची कचर्‍याची गाडी वापरली गेली. सरकारने शहीदांचा अपमान केला वगैरे ठराविक प्रक्षोभक वक्तव्ये बातमीदार करीत होता. "सरकारको कोई हक नही कि इस प्रकार शहीदोंका अपमान करें" वगैरे. बातमी वाचल्यास असे दिसते की जिवंत असलेल्या जखमींना नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स वापरल्यामुळे मृतांसाठी कचर्‍याची गाडी वापरली.

हेज्यायची कटकट...

लेखक भारी समर्थ यांनी बुधवार, 29/06/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांनी काल माझी जात आठवली होती सहज बोलता बोलता कोणीतरी तिची आठव काढली होती आमची जात लागत नाही प्रवेशाला, फी माफीला की आंदोलनवाल्यांना पैसा बक्कळ पडलाय, कोण विचारतोय आम्हा ओपनवाल्यांना नाही, मान्य की देशाच्या गरीब जनतेचा उत्कर्ष झाला पाहिजे पण मग आमच्याच शिटातला का बरं सगळ्यांना वाटा पाहिजे आमचे शेजारचे सूचीतले गेल्याच महिन्यात फॉरेन ट्रीपवरून आले पोराला फार शीण झालेला परीक्षेचा, त्याने चांगले ९०% की हो काढले त्यांच्या सुपुत्राला मुंबईबाहेरील जागा नको होती म्हणून आग्रह धरला आणि आरक्षण कोट्यातील जागेसाठी त्याने आपला फॉर्म भरला आम्ही म्हटलं द्या ना काका सोडून ही जागा एखाद्या गरीबास

गोला... टिंग..टिंग्... टिंग्...टिंग...टिंग्.. .टिंग्....टिंग.

लेखक जागु यांनी बुधवार, 29/06/2011 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या लपाछुपीमुळे वातावरण तसे अजुन गरमच आहे. त्या वातावरणात हे गोळ्याच थंड नेत्रसुख. १) ही आहे गोळा बनवण्याची मशीन (ती तर सगळ्यांनाच माहीत असते तरीही फोटो टाकतेय). २) बघा बर्फ लावलाय.

पालक-छोले

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 29/06/2011 04:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ३ कप बारीक चिरलेला पालक २ कप काबुली चणे रात्रभर भिजवून, सकाळी बोटचेपे उकडून घेणे.(कॅनमधले काबुली चणे देखील वापरू शकता) २ टोमॅटो+ ३-४ लसुण पाकळ्या+ १ इंच आले+ २-३ हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घेणे. १ मोठा कांदा बारीक चिरून १ टेस्पून छोले मसाला १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून धणेपूड १/२ टीस्पून आमचूर पावडर १/२ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार १ टीस्पून जीरे २-३ तमालपत्र ३-४ दालचिनीच्या काड्या तेल .

आता गरज पाचव्या स्तंभाची

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 28/06/2011 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
आता गरज पाचव्या स्तंभाची सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही.

सांगा मंडळी सांगा सांगा.........

लेखक इरसाल यांनी मंगळवार, 28/06/2011 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
खालील पैकी कोणाला जास्त प्रतिसाद मिळतील ? वैयक्तिकरित्या कोणावर जाऊ नये . १.हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद. २.मुसलमानांना एकत्र आणणारी तबलिगी जमात. ३.टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!