Skip to main content

हैदराबादमध्ये भेटूया का?

लेखक विसुनाना यांनी बुधवार, 03/08/2011 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लोकायत संस्थळ समूहाचे सन्माननीय संचालक श्री. नीलकांत हे ऑगस्ट महिन्यातील तिसर्‍या रविवारी (२१/२२ तारखेस) हैदराबाद मुक्कामी येणार असल्याचे समजते. ही सुवर्णसंधी साधून त्यांच्या समवेत हैदराबाद येथे शनिवार दि. २१ ऑगस्ट २०११ रोजी समस्त मराठी संस्थळ बंधू-भगिनींचे एक स्नेहसंमेलन करावे असा एक विचार होत आहे. हैदराबाद येथे असे स्नेहसंमेलन आयोजित केल्यास त्यास किती जण उपस्थित राहू शकतील? आणि त्याचे स्वरूप काय असेल? याचा आराखडा तयार करण्यासाठी मी हे प्राथमिक निवेदन देत आहे.

ड्रीमकॅचर

लेखक चित्रा यांनी बुधवार, 03/08/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
काळपट ओट्यावरून पाण्याचा हात फिरवून झाल्यानंतर रात्रीच्या अंधारात तिने पाहिले खिडकीबाहेर ते स्वप्न खुणावत अजून उभेच होते - ** पलंगावर टाकून आपले श्रांत क्लांत अंग भिंतींवरून सरकणार्‍या गाड्यांच्या सोबतीने झोपण्याआधी तिच्या लक्षात आले स्वप्न आत येऊ पाहत होते लगबगीने ** उठून तिने स्वप्नांची काढली गाळणी ठेवणीतली लटकावून दिली बेडरूममधील खिडकीवर. कुशीवर मग वळून तिला झोप कधी लागली कळलेच नाही.
काव्यरस

भारताची "रहमदिल" न्यायालये

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 03/08/2011 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.saamana.com/2011/August/03/AGRALEKH.HTM हा अग्रलेख वाचा. उच्च न्यायालयाने म्हणे असा आदेश काढला आहे की रोझे पाळणार्‍या कैद्यांना "उचित" आहार देणे हे तुरुंगाच्या अधिकार्‍यांचे "कर्तव्य" आहे. लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून मुस्लिम कैद्यांना शीरकूर्मा, खजूर, फळे, सुकामेवा वगैरे दर्जेदार आहार रमजानच्या काळात मिळेल. हेच न्यायालय गणेश चतुर्थीला तमाम मराठी हिंदू कैद्यांना उकडीचे मोदक खायला घाला असा आदेश काढेल काय? तमाम ख्रिस्ती कैद्यांना ख्रिसमसला केक आणि भेटवस्तू द्या असा आदेश निघणार काय? आणि मग होळी आणि दिवाळीचे काय?

ते दिवस आता कुठे

लेखक अरूण म्हात्रे यांनी बुधवार, 03/08/2011 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी ही सावली भेटायची... त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची पावसाला पेच होता,ह्या सरी वळवू कुठे चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची कैक वाटा चाललो,पण विसरलो पोचायचे नेमक्या वळणातूनी ही पावले परतायची गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

बॅचलर्स थाळी ...

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 02/08/2011 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
बॅचलर्स थाळी ... (मुद्दाम हे नाव दिले कारण यातील रेसेपी इतक्या सोप्प्या अन कमी साहित्य वापरून केल्या आहेत कि कुणीही (ज्यांना स्वयपाक येत नाही,अथवा कन्टाळा आहे ) बॅचलर्स/कामानिमित्त /शिक्षणानिमित्त बाहेर राहणारे लोक्स हि अगदी सहज बनवू शकतील,आणि या थाळीचा आस्वाद घेऊ शकतील ) शेवई खीर : साहित्य ";- काश्मिरी शेवईचे पाकीट ,काजू - बदामाचे काप ३ चमचे ,मनुके ,हिरवी इलायची पूड छोटा अर्धा चमचा , दुध १ लिटर ,तूप २ चमचे ,साखर २ वाट्या ( तुमच्या आवडीप्रमाणे ),केसर (आवडीनुसार ) कृती : श

मंदी, वाढ मंदावण्याची भीती, अमेरिका आणि शंका

लेखक मन यांनी मंगळवार, 02/08/2011 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका......मंदीची (दाट) शक्यता. आयटी वाले (पुन्हा एकदा) धोक्यात हे आणि असलं काही मागचे काही दिवस सगळीकडे दिसतय, ऐकु येतय आणि आता आभाळ फाटणार आहे असं वाटु लागलेल आहे. हे सगळं बघुन काही अतिसामान्य आयटी वाल्यांप्रमाणेच माझ्याही डोक्यात काही शंका आल्यात; माहितगार्/जाणकार मंडळींनी ह्याबद्दल काही सांगितलं तर आंतरराष्ट्रिय अर्थशास्त्राची निदान तोंडओळख तरी मला आणि इथल्या वाचकांना होइल म्हणुन खाली माझ्या डोक्यातल्या शंका टंकतोयः- १.अमेरिका म्हणे कर्जात आहे.

कट्टा ईन मेलबर्न !

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 02/08/2011 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बरेच दिवस वेळ झाला नाही इकडे डोकवायला. :) असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी मेलबर्न, सिडनी (ऑस्ट्रेलिया) मधील मिपाकरांना भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच. तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे. (पुन्हा एकदा इथे काहीही दाखवण्याचा कोणताही क्षीण प्रयत्न नाही.

जागेचा मालक

लेखक जागु यांनी मंगळवार, 02/08/2011 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
गावामध्ये काही ठराविक क्षेत्रात एक जागेचा मालक असतो. तो जागेचा रक्षणकर्ता असतो असे म्हणतात. ह्याला देवही मानतात. कधी कधी हा मालक दर्शनही देतो. भितीदायक असला तरी जमिनिचा रक्षणकर्ता व देवासमान म्हणून ह्याला कोणी कधी मारत नाही. हा मालक म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसुन जागेत वावरणारा साप असतो. आमच्या जागेतही आहे एक जागेचा मालक. मधुन मधुन आम्हाला आपले भव्य दर्शन देत असतो. आमच्या घराभोवती फिरताना आमच्या वास्तुचा हा सोबती. साळुंख्या आणि कावळे कर्कश्य आवाजात गर्जना करु लागले की बाहेर मालकांचे दर्शन होणार ही काळ्या दगडावरची रेघ असते.

ब्राऊ..६

लेखक गवि यांनी मंगळवार, 02/08/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
3