आता केजरीवाल आणि सिसोदिया लक्ष्य?
आता केजरीवाल आणि सिसोदिया यांना सरकारने लक्ष्य करण्याचे ठरविले आहे. म्हणे अण्णा आणि इतर सहकारी सामोपचाराची भूमिका घेत असताना हे दोघे अडवणुकीची भूमिका घेतात त्यामुळे सरकारने त्यांच्या प्रकरणांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. केजरीवाल यांच्या काही आर्थिक प्रकरणांची माहिती सरकारला मिळाली आहे. या स्वरुपाचा आशय असलेली कळते समजते छाप बातमी आज दैनिक सकाळने प्रसिद्ध केली आहे. हा सरकारचा फोडा आणि झोडा असा प्रयत्न आहे असे मला वाटते. सकाळसारख्या वृत्तपत्रातून ही बातमी प्रसिद्ध झाल्याने आश्चर्य वाटले. तुम्हाला काय वाटते?
मिसळपाव
