Skip to main content

अनुभव : मिसळ आणि जीवनातले

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 18/08/2011 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी अनेकांनी तो चित्रपट पाहीला असेल. त्यात अगदी सुरुवातीच्या प्रसंगात रेल्वे स्टेशनवर उतरल्यावर कुणी चोर सुनील दत्तचे पाकीट मारतो. बघणारे असंख्य लोक लगेच पुढे येतात, म्हणतात "याला आमच्याकडे सोपवा, आम्ही याला ठीक करू" यावर सुनील दत्त म्हणतो," ये है मेरे देश की जनता, यहां हर आदमी किसी ना किसी चीज से परेशान है, सरकार के भ्रष्टाचार से लेकर इंडियन क्रिकेट टीम की हार तक सब चीजों से ये लोग परेशान है , लेकीन ये सब चूप है, किसी की मूंह से आवाज नही आयेगी, कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा" आणि सुनील दत्त पुढे त्या चोराला म्हणतो, " कर दूं तुम्हे इनके हवाले, सर फोड देंगे तुम्हारा, अपना सारा गुस्सा ये लोग तुम्हारे उपर निकालेंगे" यालाच आपण म्हणतो वड्याचं तेल वांग्यावर तुम्ही एखाद्या लाईनीत उभे असता काही क्षुल्लक कारण घडतं, तुम्ही रांगेतल्या एखाद्या माणसाशी भांडाभांडी सुरु करता वास्ताविक तो माणूस तुम्हाला प्रथमच भेटलेला असतो पण दुसरीकडचा कुठलातरी राग तुम्ही त्याच्यावर काढत असता बॅंकेत आपण जातो तेव्हा असं दिसतं प्रत्येक कर्मचारी मान खाली घालून काम करीत असतो पण आपल्या एखाद्या कामाला जरा ५ मिनिट जास्त लागली तर "या लोकांना काही कामं करायला नकोत, कष्टमरची काही पर्वा नाही या लोकांना" असे आपले उद्गार असतात असा आपला राग, वैताग कुठेही निघतो. अगदी बसमधे कंडक्टरवर सुद्धा आपण खेकसतो. मग विषय भले साधा सुट्या पैशाचा असेल. बारकाइने पहा अनेकदा मिपा वर किंवा इतर कुठल्या साइटवर सुद्धा पहा प्रतिक्रिया देताना मुख्य मुद्दा सोडून आपण प्रतिक्रिया देतो. विषय काढणार्‍याला दुखावणार्‍या काही तिरकस टोचक प्रतिक्रिया देतो. विषय काढणार्‍याला आपण ओळखत नसतो, वैयक्तिक भाण्डणही असत नाही. हा कुठलातरी दुसरीकडचा राग आपण त्याच्यावर काढत असतो एकूण आपला काय अनुभव आहे माणसं अशी बाकी जीवनात कुठेतरी वैतागलेली असतात. तिकडे काही चालत नाही मग इकडे राग काढा, लोक असा कुठलातरी राग कुठेतरी काढत असतात का ? वड्याचं तेल वांग्यावर या म्हणीचा प्रत्यय आपल्याला येतो का ?

वाचने 8936
प्रतिक्रिया 59

प्रतिक्रिया

अनेकदा मिपा वर किंवा इतर कुठल्या साइटवर सुद्धा पहा प्रतिक्रिया देताना मुख्य मुद्दा सोडून आपण प्रतिक्रिया देतो. विषय काढणार्‍याला दुखावणार्‍या काही तिरकस टोचक प्रतिक्रिया देतो.
नाही पटल नाही आशु ! इथे प्रत्येकाचा हिशोब बरोबर चुकता केला जातो असा अनुभव आला आहे. सहसा इथे कोणी कोणाच्या पाठी नसत पण जर कोणी शहाजोग पणा केला तर इकडे मस्त पब्लिक धुलाई होते.:)

बस कंडकटरवर आपण खेकसतो ? मला उलटा अनुभव आहे. लेखाचा उद्देश कळला नाही? (संसदप्रेमी) चिरोटा

मायबोलीतुन आपली मनोगतं ऐलपैल मांडण्याचा उपक्रम करुन दमलेला मीमराठी माणुस इथं झणझणीत मिसळ खायलाच येतो, आता जातो काही जणांच्या नाकात रस्सा लागतो ठसका म्हणुन तो का बाकीच्या गिर्हाइकांचा दोष का?

>> बारकाइने पहा >> बरं पाहीलं. व्यक्ती तितक्या प्रकृती असं दिसलं. >> अनेकदा मिपा वर किंवा इतर कुठल्या साइटवर सुद्धा पहा प्रतिक्रिया देताना मुख्य मुद्दा सोडून आपण प्रतिक्रिया देतो.>> असे वाटत नाही. शब्दांचा कीस पाडणारे रथी-महारथी अनेक, चिक्कार, म्होप आहेत. पण मुद्दाम कोणी आऊट ऑफ वे जाऊन वेगळ्या प्रतिक्रिया देतं असं वाटत नाही. क्वचित काहीजण असतात. पण नियमाला अपवादच. क्वचित संभाषणाची गाडी रुळावरून घसरते पण नकळतच. मुद्दाम नाही.

जर सगळे देत असतील, तर मिसळपाव वर येण्यात काय अर्थ आहे ? तिरकस, विनोदी, शब्दां-शब्दांवर वाद, वेगळे अनुभव, नवीन ज्ञान ... यांसाठीच तर मिसळपाव वर जमतात सगळे ... - शेखर

In reply to by शेखर काळे

+१ सरळसरळ अळणी चर्चा करत बसण्यात काय मजा.. आणि सिरियस चर्चाही इथे होतच असते.. अधेमधे हलकेफुलकेपणासाठी हे अवांतर काहीसे आवश्यकच आहे. ठो करुन हसू आणणारे प्रतिसाद देणारे सदस्यमित्र खूप मजा आणतात. आणि तसेही कोणी हलकटपणात कमी नाही इथे.

वड्याच तेल वांग्यावर असे फारसे होत नाही, मात्र विषय बर्‍याचदा भरकटत जातो.

प्रिय आशु इथे फक्त आम्ही भांडायलाच येत नाही प्रेमाने जिलब्या पण देतो.. चलो अब मू मिठा करो ;)

In reply to by स्पा

काय राव, फकस्त पाचच जिलब्या ??? अवांतरः आपण ज्या जिलब्या दिल्यात त्या जिलब्या नसून इम्रती आहे असे आम्हास वाटत आहे. ;)

In reply to by स्पा

हा.... या तर ईम्ररत्याच आहेत.... आणि त्यादेखिल आम्च्या उत्तम च्या नाहित.... आमच्या औरंगाबाद च्या उत्तम ला फार भारी मिलतात..... बघुनच ओलखु आम्हि....

वडा, वांगे, तेल, रस्सा, मिसळ, जिलब्या, अळणी, शेंगोळ्या उल्लेख असताना धागा पाकृ विभागात का पकावू आपलं हलवू नये?

In reply to by सहज

+१ इम्रती चा पण उल्लेख आहे..

तिरकस चर्चा , टोमणे , शाब्दिक कोट्या , शेरेबाजी हि म राठी साहित्याची अविभाज्य अंगे आहेत ..रोजच्या रेटिन मधे या साठी वेळ नसतो आणि आजु बाजु च्या लोकांना तेवढी अक्कल पण नसते .. म्हणून शब्दांशी मि पा वर खेळने आवडते .. आणि काही येडे सोडले तर कुणी मनाला लावुन घेत नाही ...

शेंगोळ्या म्हणजे काय? शाळा पुस्तकात उल्लेख वाचल्यापासून उत्सुकता आहे. पण माहिती असलेले कोणी भेटले नाही. तेव्हा तेवढे ते शेंगोळ्या म्हणजे काय ते सांगावे. धन्यवाद.

In reply to by प्रचेतस

वल्ली ह्या त्या शेंगोळ्या नाहीयेत ज्या मी बोलतोय.. नाचणीच्या पिठापासून तयार होणार्या शेंगोळ्या आणी बाजरीची भाकरी हे कॉम्बीनेशन खुप जबरदस्त असते. :) अवांतर: ह्या शेंगोळ्यांची पाककृती टाकावी म्हणतो. ;)

In reply to by प्रचेतस

टाक टाक. नाचणी म्हटल्यावर कोकणातली चीज असणार.. आणि कोकणातली असूनही मला माहीत नसणे हे विशेष लाज वाटावे असे आहे. म्हणून आता उत्सुकता वाढलीय. कदाचित वेगळ्या नावाने ते माहीतही असेल. पण गट्ट्याची आंबट गोळेगोळे असलेली भाजी तीच ही निघू नये अशी इच्छा..

In reply to by गवि

नाचणी म्हटल्यावर कोकणातली चीज असणार.. आणि कोकणातली असूनही मला माहीत नसणे हे विशेष लाज वाटावे असे आहे. कोकणातली आहे का हे माहीत नाही माझ्या पुण्यातल्या घरी गेल्यावर आजी आवर्जून बनवतेच..

वल्ली, किसन म्हणतोय ते खरे आहे. जे दाखवलेत ते म्हणजे "दाल चिखल्या" किंवा नुसतं "चिखल्या" म्हणतात.त्या "शेंगोळ्या" नाहीयेत.

संधी मिळाल्यावर वाफ मोकळी करण्यात गैर काय?

In reply to by गवि

वाफवून नाही बनवत..नाचणीचं पीठ मळून त्या पिठाच्या दोन्ही हातानी जिलेबीसारख्याच पंरतू थोड्या मोठ्या आकाराच्या गोल चकत्या बनवायच्या आणी मीठ-मसाल्याची फोडणी असलेल्या पातळ रश्यात टाकायच्या..

In reply to by किसन शिंदे

नाचणीचं पीठ मळून त्या पिठाच्या दोन्ही हातानी जिलेबीसारख्याच पंरतू थोड्या मोठ्या आकाराच्या गोल चकत्या बनवायच्या
न तळताच वा न भाजताच? पण मग त्या पिठूळ नाही का लागणार? काहीशी चकोल्या किंवा दाल ढोकली सारखी पाकृ आहे का ही? सविस्तर पाकृ दे राव, फोटोंसकट.

In reply to by प्रचेतस

न तळताच वा न भाजताच? पण मग त्या पिठूळ नाही का लागणार? हो न तळताच, न भाजताच आणी त्यातच खरी मजा आहे..बाजरीच्या भाकरींसोबत खाण्याची.

In reply to by किसन शिंदे

नाचणीचं पीठ मळून त्या पिठाच्या दोन्ही हातानी जिलेबीसारख्याच
हे आमच्याकडे हुलग्याच्या पिठाचे करतात. .........शेंगुळे........ फोटो आहेत माझ्याकडे. शोधून टाकतो.

In reply to by मितभाषी

एवढी सगळी चर्चा झाली. त्याला एक वर्ष होऊन गेलं.. ती एक तेवढी शेंगोळ्यांची पाककृती कोणी टाकली असल्यास दुवा देऊन दुवा घ्यावा ही विनंती..

In reply to by मितभाषी

नाचणीचं पीठ मळून त्या पिठाच्या दोन्ही हातानी जिलेबीसारख्याच
हे आमच्याकडे हुलग्याच्या पिठाचे करतात. .........शेंगुळे........
हेचं शेंगुळे (उकडकडबोळे) आमच्याकडे ज्वारी आणि हरभरा डाळीचे पीठ एकत्र मळून सुद्धा करतात. लै खमंग आणि भारी प्रकार असतो तो.

In reply to by कवितानागेश

ओ तै कुणी तमिळ शब्दाचा अर्थ विचारत असेल तर त्याला चायनीज मध्ये उत्तर दिलं की कसं कळणार हॉ म्हणतो मी!!! शेंगोळ्याच काय ते माहिती नाय, उकडकडबोळी काय कप्पाळ कळणारे :)

In reply to by विनायक प्रभू

शिट्ट्या करायच्या ?

वरण फळे सारखे वा ट ते

In reply to by १.५ शहाणा

मलाही वल्ली आणि इतरांनी म्हटल्याप्रमाणे चकोल्या ऊर्फ वरणफळे ऊर्फ डाळढोकळी ऊर्फ आमटीतल्या पोळ्या यांचीच आठवण झाली. आहा.. आवडणार हा पदार्थ यात शंका नाही..

In reply to by रेवती

मिपा जुन्या फार्मात आलेले पाहून डोळे पाणावले. पण १-२ सोडून बाकी जुन्यांचे प्रतिसाद नाहीत फार. त्यामुळे "आतले आणि बाहेरचे" या विषयावरचा निबंध आठवला.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

थांबा, थांबा! कसलीतरी चाचणी (की चाचपणी) चालू दिस्तिये.;) आपण आपलं सांभाळून असावं झालं! बाकी पाणावलेले डोळे पुसायला रुमाल आहे की देऊ?

अरे येडा झालो ना हा धागा वाचुन :lol: तो आशु काय म्हणतोय आणि ह्यांचे काय चालु आहे??? - (भरकटलेला) सोकाजी

ओ सोकाजी ' तो आशु का ती आशु ' असो, अजुन काय बोला. हे वडे आणि वांगे दोन्ही तेलकट, असले चकणे चालतात का ओ कॉकटेल बरोबर आणि वांग्याची पण दारु करतात का ओ कुठं ?

In reply to by ५० फक्त

' तो आशु का ती आशु ' ओ सायेब, त्यानं काय फर्क पड्तोय? एवढ्यात किती धागे आले समान्तेचे..... तो आशु किंवा ती आशु सगळे समानच. संदर्भासाठी वाचा धनाजीरावांचा धागा 'मुल्गी वाच्वा' तसेच ययत्सुंचा 'मुल्गी का नको?'.;)

असं कसं रेवतीआजै, समान कसे असतील, समजा असा उतसफुर्त धागा काढुन सर्व अन्यावगरस्त व पिडित व पिडिक व पडिक मिपाकरानच्या भावनांना एक वाट करुन दिलयाबद्दल जर आशु जोगांचा सत्कार करायचा ठरवला तर काय आणणार शरट पिस का ब्लाउज पिस ? हां आता द्या शर्ट पिस त्याचेच दोन ब्लाउज शिवुन घालु असला युकतिवाद नका करु कुणी ?

.. 'आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या दिल्या नाहीत' 'सगळं आवरून ठेवलेलं घर... ' मिपाच्या लोकांच्या स्वाक्षर्‍या हीदेखील एक लक्षणीय गोष्ट आहे

जुने धागे पुन्हा वर आणणे हा, आता एक जालीय उद्योग झाला आहे.