Skip to main content

ए.एम.सी.

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 23/08/2011 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
"ए.एम.सी. म्हणजे काय हो"? अ‍ॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. "दुसरा काही अर्थ"? कुठे ऐकलास हा शब्द? "सहाव्या माळ्यावर गेले होते. तीने कालीकत इडलीचा घाणा टाकला होता. पिठाची आमटी झाली होती. त्या साठी मदत करायला गेले होते. तीच्या मैत्रीणिच्या तोंडातुन शब्द कळला. बहुतेक आपल्या नवर्‍याबद्दल आणि बॉस बद्दल बोलत होती" अस्स का? विचार करायला लागेल. मग पिठ घट्ट झाले का? "केले कसे तरी. साधी इडली करायला येत नाही चालली कालीकत इडली करायला". म्हणजे ११वी १२वी चा बेसिक अभ्यास न करता सी.ई.टी.

'ईगल्स' भरारी

लेखक प्रास यांनी मंगळवार, 23/08/2011 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
१९७० च्या दशकात लॉस एंजलीस मध्ये तयार झालेला, अमेरिकेतील चार्टस मध्ये ५ पहिल्या क्रमांकाची गाणी देणारा, ६ ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स जिंकणारा, ६ पहिल्या क्रमांकाचे अल्बम असणारा म्युझिक ग्रूप म्हणजे 'ईगल्स'. ग्लेन फ्रे, डॉन हॅनली, बर्नी लीडन आणि रँडी मीस्नर यांच्या या 'ईगल्स'ची गोष्टच जरा वेगळी आहे. मुळात यांच्यातील एकही म्युझीशियन कलिफ़ोर्निअन नाही. हे चौघे १९७१ साली प्रसिद्ध अमेरिकन गायिका 'लिंडा रॉनस्टेट' हिचे टूर-मेम्बर्स म्हणून लॉस एंजलीस, कॅलिफोर्नियाला एकत्र आले. एकत्र काम करता करता त्यांचा एक छान गट बनला.

नजर

लेखक निनाव यांनी मंगळवार, 23/08/2011 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज निजूनि उठलो अन जाणवले स्पष्ट दिसत नाही जवळचेच दिसते आहे फक्त नि लांब चे कळतच नाही जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ वर्तमान पत्र आजचे सर्व काही दिसते आहे, पण उद्याचा अंक काही दिसत नाही! नेमके काय घडले आहे कळंत नाहि मज सकुंचित नजर झाली माझी कि आकुंचल्या जवळील गोष्टी!!

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 23/08/2011 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा कशी झाली देशाची गती, कुंठली मती लाचखोरीचे पीक आले भ्रष्ट पुढारी नेते झाले नोकरशाहीची मस्ती चाले भ्रष्टाचार्‍यांचे राज आले, रं जी जी .... ॥१॥ एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे बॅंकेला गहाण सातबारा अवदसा होती घरादारा मग तो सत्तेमध्ये गेला पाहता मालामाल झाला कसा हा चमत्कार झाला? रं जी जी .... ॥२॥ एक होता गोविंदा रेड्डी, पॅंट आणि चड्डी मांडीवर उभी फाटलेली चप्पल पायात तुटलेली मग तो नोकरीत गेला घरी पैशाचा पूर आला सांगा कुठून पैसा आला? रं जी जी ....
काव्यरस

विदुषक

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 23/08/2011 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा विदुषक उन्हातान्हामधे उभ्या असलेल्या वैतागलेल्या लोकांचे त्याच उन्हातान्हामधे उभे राहुन मनोरंजन करत होता.

इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस्स माईण्ड

लेखक विनीत संखे यांनी मंगळवार, 23/08/2011 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या आठवड्यात मित्र घरी आला होता. मस्त मालवणी जेवण आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. आम्हा मित्रांच्या टोळक्यात क्रिकेट आणि राजकारणाविषयी बोल्लो नाही तर आम्ही सगळे ते डिस्कशन फाऊल धरतो. पण नुकताच आपला क्रिकेटविषयक स्वाभिमान इंग्रजीविषयाच्या "टेस्ट" मध्ये नापास झाला असल्याने आणि राजकारणात "अण्णा"नी दिल्लीच्या धुरंधरांची पुरती वाट लावलेली असल्याने त्या विषयांत त्या पलिकडे बोलायला जीभ धजवत नाही. म्हणून एकदम वेगळ्याच विषयाकडे वळलो. "लग्नाचं काय?" "ठरलंय." मित्र म्हणाला. "छान! म्हणजे हे विचारल्यावरच सांगायचं का?" "सांगणारच होतो. त्यासाठीच तुझा सल्ला घ्यायचा होता." "सल्ला?

चिकन पिटा सँडविच

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 22/08/2011 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ५०० ग्राम चिकन ब्रेस्ट २ टेस्पून लिंबाचा रस २ टेस्पून आले+लसुण्+पुदिना पेस्ट १ टेस्पून तंदूरी मसाला दीड टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून काळीमिरीपूड १ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार पिटा ब्रेड आपल्या आवडीचे क्रंची सॅलॅड पुदीना चटणी किंवा टोमॅटो सॉस साहित्य व पाकृ लेमन विनीग्रेट (सॅलॅड ड्रेसींग) १/४ कप ऑलिव्ह ऑईल २ टेस्पून / अर्धा लिंबाचा रस १/२ टीस्पून मस्टर्ड पावडर १ टीस्पून काळीमिरीपूड १ टीस्पून ड्राईड हर्ब्स मीठ चवीपुरतं