आज निजूनि उठलो
अन जाणवले स्पष्ट दिसत नाही
जवळचेच दिसते आहे फक्त
नि लांब चे कळतच नाही
जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ
वर्तमान पत्र आजचे
सर्व काही दिसते आहे, पण
उद्याचा अंक काही दिसत नाही!
नेमके काय घडले आहे
कळंत नाहि मज
सकुंचित नजर झाली माझी
कि आकुंचल्या जवळील गोष्टी!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1125
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय बोलू...ह्हा ह्हा ह्हा...हसू येतयं...
आज निजूनि उठलो
अन जाणवले स्पष्ट दिसत नाही
जवळचेच दिसते आहे फक्त
नि लांब चे कळतच नाही.....:bigsmile: हे कडवं वाचुन मनात एकच विचार आला,,,,रात्री कीती 'टाकली' व्हती? :wink:
ह... घेणे...:smile:
मिश्किल प्रतिक्रिये बद्दल
मिश्किल प्रतिक्रिये बद्दल आपले स्वागतच आहे!
"जवळच ठेवलेली वही, पेन,
"जवळच ठेवलेली वही, पेन, घड्याळ
वर्तमान पत्र आजचे
सर्व काही दिसते आहे, पण
उद्याचा अंक काही दिसत नाही!"
कविता वर्तमान काळातली आहे तर मग 'उद्याचा अंक' भविष्यकाळ आहे. तर मग 'उद्याचा अंक काही दिसणार नाही!'
असे हवे होते का?
निनाव -कविता छान नि बरीचशी
निनाव -कविता छान नि बरीचशी गूढ आहे.
विचार करणारी किंवा विचार करायला लावणारी ..