Skip to main content

साहेबांनी दिलेल्या ' व्हाईट वॉश ' ला मराठी समानअर्थी शब्द काय ??

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 23/08/2011 10:26 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1584
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

वरती कौलात आणि प्रतिसादात देण्यात आलेल्या "सपाटून मार खाणे" या अर्थाच्या शब्दप्रयोगांना आणखी एक समानार्थी किंवा जरा जहालार्थी शब्दप्रयोग म्हणून "इंग्लंडचा दौरा होणे" हा वाक्प्रचार मराठीभाषेत अधिकृतपणे सामील करून घ्यावा असा मी प्रस्ताव मांडतो. धन्यवाद.

In reply to by नगरीनिरंजन

जरा जहालार्थी शब्दप्रयोग म्हणून "इंग्लंडचा दौरा होणे" हा वाक्प्रचार मराठीभाषेत अधिकृतपणे सामील करून घ्यावा असा मी प्रस्ताव मांडतो.
इंग्लंडला जाणे म्हणजे विलायतेला जाणे असे पूर्वी म्हणत. विलायत शब्द "blighted" म्हणजे जखमी होणे असा होता. आपले क्रिकेटपटू जखमी नाही, गारद होत आहेत.

In reply to by चिरोटा

विलायत शब्द हा blighty या शब्दावरुन आला असावा, इंग्लंडला Blighty असेही नाव आहे. त्यामुळे ब्लाईटीचा अपभ्रंश होउन तो विलायत झाला असावा.

In reply to by स्पा

कुत्र्यासारखा धुणे १. कुत्र्याला धुताना त्याला आपटतात का धोपटण्याने धोपाटतात? २.तुम्ही तुमचा कुत्रा धुता की तो तुम्हाला धुवावयास भाग पाडतो??पंगा मोड ऑफ>

In reply to by Nile

(संदर्भाबद्दल खात्री नाही, पण केवळ प्रतिसादांवरून अंदाज बांधायचा झाला तर...) 'धुव्वा' हा शब्द उपस्थित मान्यवरांच्या स्मृतीतून पार धुतल्या गेला आहे काय?

In reply to by पंगा

धुव्वा हा शब्द चपखल आहे. पूर्वी वर्तमानपत्रात खुपच चांगले शब्द येत असत आणि भाषेत रुढही होत असत. आजच्या पत्रकांराना हे भान राहिलेले नसल्याकारणे इतक्या साध्या साध्या शब्दाना तसेचे तसे छपले जाते.

'इतर' ला दिले आहे. माझ्या मते ह्याला 'धुलाई' म्हणणे चपखल वाटते.

वरील सर्व आणि इतर मोठी शब्दसंपदा असा पर्याय हवा होता.....

In reply to by प्रास

>>वरील सर्व आणि इतर मोठी शब्दसंपदा असा पर्याय हवा होता..... येथे "अपशब्दसंपदा" असे म्हणावयाचे आहे का आपणांस?

एकतर्फी मात करणे (आणि सोबत वरील सर्व पर्याय लागू आहेत )लेका अमोल, कशाला क्रिकेटच्या आठवणीने काढतोय बाबा. बाकी, भारतात कधी येतोय आपला क्रिकेट संघ. नै म्हणजे मला धोनीची स्वाक्षरी घ्यायची होती. अशा आठवणीचा प्रसंग पुढे असेलही पण 'चार शुन्यचा' प्रसंग काही औरच आहे म्हणून म्हणतो मी. श्री अण्णांच्या आंदोलनाने क्रिकेट पराभवाची तीव्रता मला तितकीशी जाणवत नाही. बरं....सच्या कसातरी शंभरीला पोहचेल असे वाटले होते. पण, तोही नव्वदीत घायाळ झाला. नव्वदीला गेल्यावर सच्या नॉर्मल राहात नाही, ही गोष्ट खरी आहे. कहा वो सचिन और कहा आजका सचिन. सालं वयोमानानं आता काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात म्हणा. (सच्याबद्दल असे लिहिल्यामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही अशी अपेक्षा आहे) -दिलीप बिरुटे (भारतीय क्रिकेटपटूंच्या सुमार प्रदर्शनाने खचलेला)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर सहमत आहे आपणाशी . ' तरी जाताना सगळ्यांना सांगीतले होते व्यवस्थीत आंघोळ करुन जावा, तिथे जाऊन वॉश घ्यायची काय गरज होती ? ' :) अमोल केळकर

ला मत दिल्या गेले आहे. आमचे पर्याय :- १) घोडा लावणे. २) ठासून मारणे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

काहीही असले तरी स्वातंत्र्याच्या ६४ वर्षांनंतरही 'साहेब' या शब्द वापरावर तीव्र आक्षेप आणि जाहिर निषेध....!!

In reply to by प्यारे१

काहीही असले तरी स्वातंत्र्याच्या ६४ वर्षांनंतरही 'साहेब' या शब्द वापरावर तीव्र आक्षेप आणि जाहिर निषेध....!!
आम्ही तर इंग्लंडलाच मातृभूमी मानतो ;) काही काही बामणांची ती पितॄभूमी पण आहे म्हणे. खरे खोटे परशुराम जाणे.

In reply to by प्यारे१

+१ सहमत आहे. विनाकारण "साहेब" शब्द वापरणे माझ्यामते तरी न्यूनगंडाचे द्योतक आहे. इंग्रज खेळाडू "साहेब" आणि विश्वविजेते भारतीय खेळाडू काय घरगडी आहेत काय? एक ४-० पराभवाने काहीही सिद्ध होत नाही, भारतीय विश्वविजेतेच राहतील. माझ्या मते, ही सीरिज इंग्लंडने जिंकली यापेक्षा भारताने गमावली असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल. इंग्लंड इंग्लंड सारखेच खेळले, भारत फक्त भारतासारखे खेळले नाही. सिंह आपल्या पोलादी पंज्याना आणि तीक्ष्ण नखांना जरा आराम देत आळशीपणे बसून राहिला तर तेवढ्या काळात कोल्ही-कुत्री आवाज करणारच! नथिंग टू वरी!

इतरला मत दिले आहे... एवढा वर्ल्डकप जिंकून द्या लेको मग पुढची दोन वर्ष प्रत्येक सामना हरलात तरी चालेल विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू होण्याआधी प्रशांतने काढलेल्या धाग्यावर हि एक प्रतिक्रिया वाचल्याचे स्मरतेय...कोणाची होती ते आठवत नाही पण प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. त्यामुळेच आता धोनी अँड कंपनी व्हाईटवॉश घेवो किंवा तळ्यात जाऊन डुबकी मारो...कि फर्क पैंदा है. :) आणी धोनी त्याच्या कारकिर्दीत पहिल्यादाच कसोटी मालिका हरतोय, मग एक डाव त्याला माफ करायला काय हरकत आहे. हो सचिनचं महाशतक तेव्हढं व्हायला हवं होतं..:(

** मारणे.

In reply to by अप्रतिम

आयडीला साजेलसाच प्रतिसाद.... ;) आणि व्हाईटवॉश ला काळे फासणे कसे काय म्हणता येईल? ;) व्हाईटवॉश - पांढरेफटक पडणे, शुभ्रधुव्वा. -सूर्यपुत्र.

बलात्कार केला...करवून घेतला...

In reply to by मनराव

मना असं शाळेतल्या मुलासारखं काय करु राहीला बे?? हाच नियम ईतर ईंग्रजी जोड्शब्दांना लावल्या गेला तर पुष्कळ विनोद निर्मिती होईल. उदा: हनि मून

चूना फासणे, चूना लावणे. म्हणून ईतर ला मत दिले आहे.

खरेतर ' हग्या मार ' दिला, असे म्हणणे अधिक योग्य ! असो. शब्दशः सांगायचे तर विलायती संघाने साफ धुऊन काढले.पैशासाठी खेळणार्‍यांना देशाचे नाव राखायचे असते , हे कधी समजणार ? सचिनने अण्णांना जाहीर पाठींबा दिल्याचे वाचलत काहो ? खुसपट