Skip to main content

आंबाड्याचे रायते.

लेखक ज्योति प्रकाश यांनी रविवार, 04/09/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः- ५-६ आंबाडे. लाल तिखट. गूळ. मिठ. मोहरी. एक वाटी खवलेले खोबरे. फोडणीसाठी तेल. कृती :-प्रथम आंबाड्यात थोडे पाणी घालून शिजत ठेवावे. आच बंद करावी व थंड करत ठेवावे.थंड झाल्यावर आंबाडे कुस्करून घ्यावे.पाव चमचा मोहरी भाजून घ्यावी.खवलेले खोबरे घेवून त्यात भाजलेली मोहरी लाल तिखट,चवीप्रमाणे गूळ्,मिठ घालून वाटून घ्यावे.वाटण कुस्करलेल्या आंबाड्यात घालावे व परत शिजत ठेवावे.चांगली उकळी आली की आच बंद करावी.वरून मोहरीची फोडणी द्यावी.

मोदक

लेखक निमिष ध. यांनी रविवार, 04/09/2011 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज मित्राकडे गणपतीची पूजा आहे आणि फ्रीज उघडून पहिला तर ओले खोबरे हाताशी होते मग म्हणालो व्हा सुरु आणि बनवा मोदक. आता पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे काही उकडीचे मोदक करून चौका मारायचा प्रयत्न नव्हता फक्त आपले साधे तळलेले मोदक केले. मि पा च्या सगळ्या बल्लवाचार्य आणि सुगरणीना नमस्कार करून पाककृती टाकतो. पहिल्यांदा एका मित्राला सकाळी सकाळी फोन करून उठाव आणि लवकर मदत करायला ये असे सांगा .. मग तो येण्याची वाट पहा, तो पर्यंत ओले खोबरे फ्रीज मधून काढून ठेवा. जर नारळ वापरणार असाल तर तो फोडून आणि खोवून घ्या. मी तरी मोदक कणकेचे साधे केले होते.

निशाणी

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 03/09/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
छेडूनी धुंद ओली , हळवी तुझी विराणी , मी मागतो पुन्हा का, फिरुनी नवी निशाणी. पावूस चांदन्यांचा भिजवून काल गेला, ग्रीष्मात मोगरयाने फसवून वार केला, हे जाणुनी पुन्हा का, मनमोर गात गाणी, होतो अतृप्त जरी मी अव्यक्त खंत होती , निशब्द वेदना ही मुरली निवांत होती , का छेडली पुन्हा तू, ती रागिणी दिवाणी , अव्यक्त भावनांचे मी गूढ गीत गातो, स्वरमेळ ना तयाला तो तुझ्यातुनी वाहतो, ओठांत गुंफुनी माझ्या दे आता नवी कहाणी..
काव्यरस

"दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी!"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 03/09/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलनात सरकारची फजीती! परिस्थिती अंगाशी आल्यावर माणूस काय नाहीं करत? पण ती तशी अंगावर येईपर्यंत कांहींच न करणारा माणसाला काय म्हणावे? कदाचित् अशा व्यक्तींसाठीच "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी![१]" ही म्हण रूढ झाली असावी! एप्रिलच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केंद्र सरकारने ’रेटारेटी’त घालविलेले दिवस आणि १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्टच्या दरम्यान चांदण्यात बसून (घाईघाईने) वळलेल्या वाती हे या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे!

गणपती बाप्पासाठी खिरापती २) पंचखाद्य --

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 03/09/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
पंचखाद्यात ख अक्षराने सुरु होणारे पाच पदार्थ असतात. साहित्य- खारीक पूड, खोबरे, खसखस, खिसमिस, खडीसाखर. कॄती- खोबरे किसून घ्या व भाजून घ्या व हाताने कुस्करुन घ्या, खसखस भाजून पूड करा, सर्व एकत्र मिसळा...झाले पंचखाद्य तय्यार. :)

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

१४ किल्ल्यांची प्रतिकृती - दुर्गसृष्टी

लेखक सुनिल पाटकर यांनी शुक्रवार, 02/09/2011 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांची काळानुसार पडझड होत आहे.परंतु तरिही या किल्ल्यांचा इतिहास प्रत्येकाच्या मनामनात आहे. किल्ल्यांचा प्रतिकृतीतून इतिहास कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचे काम पोलादपूर येथील तरुणांनी हाती घेतले आहे. ट्रेकिंग आणि भटकंतीच्या हौसेतून या तरुणांमध्ये किल्ल्यांविषयी निर्माण झालेली आवड दुर्गसृष्टीच्या रूपाने मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूर येथे साकारत आहे.