Skip to main content

पर्यावरणपूरक गणेशोत्सव

लेखक विकास यांनी शुक्रवार, 09/09/2011 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी पुण्यातील शाश्वत फाउंडेशनच्या सौ. प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संवाद झाला त्यातून त्यांच्या "पर्यावरणपूरक गणपती मुर्तीच्या" प्रकल्पाबाबत समजले. त्यांन या संदर्भात मिपाकरांसाठी माहिती देण्याची विनंती केली होती. ती खाली त्यांच्याच शब्दात देत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
सकळ गुणांचा अधिपती असलेल्या गणेशाच्या पूजनाने सर्व कार्याचा शुभारंभ आपण करीत असतो.

रक्तपुष्पे सुपूजितम!

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 09/09/2011 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9925083.cms नाशिकमधे एका सार्वजनिक गणेशोत्सवात डी.जे.चा (म्हणजे काय?) मोठा आवाज कमी करा असे सांगायला गेलेल्या प्राचार्याला बेदम मारहाण केली आणि त्यात त्या बिचार्‍या माणसाने जीव गमावला. जिला विद्येची देवता मानतात तिच्या नावाने उत्सव करायचा त्यात असला गोंगाट करायचा आणि तो कमी करायला जाणार्‍या विद्यार्जनात मदत करणार्‍या माणसाचा जीव घ्यायचा. इतका भीषण उपरोध कल्पनेतही सुचणार नाही. खरोखर आता सार्वजनिक गणेशोत्सव बंदच करावा की काय असे वाटू लागले आहे.

एक जत्रा..... हरवलेली

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 06/09/2011 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी पावसाळ्यात घरी असल्याने भारी वाटत होतं. त्यातच श्रावणाची चाहूल लागलेली. अशी संधी असताना फक्त घरी बसणे शिक्षेसारखे वाटायला लागले होते. यंदाचा श्रावण कुठेतरी जाऊन कामी आणायचा असं मनोमन ठरवलं होतं. :) श्रावणाच्या दुसऱ्याच सोमवारी सांगली जवळ हरिपूर येथील जत्रेला जाण्याचे निश्चित केले. सकाळी लवकरच घराबाहेर पडलो, जेणेकरून जत्रेची पूर्वतयारी वगैरे बघता येईल. जातना वाटेत इतका जोरदार पाऊस लागला की बीच रास्ते से ही परत फिरावे का असा प्रश्न पडला. पण उम्मीद ठेवून मी पुढेच निघालो. तासाभराच्या रस्त्याला दीड तास लागला, पण पोचलो एकदाचा सांगलीत.

आकाशातल्या ठोम्ब्या बद्दल ....!

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 06/09/2011 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
काल जिम मधून खाली उतरलो. साडे आठ वाजले होते. गाडी जवळ पोचताना जिम कडे जाणारा मित्र भेटला. हा बहुदा माझ्या बरोबर असतो, सातच्या सुमारास. आज इतक्या उशिरा येतोय म्हटल्यावर गुड मॉर्निंग ऐवजी साहजिकच माझ्या कडून त्याच्यावर प्रश्न आपटला गेला, "अरे, आज इतका उशीर का ?" त्याचे स्पष्टीकरण चालु झाले. " काल श्रावण संपला ना. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत 'बसलो' होतो. श्रावणाच्या म्हैना भरात सॉलिड तहान लागली होती. मित्र ही होते बरेच. दहा दिवस आधीच ठरवून ठेवले होते. फार मजा केली. एकदम आउट ! पार कल्ला केला. आता आणि दहा दिवस बंद ना. गणपती आहे, बाप्पा. आपण नाही गणपतीत घेत.

कविता ढापणे यालाच म्हणतात का?

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 06/09/2011 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर प्रसिद्ध झालेल्या खालिल कविता मला मराठी सृष्टी या संस्थ्ळावर प्रकाशित झालेले आहेत. (माझी याला हरकत नाही) पण या सर्व कविता "सर्वेश पवार" या नावाखाली प्रसिद्ध झाले आहेत. (याला मात्र माझी हरकत आहे.) आपण कोणी 'सर्वेश पवार' यांना तशी परवानगी दिली आहे का? मी दिलेली नाही. मग या कृत्याला चोरी म्हणु शकतो का? या दुव्यावर सर्वेश पवार यांनी आपल्या नावाखाली प्रसिद्ध केलेले सारे लेखन आहे. कृपया आपापले लेखन तपासुन पाहावे.

गणपती विसर्जन आणि प्रदूषण

लेखक JAGOMOHANPYARE यांनी मंगळवार, 06/09/2011 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती विसर्जन आणि प्रदूषण आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती. हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले. १. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का? २.

अस्तित्व दान केले

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 06/09/2011 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
अस्तित्व दान केले


असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी

कवितेचे रसग्रहण - ३ (नावं)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 06/09/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
"नावं" ही सोनल कर्णीक वायकुळ यांची कविता माझ्या आवडत्या कवितांपैकी एक आहे. ही कविता जितकी भावूक खोल, आणि गहीरी आहे तितकीच तर्कदृष्ट्या भक्कम देखील. त्यामुळे ती वाचकाचा आनंद द्विगुणीत करते. तर्कदृष्ट्या भक्कम म्हणते आहे कारण कवितेची धाटणी थोडी गणिती सिद्धांताप्रमाणे आहे. प्रथम भूमिका मग स्पष्टीकरण मग समर्पक उदाहरणे. कवितेचा विषय आहे नावं दिलेली अथवा न दिलेली नाती. कवयित्री सुरुवातीलाच काही ओळीत तिचे म्हणणे मांडते - की नात्यांना नावं शोधायची नसतात, नात्यांना नावं ठेवायची नसतात.