Skip to main content

बाप्पा मोरया ...

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 12/09/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री अचानक मला स्वप्न पडले नवे ... बाप्पा आले आकाशातून म्हणे पाहायचेत तुमचे देखावे ... बाप्पा म्हणाले चल जरा दिल्ली मुंबईला जाऊ मस्तपैकी कोर्टातले संसदेतले तुमचे फटाके पाहू बाप्पा...

'सायलेन्स प्लीज'...थँक यू...

लेखक प्रभो यांनी सोमवार, 12/09/2011 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्यावर्षी लेबर डे च्या सुट्टीला यु एस ओपन बघायला गेलो होतो. यावर्षी लेबर डे चा दिवस गुर्जी घासकडवी आणी लंबूटांग यांच्यासोबत साजरा केला होता. मी गेल्या शनीवारी(१० सप्टेंबर रोजी) परत एकदा गुर्जी आणी लंबूटांग सोबत त्यांच्या गावची गणपती विसर्जन मिरवणूक बघायला जायचा प्लान केलेला होता पण, गुर्जी आणी लंबूटांग या दोघांनीही टांग दिल्याने ;) ऐन वेळेस यु एस ओपनचे तिकीट काढायचे ठरवले.

युगलगीत: रंग हिरवा ओला ओला

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/09/2011 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीत: रंग हिरवा ओला ओला
तो: रंग हिरवा ओला ओला आला निसर्गाला ती: प्रित तुझी माझी यावी अशीच बहराला ||धृ|| तो: थेंब नभातून खाली झरती तो: पडता त्यांना ओठांवरती ती: चुंबून घ्यावे थोडे प्यावे ती: एक होवूनी वेडे व्हावे ||१|| तो: कधी प्रकाशात दिसते तो: इंद्रधनू ते सात रंगांचे ती: हवेत तसले रंग धनूचे ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२|| तो: मोहरलेला श्वास श्वासात तो: हात गुंतले तुझ्या हातात ती: निसर्गात या वेडे झाले ती: दोन जीवांचे नाते जडले ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०९/२
काव्यरस

माझी म्हैस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 12/09/2011 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी म्हैस
एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ|| कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते हाय बेबे!
काव्यरस

पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न

लेखक रमताराम यांनी रविवार, 11/09/2011 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
(अलिकडेच मिपाकर चित्रगुप्त यांनी मृत्यूपूर्वीच्या स्थितीबद्दल चर्चा करणारा धागा काढला होता. त्यापासून स्फूर्ती घेऊन निळोबांनी 'मृत्यूसमयीच्या व्यवस्थेबद्दल' चर्चा करणारा धागा काढला आहे. इजा झाला, बिजा झाला तर तिजा म्हणून मृत्यूपश्चात जीवनाबद्दल आपण धागा काढावा नि आपले अनेक दिवस मळमळणारे प्रश्न भळभळून विचारून टाकावेत असा विचार करून हा धागा टाकला आहे.) मी जडवादी आहे की अंधश्रद्ध की आणखी काही मधले हे आपल्याला ठाऊक नाही (साला त्याबाबत वाद घालण्याची हुशारी पण आपल्यात नाही).

मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..

लेखक Nile यांनी रविवार, 11/09/2011 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत. मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्‍यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे. ) वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू.

दर्शन लालबागच्या राजाचे...

लेखक सुहास झेले यांनी रविवार, 11/09/2011 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्रीच्या सुमारास गेट वेच्या उधाणलेल्या समुद्रात काही सेकंदासाठी एक तेजस्वी प्रकाश पसरला. दिल्लीत परवा बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे आज पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त होता. कोणाला वाटलं तो कॅमेराचा फ्लॅश आहे, तर कोणाला वाटलं लाईट हाऊसचा दिवा. कोणी ते विशेष गांभीर्याने घेतलं नाही आणि दुर्लक्ष केलं. इतक्यात एका हवालदाराने अंधारात उभ्या असलेल्या व्यक्तीला हटकले, "ए कोण रे तू, इतक्या रात्री इथे काय करतोयस, दिसत नाही इथे यायला बंदी आहे ते??" "नारायण नारायण...वत्सा तू मला ओळखले नाहीस काय? (हातातल्या चिपळ्या वाजवत) मी नारदमुनी, देवलोकी माझा मुक्काम असतो" पिऊन आला आहेस वाटतं? कुठे चालला आहेस?

पुन्हा...

लेखक अभिषेक९ यांनी रविवार, 11/09/2011 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा ब्लास्ट मी हादरलो, आम्ही हादरले, सारा भारत हादरला पण 'ते' विचकट हसले... राक्षसी रावण, कंस, बकासुर, पुतना.. सुद्धा लाजले, रडवेले झाले.. 'आमचा असुरी पणा असला नव्हता हो' मिडिया गरजले रक्ताळलेले फोटो - बटबटलेला सूर मी भडकलो, आम्ही भडकलो, सारा भारत भडकला पण त्यांचा TRP वाढला नारायण-नारायण म्हणत नारद मात्र आपल्या आधुनिक रूपाने थक्क झाला सरकार सरसावले दहशतवादी हल्ला - RDX - राष्ट्र - धर्म - जेहाद मी आलो, आम्ही आलो, सारा भारत एकत्र आला पण त्यांची पोळी शेकली ब्रम्हा -विष्णू - महेशाचे आर्जव करत इंद्र मात्र या लोकशाहीत विस्कळीत झाला श्रीराम ते अण्णा... ...

निर्वात--पोकळी

लेखक स्व यांनी रविवार, 11/09/2011 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय करतोय? मला काय करायचय? खरं तर मला काय करायचय ह्याचाशी तुम्हाला काय करायचय? कर्महीन आणि निरुद्देश जीवन घालवणे हे विध्वंसक कार्यापेक्षा उत्तम नाही का? की जरासे विध्वंसक आणि रजो-तम गुणी झालेले चालेल पण कर्म करणे योग्य? कशासाठी काय केले पाहिजे?ही वेळ काय करायची आहे? मी असा एका निर्वातात बसुन काय करतोय? एका रिकामटेकडेपणाने ही मनोपोकळी व्याप्त केली आहे का?हे रिकामपण चांगले की वाइट? वाइट असेल तर कुणासाठी? इतरांसाठी की माझ्याचसाठी? कुणी काहीच प्रतिसाद का देत नाही? मी एकटाच तासनतास पुन्हा पुन्हा सगळ्यांना संपर्क तरी किती करु? सगळे का टाळताहेत? काय झाले आहे? कुठे आहेत आई-बाबा?

सचेतन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 11/09/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज साधारण १वर्षापूर्वी माझा मावस भाऊ (वय-२४) बाइक वरुन पडून अपघाती दिवंगत झाला.असे प्रसंग अनेकांवर येतात,हे प्रसंग विसरत तर नाहीतच,पण स्वतःच्या मनाची समजुत कशी घालावी हेही कळत नाही...त्यामुळे या कवितेला सत्याचा आधार आहेच,पण त्याही पेक्षा हे अश्या प्रकारचं कटु वास्तव स्वीकारावं कसं हा प्रश्न मला छळत होता ...तो सोडवायला मला जमला की नाही?मला कळत नाही.
काव्यरस