मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत......
प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का?
घटना १:
माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे.
घटना २:
माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे.
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
"वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?
प्रतिक्रिया
अतिशय चांगल्याप्रकारे (सचित्र) अनुभव मांडले..
अतिशय चांगल्याप्रकारे (सचित्र) अनुभव मांडले..
conscious and subconscious mind असं काहि असावे काय?
प्रशांत तायडे
घटना क्रमांक एक बद्दल माझं
घटना क्रमांक एक बद्दल माझं असं मत आहे की, वार्धक्यात माणसाची स्मृती कमी होत असलेली अनेक उदाहरणे आपण आपल्या आजूबाजूला पाहात असतो. वय झालेल्या माणसांच्या बाबतीत ताज्या घटनांची साठवण करण्याकरिता मेंदूची कार्यक्षमता कमी होत असावी, मात्र पूर्वीच्या बालपणाच्या असंख्य गोष्टी स्मरणात असल्यामुळे तितकेच आठवत असावे असे वाटते.
बाकी, अतर्क्य गोष्टीबद्दल ’सिद्ध’ करणे ही मोठी कठीण गोष्ट असल्यामुळे अशा गोष्टी केवळ चमत्कारिक म्हणून ऐकाव्या आणि पाहाव्या लागतात. विज्ञान आणि काळाच्या ओघात असे चमत्कार विसरावे ही लागतात.
मृत्यूपूर्वी काही लोक बडबडत असतात तो संवाद म्हणजे मृत्यूशी चाललेला असतो असे म्हणतात. खरं खोटं देवाला माहिती. परंतु असे अनेक प्रसंग संत-महंताच्या, थोर विभूतींच्या तोंडून आपण ऐकत असतो.
”आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम” असे म्हणणारा तुकाराम कशाबद्दल बोलतो काही कळत नाही.
-दिलीप बिरुटे
बराचसा सहमत ....
अशा काही गोष्टी ऐकलेल्या आहेत.
मृत्यू आणि त्यासंबंधानी अनेक गोष्टी ऐकण्या-वाचण्यात आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे सुप्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शक गुरुदत्त यांच्याबद्दलची. असं ऐकलं आहे की त्यांच्या मृत्युच्या वेळी त्यांची पत्नी त्यांच्या जवळ नव्हती, पण तिला एक भयानक स्वप्न पडले आणि ती घाबरून जागी होऊन गुरुदत्त ह्यांची भेट घ्यायला गेली .... पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला होता!
दुसरी गोष्ट ही अमेरिकेचे जगप्रसिद्ध माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांची. त्यांना म्हणे त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच एक स्वप्न पडले होते, त्यात त्यांचा स्वतःचा मृतदेह एका मोठ्या हॉलमधे ठेवला होता वगैरे वगैरे. त्यांनी ते स्वप्न फक्त आपल्या पत्नीला सांगितले होते असं ऐकण्यात आहे. पण नंतर त्यांचा मृतदेह जिथे ठेवण्यात आला होता तेथील एकून वर्णन हे खरोखरच लिंकन ह्यांनी आपल्या स्वप्नात पाहिलं होतं तसंच होतं म्हणे. 'व्हाईट हाउस'मधे लिंकन ह्यांची खोली अजूनही राखून ठेवली आहे आणि काही लोकांना तिथे खरंच लिंकन वावरत आहेत असा भास होतो ... असं म्हणे .... खरं-खोटं त्या लिंकन महाशयांना आणि आता ओबामा महाशयांना(पण) माहिती
हम्म थोडक्यात मेलेले लोक्स
हम्म थोडक्यात मेलेले लोक्स दिसू लागले की दीस भरले समजून जायचं तर.... मला तूमच्या अनूभवांवर विश्वास आहे पण अनूमानावर तितकासा नाही, खरं खोट देवा़क काळजी
- (काळजीवाहू) जिवनशून्य
We are who we are!
:)
थोडक्यात मेलेले लोक्स दिसू लागले की दीस भरले समजून जायचं तर....
मेलेले लोक दिसू दे नाही तर थेट मृत्यू आपल्याशी संवाद साधू दे. तसाही, मृत्यू आपल्या शेजारीच असतो. भरधाव जाणारी ट्रक आपल्या अगदी जवळून जाणे, दुकानाच्या पाट्या वाचत आपली बाईक चाललेली असतांना आपल्या समोर करकचून मोठ्या कंटेनरने लावलेला ब्रेक असू दे. बस मधे बसलेलो असू तर मोबाईलवर बोलत गाडी चालवणारा ड्रायव्हर अचानक ब्रेक लावतो तेव्हा आणि अशा अनेक प्रसंगात आपण मृत्यूच्या अगदी जवळ असतो. तर-
संत-महंताप्रमाणे आपण मृत्यूला म्हणायचं की, अजून मानवलोकात माझ्या हातून भरीव असे खूप कार्य होणे बाकी आहे. कृपया मला आपल्याबरोबर येण्याचा आग्रह धरु नये ही नम्र विनंती. आत्ता येतो म्हणायचं आणि तिथून कटायचं.
असो, विषयांतराबद्दल क्षमस्व.
अवांतर : 'मरणात खरोखर जग जगते' या बाळ सामंतांच्या पुस्तकात चित्रगुप्त लिहितात तसे अनेक प्रसंग आहेत. एकदा हे पुस्तक सर्वांनी वाचायला हरकत नाही.
-दिलीप बिरुटे
जेंव्हा डॉक्टर आपल्या बर्थ
जेंव्हा डॉक्टर आपल्या बर्थ सर्टिफिकिट वर सही करत असतो ना, तेंव्हाच आपण मरणाबरोबर एका करारावर सही करत असतो, त्यानं बोलावलं की विनातक्रार निघायचं अश्या आशयाचा करार असतो तो, त्यात अगदी व्यवस्थित तारीख वार वेळ पण टाकलेली असते, पण होतं काय आपण या जगात आल्याचा आनंद एवढा असतो की आपण ती तारिख वेळ लक्षातच ठेवत नाही, आणि मग निवांत जगत राहतो, ती तारीख ती वेळ फार लांब असल्याची स्वप्नं पाहात.
पण एखादे वेळी स्वच्छ पाण्याच्या सरोवराचा तळ दिसावा तसं ते करारपत्र नजरेसमोर येतं अन लक्षात येतं की फार तास पण उरलेलं नाहीत आता, मरणाच्या आसपासच्या वेळचं संदर्भ आणि घटना विशेषतः म्हातारपणी मरण येत असेल तर, लक्षात ठेवणं शक्य असलं तरी विसराव्या अशाच असतात , त्यामुळं त्यातल्या त्यात ब-या गोष्टी आठवत असाव्यात.
विझताना दिव्याची वात मोठी होते, त्या मोठं होण्यात जे चमकते ते समईचं पितळ अन वातीवरचं तेल, वातीच्या टोकाची काळजी दिसली काय अन नाहि काय, काही फरक पडत नाही. तसेच याक्षणी कशाला ते काळे क्षण आठवायचे, पितळयासारखी चमकणारी अन तेलासारखी मायेची माणसं आठवली म्हणजे झालं.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
जुने विचित्र विश्वचे अंक पहा
विचित्र विश्व हे मासिक पूर्वी पुण्यातून प्रसिद्ध होत असे त्यात मृत्यूनंतरचे जीवन आहे तरी कसे? या नावाची लेखमाला प्रसिद्ध होत होती. त्यात या विषयावर प्रकाश पडू शकेल असा मजकूर प्रसिद्ध झाला होता असे आठवते.
याचि देहि याचि डोळा
माझा 'याचि देहि याचि डोळा' अनुभव...
माझ्या आईची मावशी जर्जर म्हातारपणी तिच्या गावी मृत्यूघंटेसमीप होती. तिला काही तासांत अग्निवश व्हावे लागणार हे अगदी तय होतं. माझ्या आईचं मावशीआजीशी मायेचं नातं होतं. कधीही आईला तिने फटकारलेलं किंवा ओरडलेलं आठवत नाही. स्वत:च्या मुलांवर मात्र तिची शिस्तीची वेसण होती. तरीही आईसारखी आईच ती.
मावशीला तीन मुलं. सर्वात लहान मुलगी नर्मदा डोक्याने अधू. म्हणूनच मावशी आजीचं तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. नर्मदा मावशीला शहरात मोठ्या मामाकडे गेल्या कित्येक वर्षांपासून ठेवलेलं. गावी सतराव्या वर्षी तिची कूस उजवली गेली होती. कुणी केली काय केलं काहीही माहित नाही. गर्भारपणात काळजी न घेतल्या कारणाने सातव्या महिन्यात अर्भक दगावलं. तेव्हापासून मावशी आजीने मोठ्या मुलाकडे, मामाकडे तिला ठेवलं होतं. मामाकडचे तिची 'त्यांच्या सोयीनुसार' काळजी घेत होते.
आजी निर्वतली तेव्हा मी पंधरा वर्षांचा असेन. गावी सगळे मे महिन्यामुळे सुट्टीवर आलेले असल्याने आजीकडे तिला शेवटचं पाहायला म्हणून आलेले. दहा बारा लोकांचा गोतावळा तिच्या खोलीबाहेर होता. मधली मावशी बाजूच्या गावी दिली होती. तिच इतकी दिवस सांभाळ करत होती आजीचा. मोठा मामा गावी येण्याच्या मार्गावर होता. नर्मदा मावशीसहित सगळ्यांना घेऊन येत होता तो.
संध्याकाळचे सात वाजले असतील. आई आणि मी आजीला बघायला खोलीत शिरलो. आजी जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत होती. आईला बाजूला बसून काहीच क्षण लोटले असतील तोच आजी किंचाळली....
"नमू नमू अगं पाय बघ. ट्रक बघ ट्रक बघ", आणि तशीच नर्मदा मावशीच्या नावाने असंबद्ध बरळू लागली. आईने गोंधळून मला विचारलं तर मीही जे ऐकलं तेच तिला सांगितलं. अर्थातच मर्त्यक्षणाला निकट असणार्या व्यक्तीचे बोलणे नेहेमीच लक्षात घेतले जात नाही. म्हणून मी आणि आईने तिच्या बडबडण्याकडे जास्त लक्ष दिले नाही.
थोड्याच वेळात मामी आली. एकटीच मुलांसोबत. आईने विचारलं तर अगदी चिंतीत सुरात म्हणाली, "अगं रेल्वेस्टेशनाकडे हे आणि नर्मदा आमच्या मागून रस्ता क्रॉस करत होते. कडेला थांबलेले तर उलट्या बाजूने ट्रक आला आणि नर्मदेच्या पायाच्या बोटांवरून गेला. कळेचना काय करावं. मग तातडीन हे तिला हॉस्पिटलात घेऊन गेले. मला मुलांसोबत इथे पाठवलं. आठच्या एस्टीने येतील. बिचारी नर्मदा आईंच्या नावाने पाय पकडून बेंबीच्या देठापासून ओरडत होती. रडत होती. फ्रॅक्चर झालीच असणार बोटं..."
ते ऐकून मी आणि आई अगदीच भेदरून गेलो.... नऊ वाजता नर्मदा मावशी आली तेव्हा आजीने प्राण सोडले. आईने नंतर हा प्रकार मामाला सांगितला तर तो घाबरून कोड्यातच पडला. ह्यापूर्वी कधीही नर्मदेला पायाला किंवा ट्रकने कुठलाही अपघात झालेला त्याला आठवत नव्हता की जेणेकरून आजीची ती स्मृती अशीच चाळवली गेली असेल.
दहा मिनिटांपूर्वीची ही आपत्ती आपल्या मायेच्या लेकरावर कोसळलेली ह्या मृत्यूशय्येवरील आईला कशी कळली असेल? त्या काळी तर गावात फोन, मोबाईल वगैरे काहीच नव्हतं....
आजही आठवलं की तो अनुभव मन शहारून जातो.
आयला
आयला
यावरुन
बिकाकाकांची फेड.. कथाआठवली.
ओएमजी. :-०
ओएमजी.
:-०
कथा मस्तच आणि विनीतभाऊंचा
कथा मस्तच आणि विनीतभाऊंचा अनुभवही...
---------------
आलोय तर काईतर्ही च्वारी करनारच म्ह्या!
----------------
बापरे
बापरे. असे आहे होय. कल्पनाही केली नव्हती कधी
हे जर सर्व खरे असेल तर फारच आश्च्र्याचे आहे.
वरचे चित्र आवडले
वरचे चित्र फारच आवडले. विषयाला अगदी चपखल आहे. लहानपणी एकदा, हवायन जमातीतील वृद्ध मरणाची वेळ जवळ आली की होडक्यात बसून बुडत्या सूर्याच्या दिशेने समुद्रात प्रवास करतात असे वाचले होते. (खरे खोटे माहित नाही) पण या चित्रात प्रवाश्याला घेऊन जाणारा जो नावाडी आहे तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे.
डिस्क्लेमरः खालील विधाने ही माझी श्रद्धा नाही परंतु मी ती वारंवार ऐकली आहेत. खाली जी गोष्ट देत आहे ती खरीच असेल असे मी सांगत नाही, त्यावर माझा खूप विश्वास आहे असेही नाही पण ज्यांनी मला ती सांगितली त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
अनेकांच्या मते मृत्यूच्या वेळेस तुमचे मृतआप्त तुम्हाला न्यायला येतात. त्या जगात किंवा ट्रान्झिशनच्या काळात तुम्हाला भीती, एकटेपणा किंवा गोंधळल्यासारखे होऊ नये म्हणून. यावर माझा फारसा विश्वास नसला तरी कल्पना अतिशय रोचक आहे हे मी आवर्जून नमूद करेन.
आमच्या कुटुंबातील एकजण जे शिक्षणक्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत होते त्यांचे वडिल (जे प्रथितयश डॉक्टर होते) त्यांच्या मृत्यूसमयी घडलेली ही घटना आहे.
स्थळ कोकणातले. वडिलांचा मृत्यू जवळ आला आहे हे कळल्याने हा मुलगा त्यांच्या जवळच बसला होता. पहाटेची वेळ होती. वडिलांचा हात मुलाच्या हातात होता. वडिलांची मती उत्तम कार्य करत होती पण ते अचानक हात सोडवून म्हणाले, "अरे, भाऊसाहेबा आलेत. तयार आहेस ना विचारताहेत." मुलगा चक्रावला कारण भाऊसाहेब हे त्याच्या वडिलांचे मित्र होते आणि ते वर्ष-दोन वर्षांपूर्वीच निवर्तले होते. थोड्याच वेळात वडिलांचा मृत्यू झाला.
याच वेळी त्यांचे तिसरे मित्र मुंबईत राहत. ते पेशाने किर्तनकार होते (बाबाबुवा नाहीत). ते त्याच दिवशी पहाटे झोपले होते आणि अचानक पलंगावरून तोल जाऊन पडले. त्यांना विशेष लागले नाही परंतु ते आपल्या भाच्यासमवेत राहत (हा भाचा एक प्रसिद्ध लेखक आहे) तो उठून त्यांच्याकडे आला आणि विचारू लागला की 'असे कसे पडलात?'
तेव्हा हे मित्र म्हणाले की "स्वप्नात भाऊ आले होते, म्हणाले 'अरे उठ उठ! झोपतोस काय? डॉक्टर येताहेत!' काहीतरी घडले आहे. मन धास्तावते आहे."
त्यांनी आग्रहाने भाच्याला चौकशी करायला सांगितली असता काही काळाने (तो फोन वगैरेचा जमाना नव्हता) त्यांना वरली गोष्ट कळली.
वरील चित्राविषयी माहिती
हे चित्र 'Isle of the Dead ' नामक असून 'Arnold Böcklin' या चित्रकाराचे आहे.
धन्यवाद
माहितीबद्दल अतिशय आभारी आहे. फारच सुरेख चित्र आहे. मोहवून टाकणारं. मला मिळालं तर मीही नक्की घरात लावेन.
वरील धाग्यात म्हटल्याप्रमाणे मलाही आधी ग्रीक पुराणांतील केरन हा मृतात्म्यांना पाताळाकडे नेणारा नावाडी वाटला पण त्याच्यासोबत असणारे मृतात्मे वरील चित्रातील मृतात्म्याप्रमाणे निर्धास्त दिसत नाहीत. वरील चित्रातील मृतात्म्याची जी स्थिती आहे ती डुचमळणार्या होडक्यातही अतिशय सहजपणे आणि निर्धास्त असणारी आहे. केवळ नावाड्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणारी व्यक्तीच त्या होडक्यातही इतक्या शांत आणि धीरगंभीर अवस्थेत उभी राहू शकते.
अप्रतिम! फारच आवडले मला हे चित्र.
हॅरी पॉटर मध्ये डेथ्ली हॅलोचा
हॅरी पॉटर मध्ये डेथ्ली हॅलोचा दगड अशाच प्रकारे मेलेल्या पूर्वजांना जवळ आणतो. व मृत्युची तयारी करतो...
उत्तम निरीक्षण..
मृत्यूच्या भेटवस्तूंमूळच असं घडत हे काही माहीत नाही पण हॅरी जेव्हां मरणाला सामोरा जायला तयार होतो तेव्हां त्याचे (मेलेले) आइ, वडील, गॉडफादर व आवडते शिक्षक समोर अवतरतात व त्याच्याशी संभाषण करतात हे मात्र खरयं. ते बघता आपण मरण्यापूर्वी आधीच मेलेले लोक्स दिसू शकतात म्हणायला जागा आहे
बाकी पितृपंधरवडा वगैरे बाबतही माहीती मिळाली तर बरं होइल.
We are who we are!
ह्ही...ह्ही...हा...हा....हा..
ह्ही...ह्ही...हा...हा....हा.... भू.....................त
अता अपल्याला भुतांच्या गोष्टी ऐकायला मिळणार....
सुरवात-नेहमी स्वतःपासून करायची असते,असे म्हणतात ना कायसे? म्हणून पहिला खेळ आमचा---
स्थळ-कोकणातलं १ घर(अश्या गोष्टींना तीकडचीच घर हवीत,गूढ वातावरणाची कीक माळरानापेक्षा कोकण प्रांती अधिक येते)
काळ-झडप घालायला आलेला भूतं-काळ
वेळ- रात्री नीजानीज झाल्यानंतरची.... ही:हा...
चला........सगळी पूर्व तयारी तर ठीक झाली अता आपण शरीराची त्वचा,....त्वचाच म्हणतात ना तीला?
स्वारी त्याला?...अं...अं...हं....तर त्वचा थरथरे पर्यंत त्या वातावरणात राहू.चला तर मग त्या ऐतीहासीक पडवीत,,पडवीच्या मागे १ 'आड' आहे,त्यामागे वाडी...आज कुणाचं तरी वर्षश्राद्ध झालेलं आहे आणी वाडीचा नैवेद्य कुत्र्यानी वगैरे खाल्लेला नसून तो आपोआप गायब झाल्याची वदंता आहे,,,या पार्श्व-भूमीवर काही स्त्रीया गुप्त खलबंतं केल्याप्रमाणे पडल्या/पडल्या सुरू होतात...
स्त्री १-काय गं झोप लागत्ये?
स्त्री २- नाय बा,,,लागेल कशी?तुला कळ्ळ नाय?
स्त्री१- (दबक्या आवाजात) का$$$$य? ते पान ना? त्यात काय कळायचय मेलं? अत्रुप्ती हो...दुसरं काही नाय
स्त्री२-मला वाट्टं,पलीकडचे मामा
स्त्री१- कोण? गेल्या आषाढात गेले ते?
स्त्री२-नाय तं काय? इतका अत्रुप्त दुसरा होता का तरी कोणी गावात?
स्त्री१-हो बाई,ती पलीकडची कुमुद आहे ना,ती म्हणत होती दुपारी शेणकीत शेण टाकायला आली तेंव्हा तीला हे आपण वाडीला ठेवलेलं पान हलताना दिसलं म्हणे...
स्त्री२-होय की काय? आणी गं म ?
स्त्री१- तिचं तेच म्हणण हो,,,मामांचं त्यांच्या पोरांनी काही मंजे का...ही केलन नाई ना,त्याचा परिणाम
स्त्री२-जळो मेलं,तरीच मी म्हण्ट्ये...स्वतःचा चहा ढोसल्यावर सुधा,दुसय्राच्या कपावर मेल्याची भारी नजर असायची,,,माणसं जगतात ती जगतात आणी मेल्यावर सुद्धा स्वभाव जरा देखिल बदलत नाही हो...
एवढ्यात स्त्री क्रमांक-१ चा दिवटा (वय-साधारण-८/९) ''आई पोटात मळमळतय...'' म्हणुन रडत उठतो..
स्त्री१- जरा मेलं निजल्ये नाई त आली ही ब्याद ...पोराला - काय रे मेल्या,काय झाल?वावडींग घातलवतं ना संध्याकाळी तूला?
पोरगा-आई,,उलटी होत्ये...वळचणीचा लाइट लाव ना..आणी तू पण ये...हो... मला भीती वाट्टे एकट्याला...स्त्री१ पोराच्या पाठीत धपाटा घालत...'चल हो पुढे'....बाहेर जाऊन पोर बकाबका ओकतं....आणी स्त्री१ला धक्का बसतो....
स्त्री१-(मोठ्यांदी ओरडते)काय कार्ट आहे मेलं
स्त्री२-(लगबगीनं बाहेर येउन)- काय गं आता उलटी झाली त पोरावर चिडत्येस कसली?
स्त्री१-अगो...काल पासून पोट दुखत होत म्हणून लंघन करायला भाग पाडल ना याला,,,आणी उलटी मधे हे भरड्याच्या वड्याचे भरा भरा खाताना अर्धे चावलेले तुकडे पडलेत...अगो ते पान दुसय्रा कुणी खाल्लन नाइ...हाच आमचा मेला भस्म्या...अता गोठ्यात डांबते...आणी चांगलं २/४ दिवस ठेवते हो उपाशी.....वगैरे वगैरे.....
देन चिंटू, ट्येल मी,,,व्हाट इज दी मॉराल आफ श्टोरी...?---
खय्रा गोष्टी जो पर्यंत उजेडात येत नाहीत तोपर्यंत खोट्या गोष्टीच खय्रा असतात
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
भूतकाळ की भविश्यकाळ
माझे आजोबा काही दिवसांपुर्वी वारले.
जाण्यापुर्वी काही वेळ मी त्यांच्या जवळच आहे असे त्यांना जाणवत होते. प्रत्यक्षात मी त्या खोलीत सुमारे पंधरा दिवसांनी पोचलो. ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
त्यात कसा काय येणार भविष्य
त्यात कसा काय येणार भविष्य काळ?....अहो मरण समयी (आणी म्हातारपणी सुद्धा) माणसाची बुद्धी अपंग झालेली आणी भावनेच्या ताब्यात असते,,,त्यामुळे सारखी जवळची माणसं भेटावीत असं जे मनापासून वाट्टं ,त्याचाच तो परीणाम,की त्या व्यक्तीला वारंवार चिंतन केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आहेत असा भास होतो....हा सगळा विषय मानस शास्त्राचा आहे...आपण मन आणी मनाचे रोग/आजार यावरील पुस्तकं वाचा आपल्यालाही कळुन येइल...
अवांतर-@- ''मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान ''
हे तुमच आवडतं तत्वज्ञान आहे काय? मग त्याच्या विसंगत तुंम्ही स्वतः तरी का वागता? तर्काचा विचार ''यात'' चालत नाही असं म्हणता,तर मग तुमच्या बाबतीतल्या वरील घटनेचा अन्वयार्थ तुंम्ही ''ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?'' असा तर्क बांधुन का बंरं काढता?
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
भूतकाळ की भविश्यकाळ
माझे आजोबा काही दिवसांपुर्वी वारले.
जाण्यापुर्वी काही वेळ मी त्यांच्या जवळच आहे असे त्यांना जाणवत होते. प्रत्यक्षात मी त्या खोलीत सुमारे पंधरा दिवसांनी पोचलो. ते भविष्यकाळात तर जाउन येत नसावेत ?
---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान
हे चित्र
या चित्राची आणखी एक आवृत्ती:

ही चित्रे इथे वा इथे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
मृत्यु !
आपण जस जसे वाढत जातो तस तसे याचे अनेकविध अनुभव आपल्याला येतात अन हलकेच का असेना पण आपल वि़ज्ञान कर्मठ मन स्वतःलाच प्रश्नांची फैर झाडु लागत.
माझ्या आज्जी वारल्या तो क्षण ! सकाळी अगदी संपल सार म्हणुन रडारड झाली पण बस एक मंद श्वास चालु होता. दुपारी अगदी रात्र असल्या सारख सार घरदार झोपी गेल, अर्थात त्यातच मीही. अचानक स्वप्न पडल, एक तुळशी वृंदावन फुटुन माझ्या हाती दागिन्यांची संदुक आल्याच , मी त्या स्वप्नातही त्या संदुकी पेक्षा वृंदावनाच्या फुटण्यान धसकले अन जागी झाले. तशीच वर, जेथे मोठ्या आईंना ठेवल होत तिथे गेले. खोलीत कुणीही नव्हत, सारे काका आत्या, अन वडील सार्या खोल्यां मधुन विखुरलेले. जाउन त्यांच्या कॉट च्या दांड्याला धरुन उभी होते अन बघता बघता आईंचा चेहरा बदलला, वार्धक्यान सुरुकुतलेला तो चेहरा बघता बघता तजेलदार, झर झर बदलत गेला, झटदीशी डोळे उघडले, ( त्या आधी त्या आठ पंधरा दिवस कोमात होत्या) मी पाहिलेले त्यांचे डोळे हे काहीसे पांढरट...पण हे डोळे अगदी ठसठशीत्...पण त्या कुणाकडेही वा कुठेही पहात नव्हत्या. नजर वर्...अन बघता बघता आ वासला गेला , शरीर थोडस वर उचलल्या सारख, छाती पर्यंत , अन त्या तोंडातुन एक दिर्घ श्वास वा आवाज, वा मला नेमक नाही सांगता येत, काही तरी , जणु कुणी त्या आ वासलेल्या तोंडातुन काही ओढुन घेत आहे. अर्ध्या मिनिटाचा खेळ असेल हा सर्व. मी अवाक ! अन त्या परत खाली होत्या तश्या बेडवर, मला आवाज फुटला, आईंनी डोळे उघडले, आईंनी डोळे उघडले ! सारे धावले, पण त्या गेल्या होत्या. का कुणास ठाउक पण अस वाटल नेणार कुणी तरी तिथे होत, अदृष्य !
तेंव्हा हा मनाचा खेळ मानावा की काय हा प्रश्न पडला, पण मग असाच एक प्रसंग पुन्हा आयुष्यात आला. माझ्या मोठ्या आत्या..ज्या रुईया कॉलेज मध्ये इतिहास शिकवत, ब्रेन हॅमरेज नंतर तश्या ठिक झाल्या होत्या. व्यवस्थित चालत बोलत, पण त्यांनी ज्या त्यांच्या एका मुला साठी हा जीव सांभाळला होता तो साधारण रिटार्ड मुलगा अचानक वारला. त्याच्या मृत्युच्या सोळाव्व्या दिवशी या अचानक कोसळल्या, मुंबई ती. लगेच अँब्युलन्स आली अन त्यांना अॅडमिट केल. मी ही तेंव्हा मुंबईतच अन भावाच्या मृत्यु मुळ त्यांच्या कड रहात असलेली, माझी त्यांच्या जवळ बसायला नियुक्ती. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी डोळे उघडले, अन मला म्हणाल्या शंकर मामा आलेत, मग म्हणाल्या सुशी मावशीच्या भाकरी वाजताहेत. आता हे सर्व जण मरुन साधारण दशक लोटलेल. मला भिती वाटली , मी म्हंटल, राहु दे तुम्ही पाणी घ्या थोड , मला म्हणाल्या अग आता नको पाणी ती लोक वरवंटा रेटताहेत. आता मात्र मी घाबरले. पण एव्हढ्या सकाळी घरुन कुणी आल ही नव्हत. त्या सारा वेळ ती दोघेजण वरवंटा रेटताहेत हे सांगत राहिल्या. आणि मग झोपुन गेल्या, सायंकाळी अक्षरशः पल्स नुसती खाली खाली जात राहिली, अन मग एका क्षणी स्थिरावली, तशीच लो पल्स रात्रभर, अन पुन्हा दुसर्या दिवशी सकाळी माझी नेमणुक दवाखान्यात. आज त्यांनी डोळे उघडले अन ती सारी माणस कुठ गेली ? हा पहिला प्रश्न .
त्या नंतर त्या दोन वर्ष राहिल्या, पण एकदाही बोलु नाही शकल्या. एकदाच, त्यांचे अजुन एक नातेवाईक वारले; जे आम्ही त्यांना सांगितल नव्हत, तेंव्हा ते बाहेरच्या खोलीत बसलेत अस म्हणाल्या. पण तिथुन पुढे कधीही वाचेने संभाषण झालच नाही.
अर्थात हे कुठे ऐकिव अस नाही, जे अनुभवल, अन खरच अतर्क्य वाटल ते सांगायचा प्रयत्न.
शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते ।
ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
तुमचे अनुभव खरंच मनात रुतून राहण्याजोगे
आहेत. आपल्याला नजरेला दिसतं आणि तर्काने जाणता येतं त्यापेक्षा बरंच काही आजूबाजूला असू शकेल असं वाटत राहतं हे मात्र खरं आहे.
-रंगा
खूप प्रयत्न करुनसुद्धा
खूप प्रयत्न करुनसुद्धा विश्वास ठेवता येत नाहीये. विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत.
I am in competition with no one. I run my own race. I have no desire to play the game of being better than anyone, in any way, shape, or form. I just aim to improve, to be better than I was before. That's me and I'm free.
- Anonymous
विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत...
अपा जोगळेकर यांचा प्रतिसाद....
.......खूप प्रयत्न करुनसुद्धा विश्वास ठेवता येत नाहीये. विशेषतः पहिल्या अनुभवाबाबत.....
कुणाच्या पहिल्या अनुभवाबाबत म्हणता ?
यात काही गूढ असेलच असं नाही.
यात काही गूढ असेलच असं नाही. पण मरण्यापूर्वी काही लोक एकदम वेगळं काहीतरी बोलतात हे पाहिलेलं आहे.
माझी आजी माझ्या घरीच असताना गेली. ती अनेक दिवस हाल सोसून गेली. शेवटी ती वेळ जवळ आली आहे असं आम्हाला नक्की कळलं होतं. तरीही त्यानंतर सात दिवस ती जगली. त्यावेळी तिच्या असंबद्ध बोलण्यात शेतजमिनीचे संदर्भ यायचे. चल लगेच तिकडे जाऊन येऊ शेतावर.. इथेच जवळच तर आहे गाव वगैरे असं ती म्हणायची.
आमची शेतजमीन ३० वर्षे कोर्टप्रविष्ट होती आणि त्यामुळे ती आमची नव्हतीच. नंतर ती गेल्यातच जमा असल्याने तिचा नाद सर्वांनीच सोडून दिला होता. त्यानंतर वडील, आजोबा असे सगळेच स्वर्गवासी झाले. आजी एकटीच उरली होती. तिला बहुतेक त्या शेतजमिनीचं मनात राहिलं असावं. ती गेल्यावर एका वर्षातच त्या केसची तारीख पडल्याचं मला योगायोगाने कळलं.. (मूळ व्यक्तींपैकी कोणीच हयात नाही आणि पत्ताही सत्रांदा बदललेला). आणि एकाच तारखेत निकाल लागून जमीन परत मिळून गेली. आजी मात्र ते पहायला नव्हती.
नंतर नंतर शेवटचे दोनतीन दिवस इथे अनेकांनी उल्लेख केल्याप्रमाणे तंतोतंत ती सर्व मृत लोकांशी तपशीलवार बोलत असताना ग्लानीअवस्थेत दिसायची. तिची दोन्ही मुले अकाली गेली होती. त्यांच्याशी म्हणजे माझ्या बाबा आणि काकांशी ती बोलत असायची. तू माझ्याआधी कसा गेलास रे वगैरे असं.
आणखी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे (मृत व्यक्तींपैकी पण तिच्या दृष्टीने सत्य) कोणीकोणी इथे आले आहेत, त्यांना चहा कर, भात टाक वगैरे असं बर्याचदा झालं होतं.
हे सर्व मी पूर्वी इतरांबाबतीत ऐकलं पाहिलं असल्याने मला त्यात काही अनएक्स्प्लेनेबल वाटलं नाही. तिच्या मेंदूला रक्तपुरवठा अत्यंत कमी झाला होता. त्यामुळे मेंदूचं काम बिघडून भास होणं ही सरळ शक्यता नाकारुन काहीतरी अतींद्रीय असेल असं मला त्यावेळीही वाटलं नाही आणि आताही वाटत नाही. शिवाय माझ्या आजीच्या दीर्घायुष्यामुळे (सुमारे ८५) तिच्या आठवणीतले आणि सोबतचे (अतएव भासांमधे जाणवू शकणारे) जास्त लोक ऑलरेडी मृत आणि फार कमी लोक जिवंत होते हीदेखील लक्षात घेण्याजोगी बाब आहे.
साधारण मरणार्या व्यक्तीबाबत गूढ अनुभव यांच्याबाबतीत खालील गोष्टी होत असाव्यात:
१) व्यक्तीच्या मरणाचा एक करुण पडदा या अनुभवकथनाच्या पार्श्वभूमीवर असल्याने त्याला एक सहानुभूती आपोआप मिळते
२) आता ती व्यक्ती हयात नसल्याने तर्क/वाद/प्रतिवाद यांचा प्रश्नच नसतो. मृताविषयी जास्त विश्लेषण नकोच म्हणून.
आपल्याला एक्स्प्लेन करता येत नाही अशा असंख्य गोष्टी जगात आहेत. देव, आत्मे वगैरे सगळं असू शकेल. पण हा प्रकार त्यातला वाटत नाही असं मत मांडू इच्छितो.
त्यापेक्षा गूढ अशा अनेक गोष्टी आपल्या जिवंतपणीच घडत असतात, पण त्या किती विलक्षण गूढ आहेत हेच आपल्या लक्षात येत नाही. आपलं जिवंत असणं आणि जिवंत राहाणं हे त्यापैकी एक. त्यामागे असलेली शरीरयंत्रणा.
गर्भावस्थेत हृदयाची ठकठक पहिल्यांदा सुरु होते तो क्षण आणि त्यामागची प्रेरणा.. अशा असंख्य गोष्टी जास्त गर्द गूढ आहेत.
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
व्वा. तर्कशुद्ध प्रतिसाद
व्वा. तर्कशुद्ध प्रतिसाद आवडला.
I am in competition with no one. I run my own race. I have no desire to play the game of being better than anyone, in any way, shape, or form. I just aim to improve, to be better than I was before. That's me and I'm free.
- Anonymous
छान प्रतिसाद!
या निर्जीव विश्वात जिवंतपणा हाच चमत्कार आहे. पण आपण तो इतका गृहीत धरतो की त्यात काही विशेष आहे असे आपल्याला वाटत नाही.
निर्जीव विश्व? ते कसं काय बॉ?
निर्जीव विश्व? ते कसं काय बॉ? निसर्गात तर सतत काही ना काही घडतच असते आणि ते निर्जीव असते तर काहीच घडले नसते...माणसाचा मेंदू जरा जास्तच काम करत असल्याने असले काय काय अनुभव येतात अन शिवाय ते असे दुसर्यांना सांगता येतात.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
निर्जीवच.
पृथ्वी सोडून इतरत्र जिवंतपणाची खूण अजून सापडलेली नाही. अब्जावधी ग्रह-तार्यांमध्ये जिवंतपणाचे प्रमाण अतिनगण्य आहे.
<<<पृथ्वी सोडून इतरत्र
पृथ्वी सोडून इतरत्र जिवंतपणाची खूण अजून सापडलेली नाही. अब्जावधी ग्रह-तार्यांमध्ये जिवंतपणाचे प्रमाण अतिनगण्य आहे.
अजुन हा शब्द महत्वाचा आहे. विश्वाचा पसारा प्रचंड आहे आणि अजुन मानवाचे यान त्याच्या सुर्यमालेबाहेर गेले नाही; जिथे पृथ्वी अन त्यावरील जिवजंतु निर्माण करण्याची उर्जा आहे ते निर्जीव कसे?
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
>>जिथे पृथ्वी अन त्यावरील
>>जिथे पृथ्वी अन त्यावरील जिवजंतु निर्माण करण्याची उर्जा आहे ते निर्जीव कसे?
आपण रूढार्थाने ज्याला जिवंत असणे म्हणतो त्याबद्दल मी बोलतोय. सजीव निर्माण करण्याची ऊर्जा आहे म्हणून विश्व निर्जीव नाही असे म्ह्टले तर माणूस कधी मरतच नाही असे म्हणावे लागेल. कारण, त्याची ऊर्जा आणि शरीरघटक अस्तित्वात राहतातच.
इतरत्र जीवसृष्टी सापडली तरी प्रत्येक ग्रहगोलावर सजीव नसल्याने विश्व हे मुख्यतः निर्जीवच म्हणावे लागेल.
ओ मॅडम!
सुर्यमालेची डेफिनीशन जरा प्राब्लेमाटिक आहे, पण आमचं पह्यलं वोयाजर गेलंकी कवाच प्लुटो फिटोच्या फुडं!! फकस्त निरीक्षण नोंदवून राह्यलो, बाकी ते तुम्हा दोघांचं चालूंद्या.
-Nile
तुमचा नाय गेल
तुमचा नाय गेल भायेर ? आमचं तर गेला होतं की वो, पर दोन क्वाटर ज्यास मारायला लागलं इतकच.
माझ्या आजीनं (आईची आई)
माझ्या आजीनं (आईची आई) होळीच्या दिवशी पुरणपोळी मन लावून खाल्ली आणि पुढच्या होळीला ती नसणार हे (तब्येत ठणठणीत असताना) जाहिर केलं होतं. पुढं दोनेक दिवसातच काहीही झालेलं नसताना अचानक गेली. ती गेल्या दिवशीचे सोपस्कार उरकून आई घरी आली आणि रात्रभर दोघी मायलेकी गप्पा मारत होत्या. मी शेजारीच झोपलेली असून काही समजले नाही पण आई जागी असल्याचे मात्र माहीत होते. दुसरी आजी मात्र हाल सोसूनच गेली पण माझ्या आईकडून खूप सेवा करून घेतली. काही काळजी वाटत असेल तर मला कधीही बोलव असं आईला निवर्तण्याच्या आधी सांगून गेली होती.
एकदोन वेळा काही काळज्यांनी आई रात्री जागी असताना आजीची आठवण आली तर ही दाराशी बसून जप करताना आईला दिसली. मला सांगितल्यावर अंगावर सरसरून काटा आला. वरच्या दोन्ही घटनांमध्ये आधी गेलेल्या कुणाशी बोलणं झालं होतं की नाही हे माहित नाही पण हे अगदी घरात घडलेले प्रसंग आहेत. मला समजल्यावर अजूनही घाबरायला होते.
धन्यवाद.
रोज तुमचा एकतरी विचार करायला लावणारा, एक वेगळीच दृष्टी देणारा लेख मिपावर येतोच. त्याबद्दल तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
काहीतरी गुढ असावेच..
विश्वास ठेवावा की नाही हेच कळत नाही..
माझ्या आई वडिलांबाबत असेच झाले. वडिल गेल्यावर १५ दिवसांत आई गेली. जायच्या आधी आई दोन दिवस ग्लानीतच होती. त्यावेळी मला म्हणायची की तुझे बाबा आहेत येथे..तसेच दादा (म्हणजे आईचे वडिल) पण आहेत..
त्यावेळी वाटत होते की तापातच बोलत असेल..
माझ्या आईला खुप स्वप्ने पडायची. दर महिन्या दोन महिन्यातून कोणतरी गेलेली व्यक्ती तिच्या स्वप्नात येऊन काहीतरी सांगायची..त्यामुळे मला आईच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिचे असे सांगणे म्हणजे नेहमीचाच प्रकार वाटला होता.
थोडे अवांतर :
माझ्या बाबांची आई माझे बाबा लहान असतानाच गेली. पण ती मात्र माझ्या आईच्या स्वप्नात यायची. माझ्या आईने तिचा (म्हणजे तिच्या सासूचा) फोटो पण पाहिला नव्हता पण त्या कश्या दिसतात हे सर्वांना सांगितले होते. असे बरेच गेलेले नातेवाईक आईच्या स्वप्नात यायचे आणि बरेच काही सांगायचे. जसा जसा मी मोठा झालो, तसे मला आईचे ते स्वप्नांबद्दल सांगणे या गोष्टी म्हणजे तिच्या मनाचे खेळच वाटायचे. . म्हणूनच आईच्या शेवटच्या दिवसात यावर विश्वास बसला नव्हता. पण आज इथे बाकीच्या लोकांचे अनुभव वाचून असे वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी...
योगी९००
अनुभव वाचून वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी...
आज इथे बाकीच्या लोकांचे अनुभव वाचून असे वाटले की त्यात निश्चित काही सत्यता असावी...
------ मलाही असेच वाटते.
सत्यासत्यता
अशा गोष्टींत तथ्य असते की नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. कदाचित, वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे ती केवळ मनाची स्थिती असेल. पण अशाप्रसंगी आपण दु:खी असतो. सारासार विवेक दूर ठेवलेला असतो. जाता जीव जातो पण विचार करायला आपल्याला मागे ठेवतो. अशावेळी, त्या जिवांना तारून नेणारे, सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे या विचाराने आपल्याला दिलासा मिळत असेल तर तो मिळवावा असे वाटते.
हे एकदम बरोबर
अशावेळी, त्या जिवांना तारून नेणारे, सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे या विचाराने आपल्याला दिलासा मिळत असेल तर तो मिळवावा असे वाटते.
+१०००००००० या वरील वाक्याने मला खरोखर दिलासा मिळाला.
असे कोठेतरी वाचले की गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते की आपण हे जग सोडले आहे. किंवा ती व्यक्ती हे मानायला तयार नसते की आपले निधन झाले आहे...त्यामुळे त्याला समजावयाला त्याचे जवळचे आधी गेलेले मित्र, नातेवाईक त्याला येऊन भेटत असावेत.
योगी९००
गेलेल्या व्यक्तीला कळतच नसते
हा हा हा तूम्ही नाइट शामलन चे चित्रपट फार मनावर घेता बूआ
तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते 
अवांतर:- जन्माला आल्यावर अस्तित्वात आलो आहोत याचीच मूळात जाणीव/स्मृती नसते. तसं काही मेल्यावर होतं काय ?
We are who we are!
वेलकम टू द मॅट्रिक्स!
वेलकम टू द मॅट्रिक्स!
बिपिन कार्यकर्ते
@---''तस या न्यायाने
@---''तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते''---@
या टाकलेल्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या ।ह्ही ह्ही ह्ही .....हा हा हा। (आसूरी आनंद झाल्याची स्माइली)
igsmile:
वाहव्वा,,,क्या विकेट निकाल्या है,आत्मशून्य .....वो मौके पे चौका मार रहे थे,लेकीन तुमने तो उनकी तीनो डंडीयां उडा दी...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
आत्म शून्य यांच्या प्रतिसादात
आत्मशून्य यांच्या प्रतिसादात खालील दोन्ही वाक्ये आहेतः
....तस या न्यायाने व्यक्तीला कळलच नाही पाहिजे की त्याचा जन्म झालाय ते ....
आणि
..... जन्माला आल्यावर अस्तित्वात आलो आहोत याचीच मूळात जाणीव/स्मृती नसते......
चित्र गूप्त साहेब, ती दोन
चित्र गूप्त साहेब, ती दोन वाक्ये जाणिवपूर्वक टाकली आहेत आणि समान वाटत असली तरी फरक आहेच. आणि कूठेतरी माझ्या मनातल्या शंकेला वाटही देतोय....
फरक हा की नवजात बालक स्वतःला मृत मानत/घोषीत करत नसतं(मृत प्रिटेंड करत नसतं) तर शारीरीक द्रूश्ट्याच त्याच मन कोणताही विचार करायला, समजायला वास्तवाचे संपूर्ण भान यायला अपरीपक्व व दूर्बळ असतं. पण मृत झालेल्या व्यक्तीच्या मनाचा आधीच पूरेसा विकास झालेला असेल तर तो मेल्या नंतरही स्वतःच जड शरीर तितकच जिवंत समजत असेल असं वाटत नाही.
असं म्हणतात की मेल्या वर आधी बाकीचे सर्व सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात...
ही गंमत आहे खरी... म्हणजे असं बघा की तूम्ही स्वतः अद्रूश झालात तर तूम्ही आंधळेही बनणार. कारण नीयमच असा आहे की जर द्रूष्टी पटलावर प्रकाश कीरणे आदळतात व त्याचे ज्ञान आपल्या मेंदूला म्हणजेच आपल्याला होते. पण जर ही प्रकाश किरणे द्रूष्टी पटलाला न थडकता त्याच्या पलीकडे आर पार गेली तर आपल्याला काही दिसणारच नाही म्हणजेच आपण अद्रूश्य असू तर आंधळेही बनू. हीच गोश्ट मृत्यूमूळे इतर सर्व ज्ञानेंद्रीयांबाबत लागू पडते.
आणि शंका ही की आता शरीर गेले तर आपण संवेदनाहीन बनणार यात संशय नाय.. पण जर जागृत मनाचं अस्तीत्व मृत्यूनंतरही रहात असेल तर असं काही घडायची शक्यता नाही कारण.. आपलं मन आपल्याला स्वप्नात गूंगवून ठेवायला पूरेसं आहे, जे आपण सत्यच मानत राहू वा थोडक्यात आपल्याला शरीर आहे असं भास निर्माण करायला पूरेसं आहे ... आपले मृत नातेव्वैक व इतर लोकही भेटवायला पूरेसं आहे... मग मृतच लोक का व कशाला ? जर खेळ केवळ मनाचा आहे तर ते जिवंत लोकही भेटवू शकेल ना... थोडक्यात बिकांनी मस्त प्रतीक्रीया लिहली आहे वेलकम टू द मॅट्रिक्स!
We are who we are!
लकम टू द मॅट्रिक्स! म्हन्जे
लकम टू द मॅट्रिक्स!
म्हन्जे काय?
***************************************
- मन्या फेणे
आवं स्पाजी पायलं नाय व्हं का
आवं स्पाजी पायलं नाय व्हं का तुमी... म्याट्रिक्स नावाचा एक प्हारीनचा पिक्चर हाय... बगायचा म्हंजी काय सांगू अगदी मेंदूच्या नानाची टांग... झिणझिण्याच यावा डोस्क्यालाच...
स्पा, परत भेटशील तेव्हा सांग,
स्पा, परत भेटशील तेव्हा सांग, देतो कॉपी करून.
बिपिन कार्यकर्ते
थांबवा!
तुमच्या सारख्या वयोवृद्धांनी अश्या कॉप्या करणं थांबवलं नाही तर तुमच्या नातवंडासमान असलेल्या स्पाच्या पिढीने तुमच्याकडून शिकायचं तरी काय? थांबवा आता असल्या गोष्टी अन तरूणांपूढे काहीतरी चांगले आदर्श ठेवा!
-Nile
>>> प्रियाली: सोबतीला आलेले
>>> प्रियाली: सोबतीला आलेले जिवाभावाचे त्यांच्यापाशी कोणीतरी आहे....
असे म्हणतात की मानवाला एकटे आवडत नाही. अगदी मरतांना देखील कुणीतरी जवळ हवे असावे असे त्याला वाटते.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि
मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि कंट्रोल्स जातात आणि ऐकू येण्याचे सर्वात शेवटी थांबते असं कुठेतरी ऐकून/वाचून अंगावर काटा आला होता.. म्हणजे आपण अचेतन आणि दृष्टीहीन असू..आणि आपल्या आजुबाजूचे प्रियजन शोक करायला लागल्यावरही ते मरता मरता काही काळ ऐकू येत असेल?
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
मरताना आधी बाकीचे सेन्सेस आणि
मिपा वर एखादा आय-डि बॅन होतो तेव्हा असाच काहीस होत असाव अशी दाट शंका आहे. तुम्ही सर्व वाचू शकता परंतु तुमचा आवाज कोणी ऐकू शकत नाही
अवांतर :- लोक इकडे इतकी सेंटी का मारुन रहालेत जे व्हायच ते होणारच आहेत
पण हा धागा अतिशय मनोरंजक आहे हे मान्य करावाच लागेल.
हा हि एक अनुभव !
माझी आई [ मृत्यु समयी वय - ८६] जेव्हा अखेरची आजारी होती ( काळ - ६ महीनें ) तेव्हा तिला सतत भास होत असत. समोर अस्तित्वात नसलेली माणसे दिसायची.
डॉक्टरांच्या मते याला हेलिस्युलेशन असे म्हणतात. मेंदुला रक्त पुरवठा कमी झाल्यास असे होवू शकते.
एकुण हा विषय मनोरंजक + ज्ञानवर्धकही आहे.
लगे रहो !
अनुभव! अनुभव!! अनुभव!!!
तुम्ही उल्लेख केलेल्या तीनही अनुभवांमधे मला गूढ काही फारसे वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळच्या शारिरीक अवस्थेप्रमाणे काही भास होणे, जुन्या आठवणी अचानक जागृत होणे वगैरेचे काही स्पष्टीकरण शक्य आहे. तसे असेलच असे नाही, पण एक शक्यता म्हणून नक्कीच प्रबल आहे. पण तुम्ही माझ्या 'फेड' या कथेबद्दल विचारले आहे त्याबद्दल मात्र मला अजूनही काही स्पष्टीकरण सुचत नाहीये. ती घटना साक्षात माझ्याच घरात खरोखर घडलेली आहे. ज्याक्षणी काकाने तिकडे गावाला पैसे चुकते केले त्याचवेळी साधारण आजी (जिच्या हातापायाच्या काड्या झाल्या आहेत आणि खूपच अशक्त झाली आहे) उठून सरळ बाथरूम मधे गेली. भरलेली पाण्याची बादली उचलून डोक्यावर उचलून उपडी केली आणि बाहेर आली. काकूला म्हणाली "संपलं गं सगळं! फिटलं!" ... त्यानंतर बर्याच वेळाने काकाचा फोन आला गावावरून की पैसे दिले आणि कर्ज फिटल्याचं कबूल करून घेतलं म्हणून.
अजून एक अनुभव आहे. हा माझा नाही पण ज्यांना आला त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेऊच शकत नाही. एक अतिशय उच्च अध्यात्मिक अधिकार असलेली व्यक्ती मुंबईमधे देह सोडती झाली. त्याचवेळी, मुंबईपासून अतिशय दूर असलेल्या एका गावात जिथे त्या व्यक्तीच्या सद्गुरूंचे समाधीस्थान होते तिथे सकाळची काकडआरती चालू होती. तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला मृत पावलेली व्यक्ती देवळाच्या दारात उभी राहून आरतीला टाळ्या वाजवून आणि मग नमस्कार करताना दिसली. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ते आजारी होते हे सर्वश्रुत होते आणि त्याकाळी (१९६७ साली) मुंबईहून तिथे जायच्या सोयीही फार नव्हत्या. ती व्यक्ती थोडा वेळ तिथे थांबली आणि एकदम दिसेनाशी झाली. २-४ तासात तार आली तेव्हा त्यांच्या मृत्युबद्दल सगळ्यांना कळले.
या सगळ्याबद्दल सकृद्दर्शनी तरी काही संगती लागत नाही! आता कोणी भास, योगायोग वगैरे म्हणेल तर मग असोच!
बिपिन कार्यकर्ते
हम्म
'चित्रगुप्तां'नी असा धागा काढावा याची गंमत वाटली.
तुम्ही उल्लेख केलेल्या तीनही अनुभवांमधे मला गूढ काही फारसे वाटले नाही. त्याचे कारण म्हणजे, त्यावेळच्या शारिरीक अवस्थेप्रमाणे काही भास होणे, जुन्या आठवणी अचानक जागृत होणे वगैरेचे काही स्पष्टीकरण शक्य आहे.
असेच म्हणते.
माणसाच्या इच्छा या सर्वाधिक प्रबळ असतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे असे काहीतरी होत असावे. स्वप्नी म्हणजे स्वप्नावस्था - असेच असले पाहिजे असे नाही. कुठच्यातरी वेगळ्या मानसिक स्थितीत सध्याची स्थितीची जाणीव लुप्त होत असेल. इ. इ.
अवांतरः माझ्या लहानपणी माझी एक मावस आजी असे म्हणे की तिला भुते दिसत, आणि ती वार्यासारखी असतात. तिच्याकडून भुते पाहिल्याचा एखादा किस्सा ऐकला आहे. पण तिला एकदा विचारले की तुला भिती नाही का वाटली तेव्हा तिने मला उत्तर दिले की जिवंत माणसे भुतांपेक्षा भयंकर असतात. आता त्यात तथ्य वाटते.
चित्रगुप्त जी धागा आवडला
ह्या धाग्यावरील काही प्रतीसाद ही तितकेच खिळवुन ठेवणारे आहेत.

मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो पण कधीच भिती वाटली नाही उलट पक्षी कुतुहलच आहे की आता पुढे काय?
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
आपली स्वप्नावस्था कूतूहल चाळवते आहे थोडं विस्तारून सांगाल काय
मला स्वतःला लूसीड ड्रीमिंगचा (मराठीत त्याला जागृत स्वप्न म्हणायच का ?) सराव आहे अनूभव आहे, याची संपूर्ण वैधता विज्ञानही मान्य करतं. त्यामधे खरोखर केवळ आश्चर्य म्हणता येइल असे भास (स्वप्न) निर्माण करता येतात पण मी त्या अवस्थेची तूलना मृत्यू वा प्रत्यक्ष अॅस्टल बॉडी प्रोजेक्शन सोबत कंपेअर करू शकत करू शकत नाही कारण तसा अनूभव घेता येतो पण एक महत्वाचा फरक आहे. लूसीड ड्रीमिंगमधे माझा मेंदू काम करत असतो, शरीरात रक्ताभीसरण चालूच असते. मृत्यू याच्या उलट आहे.
We are who we are!
तुम्ही जे स्वप्नात बघता
तुम्ही जे स्वप्नात बघता त्याचा फोटो कसा काय काढला ? आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा द्याल का ?
कॉपी इमेज लोकेशन करुन पाहिले तेंव्हा इमेजचे नाव just-before-death.jpg असे आहे हे कळले.
माफ करा पण या धाग्याशी संबंधित नावाचे चित्र शोधून ते डकवले तर नाही ना ?
I am in competition with no one. I run my own race. I have no desire to play the game of being better than anyone, in any way, shape, or form. I just aim to improve, to be better than I was before. That's me and I'm free.
- Anonymous
आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा
अप्पा जोगळेकर यांचा जयपाल यांना प्रश्नः
तुम्ही जे स्वप्नात बघता त्याचा फोटो कसा काय काढला ? आंतरजालावरुन घेतला असल्यास त्याचा दुवा द्याल का ?
हा घ्या दुवा:
http://joanofarc86.blogspot.com/
मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो ....
जयपाल यांच्या प्रतिसादात त्यांनी एक चित्र दिले आहे, आणि म्हटले आहे की "मी अनेकदा माझ्या स्वप्नात हे बघतो" ....
....याबद्दल जरा जास्त तपशील, माहिती द्यावी, ही विनंती.
म्हातार्या अन मरणोन्मूख
म्हातार्या अन मरणोन्मूख लोकांच्या फँटसींबद्दलची एव्हढी चर्चा वाचून..आपलं ते... पाहून ड्वाळे पाणावळे!
“For me, it is far better to grasp the universe as it really is than to persist in delusion, however satisfying and reassuring.”
- Carl Sagan
-Nile
:)
Imagination is more important than knowledge- Albert Einstein
We are who we are!
आंधळ्याचा चष्मा...
१. “Imagination is more important than knowledge. For knowledge is limited to all we now know and understand, while imagination embraces the entire world, and all there ever will be to know and understand.”
२. delusion: A false belief strongly held in spite of invalidating evidence, especially as a symptom of mental illness: delusions of persecution.
३.imagination :the faculty or action of producing ideas.
Get well soon, O deluded mind.
-Nile
डोळसपणाचि नाटकं....
Good to see finally you trying to find your own cure... Let me know if I could help you. Google is not enough, neither knowledge without wisdom.
We are who we are!
हॅ हॅ हॅ.
तुमची गरज नाही. शून्यात अडकून पडायचं नाहीए आम्हाला. बाकी तुम्हाला क्यूअर काय सापडेल असं वाटत नाही. काळजी घ्या.
-Nile
अनैसर्गिक आणि अकाली मृत्यू
हा सगळा धागा काल रात्री वाचला, अन् झोपताना अंगावर काठा उभा राहिला. (मी अजून तसा अनुभव घेतलेला नाही, म्हणून असेल कदाचित) ह्यात ब-याच जणांचे अनुभव कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत. एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का? कारण वरील सर्व अनुभव वृद्धापकाळातील नैसर्गिक मृत्यूशी निगडित आहेत. अनैसर्गिक, अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत.
अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत
सुधीर यांनी अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत, असे विचारले आहे.
वरील मूळ लेखात घटना क्र. ३ मधील तरूण विशीतीलच होते:
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
मानसीक
घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.
याला त्या मुलाची मानसीक स्थिती जबाबदार असू शकते, नव्हे तर तेच कारण असावे असे वाटते.
जिवाभावाच्या ३ मित्रांना डोळ्यादेखत अपघातात मृत्युमुखी पडताना बघून त्या तरूणाच्या मनावर (की डोक्यावर?) त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तो सतत त्यांच्याच विचारात राहून तशी बडबड करत असेल आणि एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार.
अवांतरः अपघातात वाचलेला तरूण नंतर दगावला यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
..... यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली....
..... यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली....
व्वा.... तर मग येउ द्या ना या सिनेमाचे परिक्षण. वाचायला नक्कीच आवडेल, आणि या विषयावर आणखी जरा प्रकाश पडेल.
मेंदूला विचार असह्य होवून काम करायचा थांबला, तर मनुष्य मरतो ?
चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार"
......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट? भोवळ वा चक्कर येणे, बेशुद्धावस्था वा कोमात जाणे, असले काही न होता? मग योगी मंडळी समाधीत जातात तेंव्हा काय होते? 'जीव जाणे' आणि 'प्राण जाणे' हे वेगवेगळे असते म्हणतात, ते नेमके काय?
वेगवगळ्या वेळी आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील विविध स्थितीत मनुष्याची संवेदनशीलता व ग्रहणक्षमता वेगवेगळी असते, असे दिसते. अर्भकावस्था व मृत्यूच्या उंबरठ्यावरील अवस्था, यात काय काय जाणिवा होत असतात, हे जाणणे तसे कठीणच.
Dr. Brian Weiss यांचे Many Lives, Many Masters' हे पुस्तक वाचावे, असा आजच सल्ला मिळाला आहे. कुणी वाचले असल्यास या पुस्तकाची ओळख करून द्यावी.
मेंदू
चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार"
......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट?
ते वरचं वाक्य मी लिहिलंय म्हणून मी उत्तर देत आहे
ते वाक्य लिहिल्यानंतर 'असा माझा अंदाज आहे.' हे वाक्य लिहायचे राहून गेले. मला वैद्यकिय क्षेत्रायलं ज्ञान शून्य आहे. त्यामुळे असह्य मानसिक ताणामुळे मेंदूवर नक्की काय परिणाम होत असावा याची माहिती नाही. पण ऐकीव माहितीनुसार (ही माहिती धडधडीत चुकीची असू शकते) अश्या ताणामुळे ब्रेन हॅमरेज का नर्व्हस ब्रेकडाउन होवून जीव दगावू शकतो, असे वाटते.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती
एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का?
१ मे, २००९ या दिवशी महिपतगड येथे मला स्वतःलाच (वय २० ते ३० च्या मधेच) मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा अनुभव आलेला आहे. मला तरी अशा प्रकारचा कोणताही अनुभव आला नाही. संकटातून बाहेर पडल्यावर २-३ मिनिटे काही सुचत नव्हते आणि कपाळावर घाम डवरला होता. कोणतीही अतींद्रिय घटना घडली नाही की कोणतेही पूर्वज भेटायलासुद्धा आले नाहीत. आणि माझ्यावर कोसळलेले संकट ज्यांनी पाहिले त्यांनादेखील असे काही जाणवले नाही.
I am in competition with no one. I run my own race. I have no desire to play the game of being better than anyone, in any way, shape, or form. I just aim to improve, to be better than I was before. That's me and I'm free.
- Anonymous
मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा अनुभव
तुमचा अनुभव हा 'मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा' अनुभव आहे.
मी दिलेल्या तीन घटना व अन्य प्रतिसादातील उदाहरणे प्रत्यक्ष मृत्यूची आहेत.
यावरून असे म्हणू शकतो, की मनुष्याची खरोखरच प्रत्यक्षात मरणाची वेळ येते, तेंव्हाच असे अनुभव येतात.
या विश्वाच्या विराट योजनेत/पसार्यात मनुष्याला अद्याप अज्ञात अशी कोणकोणती रहस्ये आहेत, हे सांगणे ती जोवर प्रत्यक्ष ज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत, तोवर अशक्य. परंतु अश्या अनुभवांवर संशोधन करण्याऐवजी वा संशोधन करण्यापूर्वीच नाकारणे, ही सुद्धा एक अंधश्रद्धाच म्हणावी लागेल.
सुमारे वीस वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एका तरूण मुलीला एखाद्या व्यक्ती बद्दल असे स्वप्न पडायचे, की त्याच्या भोवती पांढरे बुरखे घातलेल्या व्यक्ती बसल्या आहेत. हे स्वप्न काही दिवस रोज दिसायचे, आणि लवकरच ती व्यक्ती मृत व्हायची.तिला खूप भिती वाटायची या सर्व प्रकाराची. ती अगदी सरळ स्वभावाची, साधी मुलगी होती, अविश्वास करण्याजोगे तिचे व्यक्तिमत्व नव्हते. आता ती कुठे आहे, ठाऊक नाही.
भेंडी!!!! आपण तर मरताना*
भेंडी!!!! आपण तर मरताना* स्वतःचं संपूर्ण व्हिडिओ (विथ ऑडिओ) शूटिंगच करणार ब्वॉ. उगाच नंतर वरती अनेकांनी लावल्यात तसल्या थापा माझ्या नावाने कोणी खपवायला नकोत!!
*जास्त आगावूपणा करून कधी हा प्रश्न विचारू नये.
-Nile
ब्याटरी नीट चार्ज करणे!
डॉकिन्स काकांची लय भारी आयड्या आहे ही!
@ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न
@ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न विचारायचा नाही हे मान्य, पण माझं तर ठरलेलं आहे आणि मला माहित पण आहे, त्यावेळी अशी काही शुटिंगची सोय वगैरे करता येईल का, अर्थात त्यावेळि कुठं कसा आणि का असेन हे माहित नाही, आज तरी.
तोपर्यंत संपर्क राहिला तर महिनाभर आधी फोन करेन तुम्हाला, हां फक्त त्या शुटिंगचे अधिकारविक्रीतुन आलेल्या रकमेपैकी ५०% रक्कम माझ्या वारसांना द्यावि लागेल.पण शुटिंगसाठी कुणि खर्च करणार नाही.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
शूटिंग
@ निळे, शूटींगसाठी प्रेक्षक म्हणून हौशे, नवशे, गवशे लागतीलच, तेव्हा आम्हाला पण बोलवा त्यासाठी, मानधन वैग्रे काही नको, फक्त जायचे यायचे भाडे आणि फस्क्लास जेवण असू द्या.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
त्या कुठल्याश्या
त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या नटीने असेच काहीसे केले होते. त्यातून काही क्लु लागतो का ते बघ रे निळ्या. आपणही तुझे अगदी तस्सेच करु. (तिने भारी जेवण दिले होते म्हणे
)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"A government is the most dangerous threat to man’s rights: it holds a legal monopoly on the use of physical force against legally disarmed victims."
Capitalism: The Unknown Ideal- Ayn Rand
'त्या कुठल्याश्या
'त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या ' - त्या कुठल्याश्या हॉलिवुडमधल्या म्हणजे किती हॉलिवुड आहेत असं म्हणायचं आहे तुम्हाला श्री. अन्या दातार.
आणि ती नटि कोण हे सांगा की, कारण हॉलिवुडमधल्या नट्या ब-याच गोष्टींच शुटिंग करुन ठेवतात असं ऐकलं आहे.
http://harshad-gaaanikha.blogspot.com/
आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.
आता
आता ते निळेरावांनाच माहिती असेल ना हो ५०, त्यांचा हॉलिवूडबाबत बराच अभ्यास आहे म्हणे.
-------------------------------------------------
अतिदानाद्बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधन:।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत्।।
डील!!
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना अन पर्यायाने संपादकांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत.
-Nile
आपुले मरण पाहिले म्या डोळा....
मित्र हो,
या विषयावर चित्रगुप्तांनी मला म्हटले होते की प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
खरे तर माझा हा विषय नाही.
म्हणून मी माझ्या वाचनातील एका पुस्तकाचा संदर्भ देत आहे तो वाचकांना आवडेल.
'मनुष्य मेल्यानंतर संपतो हेच करे असून त्याचा आत्मा उरतो हे म्हणणे खोटे आहे' असे म्हणणाऱ्या जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे. (असा करार करून दिलेला संदेश - म्हणजे मरणोत्तर आत्मरुपाने असे अस्तित्वात असल्याचा हुदिनीने आपल्या पत्नीला सादर केलेला पुरावा - हुदिनीने फोर्ड या माध्यमा मार्फत दिलेला संदेशच होता.)
येथे असाच करार करून मेलेल्या व मरणोत्तर आपण आत्मा म्हणून अस्तित्वात असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या एका प्रसिद्ध चित्रपट लेखकाचे अलिकडील उदाहरण देत आहे.
"डॉ. झिवॅगो (१९६५) व ए मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६६) या प्रसिद्ध ऑस्कर विजेत्या चित्रपटांचा कथा लेखक रॉबर्ट बोल्ट हा नास्तिक होता. तो फेब्रुवारी १९९५ साली वयाच्या ७०व्या वर्षी वारला. त्याच्या पत्नीच्या कथनानुसार तिने आपले (मृत्युनंतर आत्मा उरतो) हे म्हणणे खरे असेल तर आत्म्याच्या रुपाने परत येऊन ते आपल्यापुढे पुराव्यानिशी सिद्ध करावे असा आपल्या पतीशी करार केला होता आणि आश्चर्य म्हणजे त्या करारानुसार मेल्यानंतर तिचे म्हणणे खरे असल्याचे पुरावे तिला दिले. उदा. तो मेल्यानंतर घरातील वस्तू आपोआप इकडच्या तिकडे विचित्र रितीने स्थलांतर करीत असत. तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई. 'अशा घटना हल्ली वरचेवर घडत असून मी घरात एकटी नाही, नवरा माझ्या अजून सोबतीला आहे' असे बोल्टची विधवा पत्नी सर्रा माईल्स म्हणते. Ref. (Indian Express, Sunday, November 1995.)
संदर्भ - विज्ञान आणि चमत्कार (पान २२७ व २२८) लेखक प्रा. अद्वयानंद गळतगे.
वैचारिक रंगित खाद्य - 'मृतात्मा' हा शब्द कर्मधारय समास आहे कि षष्ठीतत्पुरुष समास आहे? तज्ञांनी आपली मते मांडावीत...
परलोकाच्या म्हणजे स्वतंत्र अतींद्रिय जगाच्या अस्तित्वाचा पुरावा देणारे संदेशही काही वेळा मृतात्म्यांकडून मिळतात.
शशिकांत
मो. क्र - 0९८८१९०१०४९
या!
आलात? चित्रगुप्तांनी आमंत्रण देऊन बोलावले आणि तुम्ही आलात म्हणजे या धाग्याचे खरे सार्थक झाले.
>>तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई.
हाहा. ही आयडीया मस्त आहे.
मरावे परी दारू पीण्या उरावे.
चित्राच्या शरीरात वेगळा आत्मा
वरला प्रतिसाद वाचून उगीच मला चित्राच्या शरीरात नाईल, परा किंवा तत्सम प्रभृतींचे आत्मे घुसल्यासारखे वाटले.
ह्म्म. दारु अदृश्य होऊन कुठे
ह्म्म.
दारु अदृश्य होऊन कुठे जात असेल? नाही म्हणजे दृश्य दारु अदृश्य व्यक्तीने प्यायल्यावर ती त्याच्या अदृश्य शरीराचा स्पर्श झाल्यावर अदृश्य होते? हे सगळं कैच्या कैच.
***********************************************************
http://www.facebook.com/shilpket
http://shilpasview.blogspot.com/
दारु अदृश्य होऊन कुठे जात असेल?
अहो, असे काय करता? मागे गणपतीने नाही का प्यायली?
दुधाची चरवी?
डोळ्यादेखत दुधाच्या चरव्या च्या चरव्या अदृष्य झाल्या होत्या म्हणे.
का हो, आमचा नाडीपट्टीवर आता
का हो, आमचा नाडीपट्टीवर आता विश्वास बसला आहे असं सांगणारे आत्मेसुद्धा कदाचित संबंधित लोकांना भेट देत असतील.
I am in competition with no one. I run my own race. I have no desire to play the game of being better than anyone, in any way, shape, or form. I just aim to improve, to be better than I was before. That's me and I'm free.
- Anonymous
या प्रतिसादाने या धाग्याला
या प्रतिसादाने या धाग्याला नवजीवन मिळणार असे भाकित (मरायच्या आधीच) वर्तवतो.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
Pages