Skip to main content

Father Complex

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 09/10/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
Father Complex ५०शी ला आलो होतो,...छंद म्हणुन C++ चा क्लास लावला ति पण यायची क्लासला....असेल १९-२० ची..... काळीसावळि..पण उफाड्याची...माझ्या बाजुलाच तिचा कॉम्प होता.. बघितले कि हसायची...क्लास सुटला कि माझी वाट खाली थांबायची. सारखी माझ्या कडे बघत रहायची..... मला जरा सार संकोचल्यागत होत होते...काहिस ठीक नव्हत.. कारखान्याच्या कामासाठी मी ३-४ दिवस बाहेरगावि होतो.. ३-४ दिवसानि क्लास ला गेलो तर ति खालीच वाट बघत होति.. डोळे रडुन सुजलेले...’सर तुम्हि कुठे होता? मला किति काळजी वाटत होति तुम्हि आला नाहि म्हणुन" माझा हात धरत ति म्हणाली...सारच अवघड होत चालल होत मी बोललो नाहि...ठरवल द्यायची तिला समज.. एकदा

पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली

लेखक सोत्रि यांनी रविवार, 09/10/2011 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याचे मी स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले होते तो माझा गुरु, आद्य आर्किटेक्ट, स्टीव्ह जॉब्स अकाली हे जग सोडुन गेला. संगणक विश्वात स्वतःचे अढळपद निर्माण करूनच. सोशल आणि व्हर्चुअल जगात त्याच्याविषयी बरीच नविन नविन माहिती ह्या निमीत्ताने कळत होती. बरेच ब्लॉग्स आणि लेख वाचता वाचता कुठेतरी स्टीव्ह विषयी असलेल्या काही चित्रपटांची माहिती मिळाली. त्यात सापडला 'पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली'.

तिखट आप्पे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 08/10/2011 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तयार इडलीचे पीठ (कसे करायचे त्याची कृती: २ वाटया उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ वेगवेगळे १०-१२ तास भिजवणे.

'ज्ञानपीठा'साठी केवळ तीनच मराठी साहित्यिक पात्र?

लेखक दिपोटी यांनी शनिवार, 08/10/2011 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या 'सकाळ' मध्ये कामिल पारखे यांच्या या लेखात 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने सन्मानित होण्यात मराठी साहित्यिक मागे पडतो या वस्तुस्थितीबद्दल थोडे विचार व थोडासा उहापोह चांगल्या रीतीने मांडण्यात आला आहे. http://www.esakal.com/esakal/20111007/5255712661125493679.htm हाच विचार पुढे नेऊन 'या वस्तुस्थितीमागील कारणे' या विषयावर थोडी विस्तृत चर्चा व्हावी, काथ्याकूट व्हावा म्हणून हा धागा काढला आहे. 'सकाळ'मधील लेखाच्या लेखकाने मांडलेले मुद्दे योग्य आहेत.

हत्यार व सरस्वती पुजन

लेखक जागु यांनी शुक्रवार, 07/10/2011 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
हत्यार्‍यांचे विविध प्रकार असतात. युध्दात वापरली जाणारी ह्त्यार, किचन मध्ये वापरली जाणारी हत्यारे (सुरी, विळी) अजुन बर्‍यच क्षेत्रात हत्यारे वापरली जातात. तशिच शेतकर्‍यांची हत्यारे वर्षभर शेतकर्‍यांच्या सोबत राबत असतात. त्यांना निवांतपणा मिळतो तो दसर्‍याच्या दिवशी. ह्या शेतीतून अन्न धान्य पिकवण्यासाठी ही हत्यार जी कष्ट करतात त्यांचे आभार, त्यांच्याबद्दलच्या पुज्य भावना दसर्‍याच्या दिवशी हत्यार पुजन करुन केले जाते. माझे माहेर शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे आईने पुजलेली हत्यारे मी अगदी बालपणापासुन पाहत आले. सासरची शेती पेण गावाला आहे. पण सासु-सासरे नोकरी निमित्त गावोगावी फिरले.

मनातलं, जनातलं

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 07/10/2011 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
लिहु कि नको? का लिहावं? खरचं? काय लिहाव? का? अनेक प्रश्न. मी का लिहितो? कशासाठी? इथेच का लिहाव? ...... आजचा दिवस असाच गेला... आयुष्य का जगतो.. माहित नाही.. नक्की कुठे जायचय.. काय करायचय. आजकाल मिपावर काय धिंगाणा चाललाय.. खरच चाललाय कि मला वाटतय. हे तर कायमचच.. बदल होत राहतात. कुणीतरी पिंग केलं होतं.. ते काय होतं. कुठे थांबेल? की स्वत:च थांबाव. एक ब्रेक घ्यावा. शांत जागेत जावं. फोटोग्राफी सुरु करावी का? जाउदेत.. आज काय जेवायचं. फेसबुकवर जाउया.. बघुया काय काय नविन आहे. अरे इथे पण काहीच नाही.. एखादा सिनेमा पाहुया. पण कोणता आणि काय मिळणार, ह्म्म्म्म आज एखाद्या मित्राला फोन करुया.

फेस बुक लावणी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/10/2011 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
फेस बुक मधे मी खात काढलय,बघा ना राया माझी मैत्रीची रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट ना राया.. रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा .. तुमच्या खात्यावर पोरिंची गर्दी लई भारी माधुरी,प्रिति,प्रियंकाची त~हा लई नारी मला बी तुमच्या मंदी घ्या ना राया रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा .. अल्बम मधे म्या छान छान फोट बी लावलय. नथ घालुन, नऊवारी नेसुन छानशी सजलेय तुमची माधुरी,प्रिति,प्रियंका जळेल राया रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा .. रोज रोज स्टेटस मी अप डेट करीन छान सुंदर फोटु मी अप लोड करीन बघुन सार ,पारण फिटेल हो राया रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करा ..

शिस्तभंग - कारवाई

लेखक नीलकांत यांनी शुक्रवार, 07/10/2011 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेल्या काही दिवसांत मिसळपाववर अत्यंत घाण प्रकारे लिखाण झालेलं आहे. मिसळपाववर अश्या प्रकारे लेखन केल्या जाऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. तरी सुध्दा काही लोकांनी स्वत:ला आवर घातला नाही. एखाद्या विषयावर कुणी संवेदनशील होऊ शकतं हे मान्य मात्र त्यासाठी मिपावरील स्त्री सदस्यांना लाजीरवाणे लेखन कुणी करेल तर ते कुठल्याही सबबीखाली वैध मानता येणार नाही. सबब अश्या प्रकारे खरड लिहीणार्‍या स्त्री सदस्यावर १५ दिवसांची बंदी घालण्यात येत आहे. अश्या प्रकारचे लेखन हे प्रतिक्रियात्मक आहे असे प्रथमदर्शनी लक्षात येते.