फेस बुक लावणी
फेस बुक मधे मी खात काढलय,बघा ना राया
माझी मैत्रीची रिक्वेस्ट अॅक्सेप्ट ना राया..
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करा ..
तुमच्या खात्यावर पोरिंची गर्दी लई भारी
माधुरी,प्रिति,प्रियंकाची त~हा लई नारी
मला बी तुमच्या मंदी घ्या ना राया
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करा ..
अल्बम मधे म्या छान छान फोट बी लावलय.
नथ घालुन, नऊवारी नेसुन छानशी सजलेय
तुमची माधुरी,प्रिति,प्रियंका जळेल राया
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करा ..
रोज रोज स्टेटस मी अप डेट करीन
छान सुंदर फोटु मी अप लोड करीन
बघुन सार ,पारण फिटेल हो राया
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करा ..
तुमा संग रातच्याला चॅटींग करायचय
पहाट पत्तुर लॉग आऊट नाहि व्ह्यायचय
विचारनच माझी झोप उडाली हो राया
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करा ..
मिळुन दोघ आपण एक कम्युनिटी काढु
प्रेमाच्या छान छान कविता बी लिहु.
फेसबुक गुलाबी करु यात ना राया
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करा ..
अविनाश
लेखनविषय:
याद्या
4263
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
आधी
झकास ..!!
सोडा सोडा राया हा नाद खुळा. :)
तुम्ही दुवा दिलेली लावणी
In reply to सोडा सोडा राया हा नाद खुळा. :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स धनाजी.
In reply to तुम्ही दुवा दिलेली लावणी by धन्या
खरंच छान प्रयत्न. परंतू
खरंच छान प्रयत्न. परंतू