Skip to main content

प्रकाशवाटा

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 28/07/2022 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
अमावस्येला आकाश काळ्या चादरीवर चांदण्यांचे बुट्टे लेवून असते. त्याचा सखा शशी आज दूर फिरायला गेलाय जणू! तेव्हा या आकाशाचे पृथ्वीच्या निजरातीशी हितगुज मनमोकळे होत असावे. म्हणूनच का दिव्यांचे उत्सव त्या आकाशाचा एकाकीपणा घालवायला अमावस्येलाच असतात का?दीपअमावस्या ,दीपावली हे त्यातले उत्सव अग्नि तत्वाशी एकरूप! मला जशी जाण आली तशी अनेक गोष्टी पंच तत्वाशी जोडायची सवयस जडली. दीपावलीला दिव्यांची रांग ओळ मांडताना ती संपूच असं वाटतं .सगळं जग लखलख उजळून निघताना मनातला अंधार नाहीसा होतो .तिथे एक दीप मंद तेवतो . दीप अमावस्याचे तत्वही अग्नी!

बहारो फूल बरसाओ - ५

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/07/2022 06:34 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग टाँग..... टिंग टाँग..... कोण येडचॅप आहे हा माणूस.... आता दार उघल्यावर बुक्कीच मारते तोंडावर त्याच्या. मी धावत दार उघडते. टू माय सरप्राईज.... ओह्ह्ह्ह माय गॉड....... माझे डोळे विस्फारले आहेत.. तोंड आख्खा पंजा आत जाईल इतकं सताड उघडं पडलंय. मागील दुवा http://misalpav.com/node/50468 माझ्या डोळ्यावर माझा विश्वास बसत नाहिय्ये. दारात माया आणि समीर उभे आहेत.मी अवाक झाले आहे.काही सूचतच नाहिय्ये. माया तू! व्हॉट अ सरप्राईज! आनंदाने किंचाळते. मायाला घट्ट मिठी मारते. कोण आलंय गं! माया का गं! आई विचारतेय.

तुला काय ठाऊक सजणी, तुझ्यावर कोण कोण मरतंय ...

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 27/07/2022 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुला काय ठाऊक सजणी तुझ्यावर कोण कोण मरतंय आख्खं गाव तुझ्यासाठी रात्रंदिवस झुरतंय माळावरचा दगडू पैलवान भल्या-भल्यांना भरवतो हीव तुझ्यासाठी त्याचा सजणी टांगणीला गं लागलाय जीव सुताराचा चकणा म्हादू तुझ्यावर लईच मरतो तुला बघत पटाशीचं काम कानशीनं की करतो डोईवर घेऊन शेण-बुट्टी ठुमकत गं तू निघते दीवाण्यांची टोळी तुझ्या मागं मागं फिरते प्रत्येकाला तुझाच राणी गुलाम बनून रहायचंय तुला मात्र माधुरी बनायला म्हमईला जायचंय . आमची पेर्णा: . अवांतरः "डिसेंबर २

पेडगावची भग्न मंदिरे - लक्ष्मीनारायण मंदिर

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 27/07/2022 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
a पेडगावची तीन भग्न मंदिरं बघत बघतच आपण येतो ते इथल्या सर्वांगसुंदर मंदिरासमोर. ते म्हणजे इथले प्रसिद्ध असे लक्ष्मीनारायण मंदिर. हे मंदिर अप्रतिम अशा कोरीव कामामुळे नटलेलं आहे. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह अशी त्याची रचना. सभामंडपाला तीन बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. पैकी बाजूंची दोन प्रवेशद्वारे अर्धमंडपातून उघडतात. म्हणजेच हे मंदिर मुखमंडप, सभामंडप आणि अर्धमंडप अशा मंडपाच्या विविध प्रकारांनी युक्त आहे.

भरु आज पेला ( गटारी स्पेशल)

लेखक किरण कुमार यांनी बुधवार, 27/07/2022 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला ते विचारी भरु आज पेला तसा मी म्हणालो कशाला कशाला विजय कासवाचा पुन्हा का असावा कशी झोप येते भिणा-या सशाला तिला बोलण्याचे खरे टाळले मी उगा दोष देतो रिकाम्या खिशाला जरा दोन घटका चला घोट घेवू किती चांदण्या या विचारु निशेला जरासे पिल्याने कुठे काय होते किती थंड वाटे बिचा-या घशाला - किरण कुमार
काव्यरस

युट्युबर्सना किती पैसे मिळतात?

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 27/07/2022 04:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या "नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||" आणि मिपाकर धर्मराजमुटके ह्यांच्या "काय बोलावं सुचेना !" ह्या दोन धाग्यांवर, युट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडीओं पासून ते तयार करणाऱ्या क्रिएटर्सना/चॅनल्सना किती उत्पन्न मिळते ह्याबद्दल आलेले काही प्रतिसाद वाचल्यावर एका प्रतिसादाला उत्तर देण्यासाठी उपप्रतिसाद टंकायला घेतला होता, पण विषयाची व्याप्ती थोडी मोठी आहे त्यामुळे थोडक्यात उत्तर देणे शक्य नसल्याने स्वतंत्र लेख

इलाज नसलेला फीव्हर

लेखक भागो यांनी मंगळवार, 26/07/2022 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
इलाज नसलेला फीव्हर मी संध्याकाळचा चहा पीत बसलो होतो. तेवढ्यात माझा फोन थरथरायला लागला. बघतो तर काय पुष्पा वहीनींचा फोन! बहुतेक गरम गरम कांदापोहे तयार आहेत. या खायला असा निरोप असणार किंवा रात्रीचे जेवण इकडेच करा, अस आग्रहाचे निमंत्रण असणार. म्हणून मी उत्साहाने फोन उचलला. “हॅलो, वहिनी कांदा पोहे...” मला पुढे बोलू न देता वहिनी बोलू लागल्या, “अहो बंड्या भावोजी, तुम्ही ताबडतोब इकडे निघून या पाहू. तुमचे मित्र पहा कसं वेड्यासारखे करताहेत.

नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 25/07/2022 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री.

अलक

लेखक मालविका यांनी सोमवार, 25/07/2022 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
अलक अर्थात अति लघुकथा अलक 1 प्लॅन्चेटविषयी ऐकलं तेव्हा पासून करून बघण्याची इच्छा होती. पण भिती पण वाटायची. आज मात्र ठरवलं. अन्या आज घरी एकटाच होता त्यामुळे त्याच्याकडेच जमायचं ठरवलं. मी, विन्या, चारू,दिपू नि अन्या. अन्या त्यातल्या त्यात माहितगार. आम्ही काळोख करून मेणबत्ती पेटवली. त्या खाली अक्षरांचा बोर्ड आणि नाणं ठेवलं. सर्वानुमते एका माहितीच्या माणसाच्या आत्म्याला बोलावलं. पाच मिनिटं शांततेत गेली आणि नाणं थरथरलं. सगळ्यांच्या अंगावर काटा आला. धीर करून अन्याने पहिला प्रश्न विचारला. मग भीड चेपली गेली नि सगळे बोलायला लागले. प्रश्न संपले नि मेणबत्ती पण संपली. सर्वांना एकदम भारी वाटत होतं.

जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-१० } चायना ऑन अलर्ट

लेखक मदनबाण यांनी रविवार, 24/07/2022 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
मला हा धागा प्रकाशित करताना फार अडचण येत आहे, कितीही प्रयत्न केला तरी धागा प्रसिद्ध करता येत नाही. तेव्हा निदान या धाग्याच्या प्रतिसादात तरी काही लिहात येते का ते पाहतो.