अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या माझ्या काही आठवणी!
ह्या आहेत माझ्या अमेरिकेतल्या रस्त्यावरच्या, लाँग ड्राईव्ह्च्या काही आठवणीं - तत्कालीन तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने बदलत गेलेल्या:
१. नकाश्यांचे पुस्तक (अॅटलास):
अगदी सुरूवातीला अॅटलास हा एकच आधार असायचा.
आम्हाला कुठे नवीन ठिकाणी जायचे असल्यास आधी जवळच्या गॅस स्टेशनला जाऊन त्या स्टेट / शहराच्या नकाश्याचे पुस्तक विकत घ्यावे लागायचे.
नाही मिळाले तर तसेच निघून पडायचे, आणि त्या राज्याच्या सिमेवर हायवेच्या वेलकम सेंटर मधून नकाशे विकत घ्यायचे; मग हायलायटरने डेस्टिनेशनचा रस्ता ट्रेस करून पुढची वाटचाल करायची.
मिसळपाव