Skip to main content

जिंदगी ना मिलेगी दोबारा - जावेद अख्तर भावानुवाद

लेखक अजब यांनी रविवार, 25/10/2015 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
१. एक बात होठों तक है जो आयी नहीं बस आँखों से है झांकती तुमसे कभी मुझसे कभी कुछ लब्ज है वो मांगती आवाज़ की बाहों में बाहे ड़ाल के इठलाये वो लेकिन ये जो एक बात है एहसास ही एहसास है खुशबू सी है जैसे हवा में तैरती खुशबू जो बेआवाज़ है जिसका पता तुमको भी है जिसकी खबर मुझको भी है दुनिया से भी छुपता नहीं ये जाने कैसा राज़ है भावानुवाद एक कहाणी जी ओठांवर न येताही डोकावे डोळ्यांच्या मधुनी शब्दच काही मागत राही तुझ्याजवळ अन माझ्याकडुनी... कधी कहाणी आवाजाच्या बाहूंमध्ये मिरवत असते कधी कहाणी नुसती केवळ जाणिव होउन भासत असते... गंध जसा फिरतो वाऱ्यावर मूकपणे दरवळतो घरभर मूक कहाणी तुला समजते , मला

मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी

लेखक बाजीगर यांनी रविवार, 25/10/2015 08:48 या दिवशी प्रकाशित केले.
म ssss नसे... (चाल : फूल ते संपले ,गंध ना राहिला) खुळ ते संपले, धंदा ना राहिला हाक तू ऐकली, प्रसाद नाही दिला मार्ग माझा अता चालतो एकला राजीनामे आले, ना चाले नकला शून्य का स्कोर हा? एक ही चालला मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी हासूनी त्यावरी ही, मते नादेतो कुणी मीहि स्टेजवरी वेळ ना पाहिला भेट झाली 'त्या'ची याद ठेवू नये आणि फोनवरही भेट घेऊ नये व्हा सुखी भाजपी, शाप माझा मला

मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात भानगड

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 25/10/2015 04:54 या दिवशी प्रकाशित केले.
चटपटीत चांगलचुंगलं खाण्याचा शौक होताच. मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात एक छोटीशी टपरी टाकली. आपल्याला धंद्याची काय येवढी पडलेली नाही. जनशेवा महत्वाची. म्हणून टपरीवर पोटाला सोसेल एवढेच खा असा संदेश देणारी कार्टून्स पण लावून ठेवली. धंदा कमी झाला तरी चालेल, पण निदान लोकांनी आपल्या मालाचे निदान कौतुक तरी करावे अशी माफक अपेक्षा होती. टपरीवर केळी, शेंगादाणे, असे हौसेने मांडून ठेवले. चटमटीत मिसळ होती. म्हटले चार लोक खाऊन नाही, तरी निदान वास घेऊन कौतुक करतील. पण झाले भलतेच. टपरी उघडल्या उघडल्याच एक उनाड मुलांची टोळी समोर येऊन थडकली. म्हटले पाहुया, निदान काही घेतील.

एक प्रेम कहाणी....

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 25/10/2015 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
एक प्रेम कहाणी........... ती असेल ८-९ वर्षाची... बागेत खेळताना तिचे लक्ष त्याच्या कडे गेले ..तो पण असेल १२-१३ वर्षाचा.. तो पण तिच्या कडे अधून मधून बघत होता.... तिन्र त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला...... व त्याने पण... बाबांच्या बदली मुळे तिने शहर बदलले...काळ पुढे सरकत गेला व ति हा प्रसंग विसरली..... पुढे तिचे लग्न झाले...व संसाराला लागली... एकदा पर्स आवरत असताना तिला जुना फोटो सापडला... पती जवळच उभा होता .. त्याने विचारले "कोण आहे हा छोटा मुलगा?" ति हसली अन म्हणाली "माझे पहिले प्रेम..पहिला क्रश"..... असे म्हणताचे त्याने खिशांतून पाकीट काढले... त्यात एका छोट्या मुलीचा फोटो होता.. तो दाखवत तो म

साहेब (विडंबन)

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 25/10/2015 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहेब साहेबच आहेत. साहेब असे तसे नाहीत. साहेब म्हणजे साखरेचा लाडू. साहेब म्हणजे बर्फाचा गोळा. साहेबांचे धिप्पाड व्यक्तिमत्व, साहेबांचा बाणेदारपणा, साहेबांचा दरारा, साहेबांचा आवाज. साहेबांचे येणे. साहेबांचे जाने. सामान्यांच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकने. हात उंचावणे. हातजोड़ने. चार लोकांत कार्यकर्त्यांना नावानीशि ओलखने. दरवर्षी गावच्या मंदिराला भेट देने. साहेब एक नंबर आहेत. साहेब म्हणजे फ़क्त साहेब, साहेबांना तोड़ नाही. ऐतेहासिक पुरुषांचे अंगावर काटे उभे करणारे प्रसंग ऐकावेत तर फ़क्त साहेबांच्या तोंडुन. ते रक्ताला सळसळायाला लावतात, मरगळलेल्या जनतेत स्वाभिमान भरतात.

काहूर (संपुर्ण)

लेखक जव्हेरगंज यांनी शनिवार, 24/10/2015 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. कितीतरी येळ. आय कायच बुलली नाय. मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब थेंब पाणी म्या हातात धरलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, माज्या पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू. पाटी पिन्शील वायरीच्या पिशवीत टाकुन दिली. मग वाकळंवरं उगच पडुन ऱ्हायलु. छपरातनं पाणी गळायला लागलं.

तू कुणाचा...

लेखक आनंदमयी यांनी शनिवार, 24/10/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
फाटली भलत्या अवेळी जीर्ण झोळी थेंब शब्दांचे तुझ्या झेलीत होते राहिला साचून तेथे षड्ज वेडा आर्त वेणूचे जिथे संगीत होते थिरकते ही एकटी जेथे अबोली त्या तिथे शून्यात होती रासलीला हळहळे अजुनी घडा फुटका, रिकामा खोड माझी काढण्या तू फोडलेला नादती येथे वृथा का पैंजणे ही छेडता दूरात तू मंजूळ पावा रे मुकुंदा श्वास माझे जहर व्हावे एवढा सलतो जिवाला हा दुरावा मान्य हे कळले जरा मजला उशीरा की तुझ्या असण्यातही नसणेच होते भाळले ज्याच्यावरी गोकूळ सारे सावळे ते हास्यही उसनेच होते संपला सहवास सरल्या गोड भेटी प्रश्न केवळ राहिला वेड्या मनाचा मी तुझी, यमुना तुझी, अन् गोपिकाही! सांग पण मधुसूदना रे तू
काव्यरस

भीतीच्या भिंती: ९. हल्ला

लेखक आतिवास यांनी शनिवार, 24/10/2015 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
भाग (निवेदन: काही तांत्रिक अडचणींमुळे ही लेखमाला सध्या अपूर्ण ठेवावी लागत आहे. वाचकांनी त्याबद्दल मला क्षमा करावी. यथावकाश लेखन पूर्ण करेन इतकंच आत्ता म्हणेन.) गेला एक महिनाभर आमचं मुख्य रस्त्यावरचं प्रवेशद्वार बंद होतं. ते आहे दक्षिण प्रवेशद्वार. त्यानुळे आमची नियमित ये-जा पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून चालू होती. या बाजूला एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय आहे – ‘निवडणूक आयोग’. तालिबान हिटलिस्टवरचं आणखी एक ठिकाण. एक दिवस सकाळी साडेदहाला एसएमएस आला, “पूर्व प्रवेशद्वाराजवळ के ९ तपासणीत एक संशयास्पद वाहन आढळले आहे.

मिटण्याचा हव्यास (विडंबन)

लेखक दमामि यांनी शनिवार, 24/10/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा शोधा पाहू नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो सुगंधावर त्यां ललनांच्य
काव्यरस

उशिरा

लेखक आतिवास यांनी शनिवार, 24/10/2015 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
. . . . चौकातला दिवा लाल झाला, गाड्या थांबल्या. रस्ता ओलांडून फटाफट ते सगळे रस्त्याच्या बाजूला ठरलेल्या जागी आले. मनातली काळजी, शंका, उत्सुकता इतरांना कळू नये याची सगळ्यांची धडपड चालू होती. पण कदाचित जगण्याचा तितकासा अनुभव पाठीशी नसल्याने असेल, भावना लपवण्याच्या धडपडीत त्यांचे चेहरे जास्त बोलत होते. “आले का समदे?” नंदाने विचारलं.