तू कुणाचा...
लेखनविषय:
काव्यरस
फाटली भलत्या अवेळी जीर्ण झोळी
थेंब शब्दांचे तुझ्या झेलीत होते
राहिला साचून तेथे षड्ज वेडा
आर्त वेणूचे जिथे संगीत होते
थिरकते ही एकटी जेथे अबोली
त्या तिथे शून्यात होती रासलीला
हळहळे अजुनी घडा फुटका, रिकामा
खोड माझी काढण्या तू फोडलेला
नादती येथे वृथा का पैंजणे ही
छेडता दूरात तू मंजूळ पावा
रे मुकुंदा श्वास माझे जहर व्हावे
एवढा सलतो जिवाला हा दुरावा
मान्य हे कळले जरा मजला उशीरा
की तुझ्या असण्यातही नसणेच होते
भाळले ज्याच्यावरी गोकूळ सारे
सावळे ते हास्यही उसनेच होते
संपला सहवास सरल्या गोड भेटी
प्रश्न केवळ राहिला वेड्या मनाचा
मी तुझी, यमुना तुझी, अन् गोपिकाही!
सांग पण मधुसूदना रे तू कुणाचा....?
© अदिती जोशी
वाचने
2260
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मस्तय.....चावट कच्चा मसालापण
In reply to मस्तय.....चावट कच्चा मसालापण by टवाळ कार्टा
टक्या, होऊन जाऊदे:)
In reply to टक्या, होऊन जाऊदे:) by दमामि
पंख लाग्तील :)
@संपला सहवास सरल्या गोड भेटी
प्राची अश्विनी ह्यांच्या 'तो
In reply to प्राची अश्विनी ह्यांच्या 'तो by एस
हेच म्हणायचे होते.
कविता छान आहे लिहायचे राहिले.