Skip to main content

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

रसमाधुरी

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 09/11/2015 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो !! तुम्हा सर्वांना दिपावलीच्या अनेक-अनेक शुभेच्छा!!

अजंठा लेणी सहल माहिती हवी आहे

लेखक फिलोकॅलिस्ट यांनी सोमवार, 09/11/2015 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मला अजंठा लेणी बघायला जायचं आहे पण तिथे राहण्याची-जेवणाची काय सोय आहे याची माहिती नाही, तरी त्याबद्दल काही माहिती दिलीत तर खूप मदत होईल. तसेच अजून कोणती ठिकाणं बघता येतील. धन्यवाद...

वरंधा घाटातले मनुष्यस्पर्श नसलेले बॅक वॉटर

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 09/11/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात निसर्ग भरभरुन आहे. याची कल्पना जबाबदार सत्ताधारी किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कधी घेईल तो दिवस तमाम जनतेचा सोन्याचा दिवस. मध्यंतरी एक आकडेवारी जमाकरुन मी चकीत झालो. अवघ्या २० वर्षात अनेक पर्यटन विषयक प्रकल्प राबवुन केरळ राज्याने त्यांच्या राज्यातील तरुण परराज्यात जाणे थांबवले आहे. केरळ मधील आयुर्वेदीक उपचार पर्यटन असो की बॅक वॉटरवर आधारीत पर्यटन असो.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : २ : बंद घाटातुन गोविंदघाटापर्यंत

लेखक आकाश खोत यांनी सोमवार, 09/11/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
मागील लेखात सांगितल्याप्रमाणे माझी पुणे दिल्ली ट्रेन रद्द झाली आणि मला मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट काढणे भाग पडले. त्यामुळे माझ्या प्रवासाची सुरुवात पुणे ते मुंबई ट्रेनने झाली. बाहेर मस्त पावसाळी वातावरण होते. ट्रेन जेव्हा लोणावळ्या खंडाळ्याजवळुन जात होती, तेव्हा खूपच छान दृश्य दिसत होते. हिरवेगार डोंगर, धबधबे, तळी असे सर्व पाहताना छान उत्साह येत होता. डोंगरदऱ्या, काही ओळखु येणारे किल्ले पाहुन वाटत होते आत्ता इथेच उतरून ट्रेकला जावे. मुंबईला पोहचुन विमान पकडले, दिल्लीला गेलो. दिल्लीला सगळे भेटलो, मग हरिद्वारची ट्रेन पकडली. हरिद्वारपर्यंत संध्याकाळी पोहोचलो. आधीच अंधार पडलेला होता.

हमारी... अधुरी...... नव्वदोत्तरी..............................

लेखक मारवा यांनी सोमवार, 09/11/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
समुहगान आमचा कळप, आमचा झुंड ,आमचा गण अन आमचीच शिरगणती. अगणीत आम्ही तुझी गणना नाही कशात, तु नाहीच आमच्या खिजगणती. आमचा झेंडा , आमचाच अजेंडा, आमची चळवळ आमची तळमळ,अन आमचीच मळमळ. आमची कुलीन घराणी, आमच्या बांधलेल्या बंदिशी, अन आमच्याच तालावर नाचणारे ताल. आमच्याच समेवर आमचेच आदिम अभेद्य अविनाशी आवर्तन सहनाववतु ! सहनौभुनक्तु ! सहवीर्यम करवावहै ! आमच्या नाजुक भावना, आमच्या घाऊक संवेदना, अन आमच्याच भावुक संघटना. साथी हाथ बढाना एक अकेला थक जाये तो..... ..वा वा वा वा वा वा रे वा चल अकेला चल अकेला चल अकेला................
काव्यरस

स्टफ्ड खजूर चॉकलेट्स

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 09/11/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा. हि दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची, सुख-समृद्धीची, उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो. तर मंडळी दिवाळी किंवा कुठल्याही आनंदाच्या क्षणी खालील झटपट चॉकलेट्स बनवा आणि आपल्या प्रियजनांसोबत त्यांचा आनंद लूटा, भेट द्या. फार कमी साहित्य वापरुन हि यम्मी चॉकलेट्स बनतात. वेल खालील साहित्याचं प्रमाण हे ४०-४५ खजूर ह्या प्रमाणात घेतलेत.

आक्षी!

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 09/11/2015 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
आक्षी! ती तुम्हाला वाटते ती आक्षी नव्हे!नको तेव्हा येणारी किंव्वा पाहिजे तेव्हा न येणारी! ती नव्हे, अलिबाग आणि नागाव या दोघांच्या मध्ये असलेलं छोटसं गाव म्हणजे आमचं 'आक्षी' एखाद्या सुंदर मुलीच्या गालावर जशी खळी पडावी ना अगदी तशीच खाली म्हणजे वळणावरच्या रस्त्यावरचा - आक्षी चा स्तंभ, आणि त्याच वळणावर यायची ती सुंदर लाल-पिवळी साडी नेसलेली एसटी, सुंदरच ती! सौन्दर्य मनात असतं, बाह्यरूप किती ही कळकट्ट असलं तरी!

जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 09/11/2015 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा जेव्हा कांदा कापला जातो कढईतली मोहरी चुर्रर करते हळद मीठ तेल टाकुन शेंगदाने खरपुस भाजले जातात मी बाहेरच बसलेला असतो पेपर वाचत कांद्यापोह्याच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा गाठोडी ईकडे तिकडे सरकतात पोटमाळ्यावरची झुरळं तर्रर पळतात झाडू बादली पाणी घेऊन भिंत पुसली जाते मी खालीच ऊभा असतो स्टुल घेऊन जळमटं काढायच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा साखरेचं माप होत असतं तेव्हा मालक सुर्रर करत चहा पितो डाळी तांदुळ कडीपत्ता पिशवीत कोंबुन भरला जातो मी तिथेच ऊभा असतो काऊंटरजवळ बिलाच्या प्रतिक्षेत जेव्हा जेव्हा माहेरचा पाहुणा घरी येतो सगळा शिणवटा अर्रर करुन पळुन जातो पुरणपोळी आंबरस चकल्या ताटात आग्रहा
काव्यरस

कांदे पोहे

लेखक शब्दबम्बाळ यांनी सोमवार, 09/11/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
घरापसुन लांब राहायला लागल कि आयत मिळणार जेवण आपोआप बंद होत आणि मग मेस किंवा कधी परवडेल तसे हॉटेल हा दिनक्रम मागे लागतो. काही दिवसांनी या सगळ्याचाही कंटाळा येऊ लागतो आणि शेवटी, बास झाल! आता आपण स्वतः जेवण बनवायचं हा विचार डोक्यात येतो. पण लागणार सामान आणि कष्ट बघून मग बरेच दिवस तो नुसता डोक्यातच राहतो! पण जे लोक या विचाराला प्रत्यक्षात आणू इच्छितात त्यांच्यासाठी पाककृती वरदानच असतात. त्यामुळे हे भले काम आपण पण करावे असा विचार डोक्यात आला.