घरच्यांपुरतं वसुधैव कुटुंबकम(?)
घरच्यांपुरतं वसुधैव कुटुंबकम(?)
" साहेब, आम्ही अोळखतो तुम्हाला. पण मिडियाने व्हायरल केलयं ना..एफ आय आर करावा लागेल. पण काळजी नका करु. अपघात दाखवून हातावेगळं करु. तुम्ही तशी साक्ष द्या आणि मोकळ व्हा.
बरयाच वर्षापासुन तुम्ही हे अनाथालय चालवताय. ठिकठिकाणाहुन मिळण्यारया देणगींचा विचार करा. "
आवाजाची पट्टी वाढवत तो इन्स्पेक्टर बोलतच राहिला " माझ्यावरही दबाब आहे. रोजच आहे हे माझ्यासाठी. "
पवन समोरच्या अनाथालयाच्या पाटीकडे पाहत होता. ज्या रोहितसोबत हे सुरु केलं होतं त्याच्याच आधार अचानक हरपला होता. समोरची पाटी पवनला दिसेनाशी झाली.
मिसळपाव
...
बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही कारणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो १९९३ आँगस्ट नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे.
दोन मुलं होती त्यानां, अमित दादा आणि त्याची छोटी बहीण आदिती...