दिवाळी कुणाची?
"ये आये, दिवाळी कधीच्याला हाय गं!"
"हाय उंद्याच्याला"
"आये, मंग तू दाळीचे लाडु कव्हा करणार हैस"
"करतीना उंद्याच्याला"
"आये, त्वा रोजच् उंदया उंदया म्हंतीस"
"मंग जाय रासन आलं का नय ते यी बघुन. रासनात दाळ येणार हाय "
__________________________________________________________________________
रातपासुन पांधीत दबा धरून बसलेले दोन ट्रक नानासाहेबाच्या मळयाकड़े निघाले. त्यातला एक ट्रक अजुन तसाच होता, अगदी सीलबंद. दुसऱ्या ट्रक मधली अर्धी निम्मी पोती पांदितच काढुन ट्रॅक्टरणे गावांत पाठवली.
ट्रॅक्टर राषन दुकानसमोर येताच, राषन आल्याची बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.
थांबलेल्या दिवाळीत उत्साह संचारला.
मिसळपाव