Skip to main content

हातभर

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 09/12/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
वसकन वरड्या. गपचिप पड्या. फिर मुझे बोल्या " सट्या क्या रे?" मै धडपडके ऊठ्या. खुडची पे बैठ्या. और ऊसकू बोल्या " खडा क्यों रे? बैठ ना" "ये भोक तेरेके दिखता क्या रे?" आकबऱ्या छत को ईशारा करके बोल्या. अब साला मै भी ऊठके ऊसे ढुंढने लगा. रामजाने कैसा भोक. लेकीन वो कहता है, तो देख तो लू. "किधर रे किधर? मेरेको तो कुछ दिखता नै" मै मुंडी ऊपर घुमाके बारीक नजरसे देख्या. "अैसा कैसा रे बावळट तू? वो ऊधर मेरे ऊंगलीके ऊपर देख. है क्या नै?" मै ईधर से ऊधर गया, फिर ऊधर से भिताड के पास गया. आंखे फाड फाड के ऊपर देखा. पर ऊधर घंटा कुछ भी नही था. लेकीन आकबऱ्या बात मानके ही छोडेगा. यक नंबर की पोचेली चीज.

आॅन / आॅफ ( एक भयानक अनुभव )

लेखक mohite jeevan यांनी बुधवार, 09/12/2015 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच माझी बदली शहरात झाली होती . त्या दिवशी मी मला कंपनीकडून मिळालेल्या घरात  रहायला गेलो.  घर दिसायला मोठे होते त्यामध्ये अनेक सुविधा होत्या .पण माझ्यावर तुम्ही विशवास ठेवा न ठेवा , मला त्या घरात जो अनुभव आला तो अलौकिक होता. आणि मी कधीही आशा अनुभवाची अपेक्षा माझ्या बाबतीत मला नव्हती.

मिपावरी कोनाडा असावा.....

लेखक दमामि यांनी बुधवार, 09/12/2015 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण पहिली कशी मिळाली लाइन कोठे कशी क्रॅास झाली निसंकोच आम्हा इथे व्यक्त व्हाया मिपावरी कोनाडा असावा..... घरी सासू येणे कसे आवरावे वाचाळ पत्नी, कसे शांतवावे समस्येवरी यां चर्चा घडाया मिपावरी कोनाडा असावा..... कसा धीर गळतो, कसा त्रास होतो बिछान्यावरी का वनवास होतो उपाय त्यावर जाणून घ्याया मिपावरी कोनाडा असावा..... भविष्य मेनू आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान पंचअंग भावे पुरुषस्वभावा मिपावरी कोनाडा असावा.....

नाच्याले नोट : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 09/12/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
नाच्याले नोट : नागपुरी तडका

चमचमी बूट हाय, मलमली कोट हाय
सिगारेट सिलगवाले, हजारची नोट हाय

फ़ाटलेलं दफ़्तर, चड्डीले भोक हाय
बापाच्या नशीबात, जह्यराचा घोट हाय

मरणारे मरतात, चरणारे चरतात
लेका इथं कोणाच्या, हाडावर चोट हाय?

वाणी-दास-पुढाऱ्याच्या, मिशीले तूप हाय
दूध-दूभतं करणार्‍याचे, पाठीले पोट हाय

जसं तुले हाय तसं, मलेबी वोट हाय, पण;
ढ्यँगपाट्या सरकाराच्या बापामंदी खोट हाय

सात, आठ, नवव्या आयोगाचे योग हाय

सुटलेल्या पोटाची कहाणी -५

लेखक Anand More यांनी बुधवार, 09/12/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ __________________________________________________________________________________ मुन्नाभाई पिक्चर मुळे आपल्या शरीरात २०६ हाडे असतात हे कळले होते पण आपल्या शरीरातील स्नायूंची संख्या माहिती नव्हती. पण तिसऱ्या दिवसा नंतरच्या रात्री असतील नसतील त्या स्नायूंनी बंड केले.

'श्रीमानयोगी'

लेखक अक्षया यांनी बुधवार, 09/12/2015 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
एक अगदी तुमच्या आमच्या सारखी सर्वसाधारण व्यक्ती, जी आयुष्यभर नोकरी करून आपला संसार चालवते, नोकरीमधून निवृत्तीचे वेध लागताच मनामध्ये कुठेतरी प्रचंड मोठा स्वप्नांचा पहाड उभा असतो...पोटा-पाण्याच्या व्यवसाया मुळे फार पूर्वी पाहिलेली काही स्वप्नं प्रत्यक्षात कशी उतारवयाची याचा सतत ध्यास घेतलेली एक व्यक्ती... ते स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत धडपड करणारी व्यक्ती... स्वप्नं होतं आयुष्यात काहीतरी भव्यदिव्य करायचं, मनात विचारांचं काहूर माजलेलं, प्रत्येकजणाचा वेगळा सल्ला, प्रत्येकाची वेगळी मतं. आणि एके दिवशी सहज 'श्रीमानयोगी' कादंबरी हातात पडली.

काकासाहेबांची चड्डी - एक टिप्पणी

लेखक भृशुंडी यांनी बुधवार, 09/12/2015 04:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही नाटकं अशी असतात की जी आपल्या मनात घर करून जातात. आणि नंतरही आपण त्यावर विचार करत रहातो. असंच एक नाटक पाहण्याचा योग काही महिन्यांपूर्वी आला, त्याबद्दल हे काही थोडं लिहिलं आहे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ १९९० सालानंतर समाजात जो एक चंगळवाद फोफावला आहे, त्यावर आडून आडून टिप्पणी करणारं आणि उपहासाने त्याकडे बघणारं हे नाटक म्हणजे "काकासाहेबांची चड्डी". नाटकाची पार्श्वभूमी - संदेश देऊलकर ह्या नवोदित नाटककाराने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी हे नाटक लिहिलं. संदेशच्या आधीच्या कथा आणि कवितांमधे जी एक विखारी पण फालतू चमक जाणवते, ती ह्याही नाटकात आहे. मेकॅनिक्समधे सतत ३ वेळा के.टी.

'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी

लेखक प्रसाद गोडबोले यांनी बुधवार, 09/12/2015 03:58 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल बर्‍याचदा हे असं व्हायला लागलंय ....एखादी खुप पुर्वी ऐकलेली कवित्या मनाच्या गाभार्‍यात कोणत्यातरी अंधार्‍या कोनाड्यात खोलवर दडुन बसावी वर्षोनवर्ष..... अन कधीतरी अचानकच जसे रणरणत्या उन्हाळ्यात अचानक वळीवाची सर कोसळुन जावी तशी काहीशी कविता मनाच्या अंगणात भरभरुन बसरावी अन सारेच कसे चिंब चिंब होवुन जावे ! आजकाल बर्‍याचदा हे असं व्हायला लागलंय ________________________________________________________________________________

चॅप्टर १ :" NOW "

साधारण रात्रीचे साडे नऊ वाजुन गेले होते.

माह्या मायेचं कारटं

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 08/12/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
माह्या मायेचं कारटं जाई खळ्यात मळ्यात गाऊनी अभंग खेळी शेणात शेणात माह्या मायेचं कारटं चाले हसत रुसत भाळूनी चंद्राला शोधी आभाळ आभाळ माह्या मायेचं कारटं सुटे ऊन्हात रानात शोधीत पाण्याला होई छप्पर छप्पर माह्या मायेचं कारटं निजे सुखात दु:खात होऊनी भाकरी जाई थापत थापत
काव्यरस

विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर

लेखक राजेश घासकडवी यांनी मंगळवार, 08/12/2015 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974 भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987 भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009 ---- कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या निळ्या वायूच्या लगडी सलग कधी ? कधी अन् जडतेला त्या मनामनाचे आले पोत ? - बा. सी. मर्ढेकर ---- मर्ढेकरांचा हा प्रश्न कळीचा आहे. ‘काही नाही’ या अवस्थेपासून आपल्याला दिसणार्‍या या जगड्व्याळ विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला?