विटाळ
काचेच्या काळ्या, आरसा
नसलेल्या तावदानी
फक्त तुझाच चेहरा दिसतो
जन्मजात जार तू
जारिणीचा संग करतो !
देऊनी माझ्या कळीला
फुलाची भूल, काय साधलेस
सांगताना जरा शहारते
कौमार्याच्या गळी माळलास
कामाग्निचा अंगार !
कौमार्याच्या अनवट क्षणी
तू शिलगवलास
वासनेचा कोळसा
माळती माझ्या कुंताली
कौमार्ययोग्या आरसा !
कातरवेळी, कुवारवेळेस
मी मागते कुकवाचा
जोगवा
गारठधूक्यात दडल्या
चंद्रास माझा
विटाळ देईल सांगावा !
तुझ्या परतवाटेस
मी फासला शेंदुर
गोठणबिंदू गाठणा-या
बेवारशी रात्रीस
शरीरी पेटे अंगार !
कोवळ्या आर्द्र बोटानी
मी चाळवते निखारे
उरलेत माझ्या
भोगल्या शरीरी
रासवटलेले तुझे शहारे !
विजयकुमार..................
मिसळपाव
सन १९९७, इजरायलमधील तेल अवीव्ह हे शहर. सारा गोल्ड नामक एका लेखिकेच्या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराच्या कार्यक्रमाने चित्रपटाला सुरूवात होते. साराची आई 'रेचेल सिंगर' हिच्या पुर्वायुष्यातील एक थरारक मिशनवर हे पुस्तक आधारलेले आहे. थरारक मिशन? तर रेचेल ही एक भुतपूर्व गुप्तहेर आहे, इजरायलच्या कुख्यात की ख्यातनाम 'मोस्साद'ची.