Skip to main content

गॅलरीतला [ चौथा ] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 27/12/2015 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतले आपण, आपले आपले. गुलाब काढा, मोगरा लावा मोगरा काढा, मरवा लावा, मरवा काढा, सुगंध ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला सुगंध आपला आपला. खुर्ची काढा, झोपाळा लावा, झोपाळा काढा, चटई टाका, चटई काढा, मोकळीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतली स्पेस आपली आपली. काचा काढा, गज लावा गज काढा, पडदे लावा, पडदे काढा, उघडीच ठेवा मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला प्रकाश आपला आपला. असणे नको, नसणे नको, आता कुठला ध्यास नको, कुठे फुलला, कुठे अडकला, असला मिळमिळ श्वास नको, मनाला गॅलरी आपली आपली गॅलरीतला श्वास आपला आपला.

मस्तानी-बाजीरावांचे वंशज

लेखक माहितगार यांनी रविवार, 27/12/2015 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
मस्तानी-बाजीरावांचे वंशज अजून आहेत याची गेल्या काही क्षणांपर्यत कल्पनाच नव्हती. फार-फार तर मस्तानी-बाजीरावांचा मुलगा शमशेर बहादूर-१ (कृष्णराव) पानिपतच्या तिसर्‍या युद्धात कामी आला एवढेच सर्वसाधारणपणे माहित असते.

फार्गो सीजन टू

लेखक अज्ञात यांनी रविवार, 27/12/2015 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
फार्गो सीजन टू FARGO फार्गो नावाचा एक इंग्रजी चित्रपट येऊन गेलाय, त्या चित्रपटावरच आधारित एक मालिकाही सुरु झाली, एक सर्वसाधारण माणूस परिस्थिती मुळे कसा अपराधी होतो ह्याची उत्तम मांडणी केली आहे, ब्लॅक कॉमेडी अप्रतिम! असो, त्याच मालिकेचा दुसरा सीजन आलाय ह्या वर्षी, मागच्याच आठवड्यात दहावा आणि शेवटचा एपिसोड पाहिला, कथानक आहे मिनेसोटा ह्या अमेरिकन भागातील दोन माफीयांच्या भांडणाचं, त्या भांडणात खूप व्यक्तीचित्र त्यांची कहाणी अगदी सखोलीने मांडली

मी उत्सवला जातो (भाग २)

लेखक Anand More यांनी रविवार, 27/12/2015 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ____________________________________________________________________________________ मुले बागडत होती. सासू सासरे आणि आई खूष दिसत होते आणि हिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा. सकाळी रेडिओवर ऐकलेले "आनंद पोटात माझ्या माईना" हे दत्त भक्तीगीत हिला उत्सवच्या गेटसमोर उभे करून तर अनाम कवीने लिहिले नसावे ना? अशी एक पुसटशी शंका माझ्या मनाला चाटून गेली. त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून मला देखील आनंदाचे भरते येत असताना मुलांनी मला गेटकडे खेचले आणि तिथल्या सहाय्यकाने, "तिकडून आत जा, हा बाहेर यायचा रस्ता आहे" असे मला सौजन्य, कंटाळा, तिरस्कार आणि कीव या सर्व भावनांचे मिश्रण असलेल्या आवाजात सांगून दुसऱ्या दिशेने पिटाळले. पोरं लगेच तिकडे पळाली देखील. ही माझ्यावर चिडली, माझी आई माझी बाजू कशी काय घ्यावी या विचारात पडली आणि माझी सासू, भोंडल्यातले "श्रीकांता कमलाकांता" हे गाणे आपल्या मुलीसाठीच लिहिले आहे असा चेहरा करून माझ्याकडे पाहू लागली.

सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 27/12/2015 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
कालचीच गोष्ट, संध्याकाळी, सीपी वरून उत्तम नगर साठी मेट्रो घेतली. नेहमीप्रमाणे भयंकर भीड होती. बसायला जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीत आमच्या सारखे पांढरे केसवाल्यांसाठी काही जागा आरक्षित असल्यामुळे, सामान्य जागेवर बसलेला माणूस, सहजासहजी पांढरे केसवाल्याना बसायला जागा देत नाही. काही कारणाने सौ.ने फोन केला. तिच्या सोबत मराठीत बोललो. अचानक समोर बसलेल्या एका तरुणाने अंकलजी, आप बैठिये. म्हणत मला बसण्यासाठी जागा दिली. थोड्यावेळाने तो म्हणाला, आप महाराष्ट्रीयन हो क्या? मी हो म्हणालो. तो पुढे म्हणाला आपके सुरेश प्रभुजी बहुत संवेदनशील और अच्छे इन्सान है.

वाघोबा at ताडोबा भाग - २

लेखक अभिदेश यांनी रविवार, 27/12/2015 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग -१ सहा महिन्यापूर्वी साधारण मे महिन्यात माझी पुण्याला चक्कर झाली होती तेव्हा मी एक नवीन प्रकार बघितला . माझ्या घराजवळ zoomcar असं लिहिलेल्या काही गाड्या बघितल्या . माझी उत्सुकता चाळवली , थोडा अधिक शोध घेता कळले कि हि एक Car Rental site आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे Self Drive . At Last ... भारतामध्ये Self Drive कार सुरु झाल्या . पण त्यावेळेस मला जास्त वेळ नसल्यामुळे मी फार काही पुढे बघितले नाही . पण आता अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला Why not drive to Tadoba ? पटकन अंतर चेक केलं . पुणे - ताडोबा साधारण ७५० किमी .

मास्तर

लेखक आनंद कांबीकर यांनी रविवार, 27/12/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतून निघायला त्याला आज उशिरच झालेला. बसच्या गर्दीत स्वतःला घुसवत कसबसा घरी पोहचला. तिन वर्षाचा चिमुकला तापाने फनफनलेला. बायको घाबरुण गेलेली. मिठाच्या पाण्यात पट्टया भिजवुन डोक्यावर ठेवत होती. पण ताप कमी होइणा. तो आल्या आल्याच चिमुकल्याला दुपट्यात गुंडाळून दवाखान्यात घेऊन निघाला. बायकोला रडु अवरेना. डॉक्टरने रक्त तपासायला सांगितले. अर्ध्या तासाने रिपोर्ट आला. पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. डॉक्टरांनी तिन दिवस एडमिट करायला सांगितले. चिमुकल्या हाताला सलायन लावली. ति ओल्या फडक्याने त्याचं अंग पुसत होती. तो तिथेच डोक्याला हात लावुन बसलेला. तिच्या पोटात सकाळपासुन अन्नाचा कण नव्हता.