Skip to main content

हिशोब

लेखक भागो यांनी सोमवार, 06/11/2023 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
हिशोब एकदा तीन मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले. भरपेट जेवण आणि गप्पा झाल्या. कडक कॉफी झाल्यावर त्यांनी वेटरला बिल आणायला सांगितले. वेटरने बिल आणून दिले. बिल झालं होतं. तीनशे रुपये. “हे बाकी बेस झालं. प्रत्येकी शंभर रुपये! हे माझे शंभर.” त्याने पाकिटातून शंभराची नोट काढून प्लेटमधे ठेवली. तर अशाप्रकारे त्या मित्रांनी प्रत्येकी शंभर रुपये शेअर करून बिल चुकते केले. कॉफीचे शेवटचे घुटके घेत असताना वेटर परत आला. “जेन्टलमेन, माफ करा, आमच्या कॅशिअरने बिल करताना चूक केली. आपले बिल तीनशे नव्हे तर अडीचशे रुपये झाले आहे. कॅशिअरने माझ्याकडे हे पन्नास रुपये तुम्हाला परत देण्यासाठी दिले आहेत.

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 05/11/2023 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक ) आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो.

हेंडगूळ

लेखक अरिंजय यांनी रविवार, 29/10/2023 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
*हेंडगूळ* पावसाळ्यातली गोष्ट. गाडी मित्राकडे होती, ती आणायला पायीच चाललो होतो. उड्डाणपूलाच्या बाजूने सर्विस रोडवर पूर्ण चिखल झालेला. एकच माणूस जाईल, इतकीच पायवाट शिल्लक, बाकी सगळा चिखल. जवळपास अर्ध अंतर गेल्यावर एके ठिकाणी पाच सहा कुत्र्यांचा घोळका एका कुत्री साठी जोरजोरात भांडत होता. ते बघून पलीकडून येणारे दोघं तिघं आणि इकडून जाणारे आम्ही दोघं तिघं, जागेवर थांबलो. चुकून जरी भांडत आमच्या अंगावर आले, तरी आम्हाला पळायला जागासुद्धा शिल्लक नव्हती. मिनीटभराने ती कुत्री तिथून हलली आणि तिच्या मागे सगळा घोळका. मनातल्या मनात शिव्या घातल्या "भाद्रपदाला अजून दोन महिने अवकाश असताना मधेच काय?".

एक तरी शिवी अनुभवावी..

लेखक आजी यांनी रविवार, 29/10/2023 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
धर्मेंद्रचे दोन्ही हात वरती लोखंडी चौकटीला बांधलेले. त्याच्या मानेला,ओठाला रक्त. त्याच्यावर गन रोखलेली. गब्बर बसंतीला म्हणतो,"नाचो,जबतक तेरे पाॅंव चलेंगे ,इसकी साॅंस चलेगी!" आणि विरु ऊर्फ धरमिंदर ओरडतो,"बसंती,इन कुत्तोंके सामने मत नाचना!"तरी बसंती त्याचे प्राण वाचवायसाठी नाचते. शोले मधला हा सीन सर्वांना तोंडपाठ आहे. (शोले न पाहिलेला माणूस भारतात नाही. अशी वदंता आहे.) असा एकही सिनेमा नसेल ज्यात धर्मेंद्रने "कुत्ते,कमीने" ही शिवी दिली नसेल. सिनेमातला प्रत्येक हिरो,हिराॅईन,व्हिलन शिव्या देतोच. एवढंच काय, जगात कुठेही असा माणूसच सापडणार नाही,ज्यानं आयुष्यात कधी कुणाला शिवीच दिली नाही.

पुन्हा एकदा म्युचुअल फंड्स

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 27/10/2023 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी हापिसात चहापाण्याच्या वेळी आम्ही नेहमी जागतिक स्तरावरच्या गप्पा मारत असतो. म्हणजे पुतीनला हार्ट अ‍ॅटॅक आला, आता युक्रेन वॉरची पुढची स्टेप काय असेल? किवा बिबीने (आपले नेतान्याहु हो) गाझा मध्ये सैन्य घुसवले, आता पुढे काय? अशा गप्पांचा मोठा फायदा म्हणजे आगामी काळात गाडी बदलायची असेल तर पेट्रोल घ्यावी, सी एन जी की हायब्रिड? सेकंड होम बूक करावे की सरळ प्लॉट मध्ये गुंतवणुक करावी? ईथपासुन ते घरात खाण्याचे तेल कितपत साठवुन ठेवावे? गव्हाचे पोतेच आणावे की नेहमीसारखे ५-५- किलो पुरे?

शूर्पणखा

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 26/10/2023 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो. भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. . सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय. मशिनचं पायटं हलवत भाऊ एकदम तल्लिनतेनं ही कविता गायचे.

'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग दुसरा)

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 25/10/2023 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या गेम शोच्या दशकपूर्तीनिमित्त असलेल्या विशेष भागासाठी दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागाचे चार स्पर्धक 'विशेष अतिथी' म्हणून मंचावर सपत्नीक स्थानापन्न झाले होते.