हिशोब
एकदा तीन मित्र हॉटेलमध्ये जेवायला गेले. भरपेट जेवण आणि गप्पा झाल्या. कडक कॉफी झाल्यावर त्यांनी वेटरला बिल आणायला सांगितले. वेटरने बिल आणून दिले. बिल झालं होतं. तीनशे रुपये.
“हे बाकी बेस झालं. प्रत्येकी शंभर रुपये! हे माझे शंभर.” त्याने पाकिटातून शंभराची नोट काढून प्लेटमधे ठेवली.
तर अशाप्रकारे त्या मित्रांनी प्रत्येकी शंभर रुपये शेअर करून बिल चुकते केले. कॉफीचे शेवटचे घुटके घेत असताना वेटर परत आला.
“जेन्टलमेन, माफ करा, आमच्या कॅशिअरने बिल करताना चूक केली. आपले बिल तीनशे नव्हे तर अडीचशे रुपये झाले आहे. कॅशिअरने माझ्याकडे हे पन्नास रुपये तुम्हाला परत देण्यासाठी दिले आहेत. पण पन्नास रुपये तुम्ही तिघात कसे वाटून घेणार? म्हणून मी काय केले आहे कि मी ह्यातून वीस रुपये मला टिप म्हणून ठेवून घेतले आहेत. आणि उरलेले हे घ्या प्रत्येकी दहा रुपये.”
मित्रांनी विचार केला, “अरे, आपण टिप द्यायला विसरलोच होतो. आणि आपल्याला पण बरच झाले. दहा दहा रुपये परत मिळाले.”
अशाप्रकारे मित्र, वेटर आणि कॅशिअर सगळे खुश झाले.
पण अस्सल पुणेरी असल्यामुळे माझ्या मनात किडा वळवला. का?
मी मनात हिशेब करत होतो. प्रत्येक मित्राने नव्वद रुपये खर्च केले. म्हणजे एकूण दोनशे सत्तर अधिक वेटरची टिप वीस रुपये. म्हणजे एकूण दोनशे नव्वद झाले. ऑ? मग दहा रुपये कुठे गेले?
प्रिय मित्रांनो, हिशेबात काय चुकले माझे?
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5226
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकुण खर्च २७०/- झाला २५० बिल
प्रत्येकी नव्वद रुपये ,,,,
आपल्या दोन्ही हातांना
श्वेताजी
In reply to आपल्या दोन्ही हातांना by श्वेता व्यास
श्वेता व्यास
In reply to आपल्या दोन्ही हातांना by श्वेता व्यास
काही हरकत नाही भागो सर :)
In reply to श्वेता व्यास by भागो
मी असेच एक कोडे शोधत आहे
माझ्या वाचनात जे कोडे आहे ते
In reply to मी असेच एक कोडे शोधत आहे by राजेंद्र मेहेंदळे
माझी प्रमाणं वेगळी
In reply to मी असेच एक कोडे शोधत आहे by राजेंद्र मेहेंदळे
neuroplasticity
पण आता असे सिद्ध झाले आहे कि
In reply to neuroplasticity by भागो
पण आता असे सिद्ध झाले आहे कि आपण जर आपल्या मेंदूला कवायत करायला लावली तर नव्या मज्जा पेशी निर्माण होऊ शकतात.यातुन अल्झायमर् वर मात करता येइल का?यातुन अल्झायमर् वर मात करता
In reply to पण आता असे सिद्ध झाले आहे कि by रंगीला रतन
book cooking
नठ्यारा
In reply to book cooking by नठ्यारा
प्रत्येक मित्राने नव्वद रुपये
विजुभाऊ
In reply to प्रत्येक मित्राने नव्वद रुपये by विजुभाऊ
असेच एक कोडे
व्वा! छान आहे. असे हे भ्रम
In reply to असेच एक कोडे by कॉमी