ऑपरेशन भाग 2
भाग 1 वरुन पुढे-
सर्वांनी रोहितची समस्या जाणून घेण्याचा बराच प्रयत्न केला. ब-याच जणांना असे वाटायचे, की श्वेताच्या बेताल वागण्याने तो चिडचिड करतोय, तर काहींच्या मते दुसरे कोणते कारण होते. रोहितच्या सिनीअर मि.अंकोलानी त्याला विश्वासात घेऊन त्याची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. रोहितला आपल्या वैदयकिय पेशामुळे स्वतःच्या खाजगी आयुष्याकडे लक्ष देता येत नव्हते. तशातच मि.अंकोलानी त्याची पगारवाढीची मागणीही धुडकावून लावली होती, त्यामुळे तर तो अधिकच चिंतित असायचा.
रोहित अश्विनची मात्र जिवापाड काळजी घेत असायचा, तोच त्याच्या जगण्याचा आधार होता.
मिसळपाव