Skip to main content

थंडीतली खाद्ययात्रा.

लेखक आजी यांनी गुरुवार, 28/12/2023 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी हा माझा आवडता ऋतू आहे,असं मी मागच्या लेखात म्हटलंच आहे. थंडीमध्ये आणखीही एक मज्जा असते. ती म्हणजे थंडीतली खाद्ययात्रा! थंडीत सर्वात जास्त मजा असते ती हुरडा पार्टीत. मस्त एखाद्या शेतावर जायचं. शेतात मध्यभागी एक बेताच्या आकाराचा खड्डा खणलेला असतो. त्यात शेणाच्या गोवऱ्या, कोळसे,पेटते निखारे धगधगत असतात. कोवळी ज्वारीची कणसं तोडून ठेवलेली असतात. तिथला शेतमजूर एक बारीक पण मजबूत काठी त्या ज्वारीच्या कणसात खुपसतो आणि त्या शेकोटीत घालतो. सर्व बाजूंनी फिरवून फिरवून कणीस भाजतो. कणीस नीट भाजलं गेलं की ते बाहेर काढून हातावर चोळायचं , आणि कोवळे, भाजलेले दाणे खायचे.

इच्छापूर्ती

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 27/12/2023 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, इच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही.

देव

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 26/12/2023 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
देव होता, देव आहे, असेल पुन्हा भावनेच्या ओलाव्यातून रुजेल पुन्हा. कधी माणसाच्या अंतरंगातून डोकावतो आभाळाच्या सावलीतून पाहील पुन्हा. नेमके फासे तो फेकतो नेहमी इथे नेटके दान नशिबी तो देईल पुन्हा . भक्तिभाव जेव्हा उचंबळून येतो सुगंध बनून मनातून फुलेल पुन्हा. माणसाने माणसाशी माणसासम वागणे माणसातूनच देव जन्माला येईल पुन्हा. शब्द होता कान्ह्याने गीतेतून पेरला आज नाही तर उद्या जन्म घेईल पुन्हा. ----अभय बापट
काव्यरस

इंदूर - छप्पन दुकान आणि सराफ्याची खाद्य भ्रमंती

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 26/12/2023 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नुकतेच इंदूर भटकंती झाली. मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर सर्व काही पाहिले. पण खास आकर्षण होते ते छप्पन दुकान आणि रात्रीच्या सराफ्याचे. छप्पन दुकान हा छप्पन गाळ्यांचा समुच्चय. छप्पन दुकान दिवसभर सुरु असते. शेवटचे १/२ कपड्यांचे गाळे वगळता इतर सर्व खादाडीचीच दुकाने आहेत.

नीर डोसे. घावने

लेखक कंजूस यांनी सोमवार, 25/12/2023 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नीर डोसे. घावने

https://youtu.be/ftG4q-Wrzmc?si=phSgsxd9jFiP1h0j

या विडिओत दाखवल्याप्रमाणे केले. सहज सोपे आहे. कढीपत्ता डाळं यांची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला येतील. सांबार ही घेता येईल. दोन तीन वेळा वेगवेगळे तांदूळ वापरून करून पाहिले. होतात. नानस्टिक तवा वापरला. बिडाचा नाही. तव्याला तेलसुद्धा लावावं लागलं नाही.

फोटो

क्षितिजाचे कुंपण

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 25/12/2023 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण...... साखर झोपेच्या वळणावर अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर बांग कुणाची येता कानी विरून गेली सारी कहाणी तरूणपण...... विझल्या साऱ्या चांदणठिणग्या बघा बघा ती पहाटफुटणी छोट्या टीचभर खळगीसाठी धरावी आता वाट ही कुठली दगड मातीच्या रस्त्यामधूनी दिसेल काही अमोघ अद्भूत धावत होतो उर फुटोस्तर हाती आले मृगजळ सुंदर म्हातारपण...... झाली आता चांदणसंध्या चक्क कळाले भ्रमनिरास होणे ओलांडून क्षितिजाचे कुंपण उरले फक्त मार्गस्थ होणे

सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर आणि हरिश्चंद्रगड : भाग 1

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 25/12/2023 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच वर्षांपासून सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर पहावयाचे मनात होते. श्री.वल्ली यांचा लेख आल्यावर तर इच्छा अजूनच प्रबळ झाली होती. पण योग येत नव्हता. गेल्या बुधवारी मात्र हा योग जुळून आला. आमचे पारिवारिक मित्र सौ.व श्री. मुजावर यांच्यासोबत त्यांचीच गाडी घेऊन गोंदेश्वर आणि हरिश्चंद्र गड पहायचे ठरले. ठरल्याप्रमाणे पहाटे बरोबर साडे पाचला नव्या मुंबईतून प्रवास सुरु झाला. ठाणे, शहापूर, इगतपुरी मार्गे नऊ वाजता घोटीला पोहचलो. येथे उजवीकडे वळण घेत जुन्या मार्गाने सिन्नरला पोहचायचे होते. भूक लागली होती आणि सकाळच्या औषध गोळ्याही घ्यायची वेळ झाली होती .

लंडनमधील संग्रहालये (भाग १) - कुठे रहावे ?

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 20/12/2023 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, 'लंडनमधील संग्रहालये' असे शीर्षक जरी इथे दिलेले असले, तरी मला अजून लंडनला जायचे आहे. येत्या मार्च मधे आठ-दहा दिवस तिथे राहून बघितलेल्या संग्रहालयांबद्दल लिहावे, अशी इच्छा आहे. लंडनला प्रथमच जाणार असल्याने तिथली काहीच माहिती नाही. airbnb खोली घेऊन उभयतांनी मुक्काम करावा, असा बेत आहे. दररोज मेट्रो /बसचा प्रवास कमित कमी व्हावा, या दृष्टीने हुडकत असता कोणत्या भागातील घरे शोधावीत असा प्रश्न पडला आहे. यावर जाणकार मिपाकरांनी मार्गदर्शन केल्यास खूप मदत होईल. मला मुख्यतः कलासंग्रहालयेच बघायची आहेत.

मुझको ठंड लग रही है..

लेखक आजी यांनी मंगळवार, 19/12/2023 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजे थंडीचा. पावसाळा आणि उन्हाळा मला अजिबातच आवडत नाहीत. मुंबईत राहणाऱ्या नोकरदारांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लोकलनं कामावर जाणं म्हणजे अग्निपरीक्षाच! पावसाच्या तपकिरी रंगाच्या गढूळ पाण्यात काय काय गलिच्छ वस्तू वाहात येतील आणि आपल्या पायाला स्पर्श करतील सांगता येत नाही. कुठं खड्डा असेल, कुठं सरळ रस्ता असेल.रस्त्याची सीमारेषा संपून कुठं गटार लागेल सांगता येत नाही. वाहत्या पाण्यात रस्ता अजिबात दिसत नसताना त्याचा अंदाज घेत चालणं महाकर्मकठीण काम. मला रस्त्यातल्या खड्याची एक महाभयानक आठवण आहे.

२०२३ : वैद्यकीय संशोधनाची झेप

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 18/12/2023 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
२०२३ ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षातील आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे हे सदर यंदापासून चालू करतोय. त्यात आपण वैद्यकाच्या काही महत्वाच्या क्षेत्रातील संशोधनांवर नजर टाकू. अशा विविध संशोधनांची ३ गटांमध्ये वर्गवारी करतो : • रोगनिदान पद्धती • रोगोपचार व प्रतिबंध • वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणे • रोगनिदान पद्धती १. कर्करोगाचे अत्यंत लवकरच्या अवस्थेत(शून्यावस्था) निदान झाल्यास त्यावरील उपचार प्रभावी ठरतात आणि रुग्णाचे आयुष्य सुसह्य होते. असे निदान करण्यासाठी सोप्या व सुटसुटीत चाचणीचा शोध गेली काही वर्षे चालू आहे.