Skip to main content

स्टालिनग्राड भाग-१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 14/04/2016 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कबूल केल्याप्रमाणे मॉस्कोवर लिहिलेल्या लेखानंतर स्टालिनग्राडच्या युद्धावर हा लेख टाकत आहे. मातृभूमीसाठी रशियन सैनिकांनी काय काय पणाला लावले होते हे वाचल्यावर आपली बोटे तोंडात जातात. ( रशियात त्याच्या देशाला ते मातृभूमीच म्हणतात म्हणून असे लिहिले आहे) ज्यांना युद्धातील छायाचित्रे पहावत नाही त्यांनी हा लेख वाचू नये किंवा वाचलाच तर स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा.

आम्रखंड

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 14/04/2016 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ग्रीक दही = १ किलो आंब्याचा पल्प = ५०० ग्रॅम पिठीसाखर = ४५० ग्रॅम मिक्स ड्रायफ्रुट्स = १/४ वाटी किंवा आवडीनुसार विलायची पावडर = १/२ चमचा केशर = ४-५ काड्या मिठ एक चिमटी कृती: १. दही एका फडक्यात बांधुन रात्रभार टांगुन ठेवावे, त्यामुळे त्यातील सगळे पाणी निथळुन जाईल. २. एका बाऊलमधे हे दही घेउन त्यात आंब्याचा पल्प टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.

संदीप खरे

लेखक अनुप देशमुख यांनी गुरुवार, 14/04/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
खर तर संदीप(एकेरी उल्लेखाबद्दल क्षमस्व पण संदीपला सर किंवा अहो म्हणण म्हणजे तो खूप लांब गेल्यासारखा वाटतो) तर संदीप माझ्या फार पूर्वीपासून ओळखीचा... म्हणजे माझ्या कॉलेज पासून फक्त ऐकलेला, तेव्हा नुकतेच मनात पालवी फुटण्याचे वय. आणि त्यातच संदिपच पहील गाण कानावर पडल ते म्हणजे सरीवर सर्.... नुकताच पाऊस पडून गेलेला..मला वाटत कोणीही शहाणा माणूस ते गाणं ऐकल्यावर त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही...तेव्हाच वाटल “कुछ तो बात है इस दिवाने कि बातो मे” ...अक्षरशः दीवाना केल त्याच्या शब्दांनी...

एकरूप

लेखक रातराणी यांनी गुरुवार, 14/04/2016 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
घाटमाथ्यावर पसरले, उन लाल कोवळे पानाफुलात जागले, एक चैतन्य आगळे साज मोत्याचा लेवुन, चराचर नटले निरखून स्वरूप देखणे, साजिरे लाजले घाटमाथ्यावर घंटानाद, शांत जळात घुमला ओल्या पायरीचा गंध, आकाशी दरवळला किलबिल पाखरांची, फांदीफांदीशी लगबग भरदार त्या तरुदेही, सुखी घरट्याचे तरंग घाटमाथ्यावर लागती, तप्त ऊन्हाच्या झळा गाभाऱ्यास देइ थंडावा,रंग कातळाचा काळा उष्मा शोषून आकंठ, येती सावल्या मंडपात ओव्याअभंगांची गोडी,येई साखरफुटान्यात घाटमाथ्यावर विसावले, ऊन सोनेरी सावळे एकांती रमल्या मनोमनी, सावल्यांचे सोहळे कधी गुंफती हात हाती,कधी टिपत पाणी पारावर पाखरे गाती, उन्हापावसाची गाणी घाटमाथ्यावर
काव्यरस

मिपावर चित्रे टाकण्याची कृती

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 14/04/2016 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर चित्रे टाकताना बर्‍याच जणांना समस्या येतात असे दिसते आहे. या विषयावर अगोदर लिहीले गेले आहेच. परंतु सहजपणे ही माहिती समोर असावी यासाठी हा परत केलेला प्रपंच. खालील पायर्‍या वापरल्यास मिपावर चित्रे टाकणे सहजसाध्य होईल. इतकेच नव्हे तर ती योग्य आकारात व प्रमाणबद्ध दिसतील. १. प्रथम तुमची चित्रे गुगल-फोटो, फ्लिकर किंवा तत्सम संस्थळावर चढवा. २. चित्रांचे तिथले स्टेट्स "पब्लिकली शेअर्ड" असे करा. चित्रे मिपावर दिसण्यासाठी हे आवश्यक आहे. असे केल्यावर तुमची चित्रे मिपावर टाकण्यायोग्य स्थितीत येतील. ३.

आभाळानं वाजिवलाय ढोल

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 13/04/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळानं वाजिवलाय ढोल हानम्या सुतार लुना घीऊन झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसलाय तंबाखूची पिशवी घिऊन धुरपी कॉकटेल सर्व्ह करायला निघालीय विमान १८० मैल वेगानं आभाळात झेपावलयं माकडांनी भक्तीसंगिताचा खिस काढत बानूबयावर ठेका धरलाय गोलमेज परिषदेत मारुतीनं शनवारचा उपास सोडलाय एक डोळा झाकून पारध्यानं चिमणीवर निशाना साधलाय बेबेवाडीच्या धरणात वाळूचा उपसा चाललाय डांबरीवर घसरुन संत्याचा पायजमा फाटलाय आरं हाय कारं मंडळी हितं कोण? आज एंडरेल पिऊन आभाळानंच ढोल बडवलाय

हरिश्चंद्रगड - पूर्वार्ध : नळीची वाट

लेखक हकु यांनी बुधवार, 13/04/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
हरिश्चंद्रगड. महाराष्ट्रातलं एक स्वर्गवत ठिकाण. अक्षरशः वेड लावणारं. हरिश्चंद्रगड केला नाही असा 'ट्रेकर' सापडणे अशक्य. एकदा गेलो की तिथे पुन्हा पुन्हा जावंसं वाटतंच. हल्ली तिथे गर्दी वाढली आहे असं कारण मनाशी धरून गेली साधारण तीन साडेतीन वर्षं मी काही हरिश्चंद्रगडावर गेलेलो नव्हतो, पण यावेळी मात्र कारण मिळालं होतं, ते म्हणजे 'नळीची वाट'. ते ही एकदा नाही तर चक्क दोनदा. मागे कधीतरी एकदा संध्याकाळच्या वेळी कोकण कड्यावर बसलो होतो, तेव्हा खांद्यावर लांबलचक दोराची गुंडाळी घेतलेला एक ट्रेकर दिसला. त्याच्या बाकी पेहरावावरून आणि चालण्या- बोलण्यावरून तो एक 'व्यवस्थित' ट्रेकर वाटत होता.

एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम

लेखक शान्तिप्रिय यांनी बुधवार, 13/04/2016 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
१४ एप्रिल. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती. या महामानवास कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन. कर्मठ हिंदु समाजातील काही अतिकर्मठ लोक माणसा माणसांत भेद्भाव करुन रानटी पणे वागत असताना या जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचे रान केले. त्यांच्या प्रयत्नामुळे महाड चे चवदार तळे सर्वांना खुले झाले. जिथे तिथे अस्प्रुश्यतेची माणुसकीहीन परंपरा चालू असताना त्यांनी तिथे तिथे एल्गार पुकारला. याशिवाय भारतीय राज्यघट्ना तयार करण्या साठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. त्या दिवसांत ते दिवसांतून १८ तास काम करीत.

'पुरुष' ... हवा आहे पण कशाला !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी बुधवार, 13/04/2016 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषाचा नराचा खरंच काय उपयोग असतो पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच... एका अभिनेत्रीचे वाक्य ऐकले. मोठी गंभीरपणे घेण्याजोगी ही गोष्ट आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे. काही ठिकाणी तर पुढेही गेलेली आहे. आजच कशाला जुन्या काळीही झाशीच्या राणीने उत्तम युद्ध नेतृत्त्व करून दाखवले होते. तिच्या सैन्यात अनेक स्त्रिया लढत होत्या. अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. कुठलेही क्षेत्र स्त्रीने सोडलेले नाही. पोलिसात ती आहे. विज्ञानात ती आहे. ती डॉक्टर आहे. ती इंजिनीयर आहे. ती सॉफ्टवेयर मधे आहे. तिथे 'ती' 'त्या'ची बॉसही आहे.