Skip to main content

बायको कोण असते...

लेखक निओ यांनी सोमवार, 16/05/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक हलकी फुलकी कविता. बायको कोण असते... कधी ती पायात लुडबुडणारी मांजर असते कधी ती लाडिक चाळे करणारी प्रेयसी असते कधी ती अटीतटीने भांडणारी विरुद्ध पार्टी असते कधी समजून घेणारी मित्र असते कधी त्रास देणारी डोकेदुखी असते कधी मस्का लावणारी असते कधी जवळ असावी असे वाटताना गैरहजर असते आणि कधी नको असताना जवळ असते कधी न सांगता समजून घेते कधी गैरसमज करून घेते कधी मुलांची काळजी करते कधी स्वतःच्या रुपाची तारीफ करते कधी नवर्याला नावे ठेवते कधी नवर्याचा पगार वाढवून सांगते कधी फिरायला नेलं कि नखरे करते कधी हट्टउन हौस पुरवून घेते कधी हौसेने नवीन पदार्थ करून खायला देते कधी शॉपिंगने बेजार कर

तो हा नाथसंकेतीचा दंशु

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 16/05/2016 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
पिण्डे पिंडाचा ग्रासु | तो हा नाथसंकेतीचा दंशु | परि दाऊनि गेला उद्देशु | महाविष्णु ||ज्ञा. ६-२९१|| "अलख निरंजन" आपेगांवच्या गोविंदपंत कुलकर्ण्यांच्या वाडयासमोर उभे राहून त्या कानफाटया जोग्याने आवाज दिला. दाढीजटा वाढवलेल्या, कमरेपासून छातीपर्यंत गुंडाळलेली मेखला, जानव्यासारखी शोभणारी शैली, हरणाच्या शिंगाची शॄंगी, पुंगी, कर्णकुंडले, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, हातात त्रिशूल, काखेत झोळी, पायात खडावा अशा काहीशा आदरयुक्त भीतीदायक वेशात तो जोगी घरातून भिक्षा येण्याची वाट पाहत होता.

जलसाक्षरता : पाण्याच्या देशात!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/05/2016 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मला एका संपादक मित्राने विचारलं, ‘लोकसंस्कृतीतील ओव्यांमध्ये वा लोकगीतांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भात काही मौखिक परंपरा असतील तर त्या उपयोजित करत लेख लिहाल का?’ मी म्हणालो, ‘नाही.’ मी पटकन दिलेल्या ‘नाही’ उत्तराने त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, ‘का?’ ‘कारण आपल्या लोकसंस्कृतीच्या परंपरेत इथं पाणीच पाणी आहे. भारत हा पर्वतांचा आणि नद्यांचा देश आहे. पूर्वीपार नदीच्या काठांवरच गावं वसलेली होती. इथं भरपूर जंगलं होती. म्हणून पाऊसही भरपूर कोसळायचा. पावसाच्या झड्या लागायच्या. पाण्याचे महत्व कळण्याचे दिवस नव्हतेच पूर्वी.

असे 'रामभाऊ' सगळ्या शाळांना मिळोत!

लेखक अज्ञात यांनी रविवार, 15/05/2016 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
रामभाऊ आमच्या शाळेतले शिपाई. नाव रामभाऊ... घंटा वाजवायला, फाईली आणायला, फाईली पोचवायला, पालकांना विद्यारथ्यांचे वर्ग दाखवायला, साफसाफाई वगैरे अगदी सर्वच कामासाठी रामभाऊ! श्रीमुखात मोजून तीन-चार दात, कपाळाला स्तंभा सारखा उंच गंध, कदाचित टक्कल असावं, कदाचित म्हणतोय कारण त्यांना त्यांच्या त्या खाकी गांधी टोपी शिवाय कधी पाहिलेच नाही. दाढी एक एमएम वाढलेली, एका कानाला अत्तराचा कापूस, कंठाला अंगारा, पायात कोल्हापुरी, आता सर्वात महत्वाचं म्हणजे... त्यांचा एक खांदा दुसऱ्या खांद्यापेक्षा जरा वर असायचा नेहमी, त्यामुळे विशेषतः मागून त्यांना पाहिलं की नेहमी देव आनंदचा भास व्हायचा!

< < मजबुरी है > >

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 14/05/2016 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

मन झिम्माड झिम्माड

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 14/05/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या उन्हाच्या काहिलीने अस्वस्थ होत असतानाच मागच्या वर्षी केलेल्या एका अशाच अचानक केलेल्या भ्रमंतीची आठवण आली, आंदर मावळच्या फिरस्तीची. मागच्या पावसात तसा दोनच ठिकाणी गेलो. एक माझ्या आवडत्या नाणेघाटात. जूनमध्ये जो पाऊस तुफ्फान बरसला नेमका त्याच वेळी मी नाणेघाटात होतो. त्यानंतर जो पाऊस गेला तो गेलाच. त्यानंतर मग ऑगस्ट मध्येच बाहेर पडलो ते मावळात जाण्यासाठी. आंदर मावळ म्हणजे मावळातल्या आंद्रा नदीच्या खोर्‍याचा भाग. हा भाग वेढलेला आहे तो आंद्रा, शिरोटे, वडिवळे आणि ठोकळवाडी अशा धरणांनी आणि उंच उंच डोंगररांगांनी. ४/५ महिने सोडले तर हा भाग तसा रुक्ष, दुर्गम, राकट असा.

माझा गाव

लेखक निलम बुचडे यांनी शनिवार, 14/05/2016 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिरव्या डोंगराच्या कुशीत विसावणारा ! खळखळणार्या नद्यांच्या, काठावर वसणारा !! मंदिरातील घंटानादातून, चैतन्य फुलवणारा ! साग्रसंगीत पूजेच्या, सुगंधात रमणारा !! परंपरांची कास धरणारा, रिवाजांचा मान ठेवणारा ! नव्या युगाचे स्वागत , उत्साहाने करणारा !! निसर्गाचे उपकार मानणारा, निसर्गाचा ठेवा जपणारा ! मुक्या जीव-जनावरांना, प्रेमाने वाढवणारा !! सत्याचा मान राखणारा, अन्यायाला ठेचणारा ! आणि उदार मनाने, क्षमा करणारा !! स्वाभिमान जपणारा, मान - सन्मान देणारा ! दुःखितांच्या वाटेवरही, फुले पसरवणारा !! *****----------******------------- Written by - Nilam Buchade.