Skip to main content

तो नुसता ह्ंसायचा

लेखक तिमा यांनी गुरुवार, 09/06/2016 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
तो नुसता हंसायचा, फारफार तर खुणा करायचा तसा कधीचाच येऊन बसला होता,माझ्या साठीनंतर पण, त्याला घाई नव्हती ,कसली मायाही नव्हती लहानपणी,तरुणपणीही, कधी दिसला होता पण तेंव्हा मधेच लुप्त झाला होता बासष्ठीला हॉस्पिटलातही उशाशीच होता, स्तब्ध पहात होता मी विचारलं तर ,अजून वेळ आहे म्हणून खुणावत होता पंचाहत्तरी करायची का बाबा, मुलगा विचारत होता हा मागे मिष्किलपणे डोळे मिचकावत होता ऐंशीनंतर जरा धुरकट दिसू लागले होते तरी हा स्वच्छ दिसत होता कालांतराने ही गेली तेंव्हा दोन दिवस गायब होता सगळे पाहुणे गेले आणि पुन्हा दिसू लागला होता नव्वदी गांठल्यावर सगळे शतायुषीचा आग्रह करत होते तेंव्हाही तो शांत
काव्यरस

ती शिंकं…

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 09/06/2016 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे १९८९-९० ची गोष्ट. खरे कुटुंबीयांकडे राहायचो मी बोरिवलीत. राहत्या घराजवळून ३ बिल्डींग्सच्या अंतरावर. सकाळी काका अमोल (माझा वर्ग मित्र) त्याचा मोठा भाऊ, खरे काका, सर्वांची घाई आपापल्या कामाला बाहेर पडायची. माझ्या तोंडात ब्रश… बेसिन जवळ उभा, त्यात पोटात जरा आवाज येऊ लागला, ‘हुरडा’ पडण्याची वेळ झाली होती माझ्या लक्षात आले! ओ_ओ असा काही चेहरा झालेला माझा पण आत आधीच अमोल गेलेला…मनात म्हणालो… हम्म अजून ५मिनट तरी तग धरावा लागेलच! आणि तो दुर्दैवी क्षण… ती शिंकं काय पाप केलेले काय माहीत, असली भयानक अवस्था विचारू नका!

आंब्याचा बदामी हलवा

लेखक गणपा यांनी गुरुवार, 09/06/2016 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिपावरच्या आम्रोत्सवात आपलंही काही योगदान असावं म्हणून एका प्रदीर्घ विश्रांती नंतर पुन्हा तुमच्या सेवेसी रुजू व्हावे म्हणतो. नेहमी प्रमाणेच माझ्या या प्रयोगालाही आपलंसं म्हणाल याची खात्री आहे.

पर्यटन विशेषांक - बॉलीवूड

लेखक हृषिकेश पांडकर यांनी गुरुवार, 09/06/2016 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवा 'चेन्नई एक्स्प्रेस' प्रदर्शित झाला.दीपिका पादुकोणच्या निमित्ताने माझे पाहणे झाले.सुमारे तीन तासाच्या प्रवासानंतर मी थियेटर मधून बाहेर पडलो.सिनेमाची कथा,गाणी,संवाद या गोष्टींवर नेहमी होते ती चर्चा झाली.सिनेमा कसा आहे, कोणाचा अभिनय कसा आहे इत्यादी पिसे काढून झाल्यावर आम्ही तिथून मार्गस्थ झालो.आता पिक्चर कसा आहे वगरे हे मुद्दे थोडे वादग्रस्त असू शकतात,कारण कोणाला काय आवडावे किव्वा काय आवडू शकेल याचा ताबा आपल्याजवळ नसतो.अर्थात याच वेगवेगळ्या चवी जश्या पाहणार्यांच्या असतात तश्याच त्या दिग्दर्शक गायक आणि लेखक यांच्या देखील असतातच.त्यामुळे सिनेमा कसा होता याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न नक्कीच ना

ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह

लेखक निनाद यांनी गुरुवार, 09/06/2016 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष विषयातील चर्चा करण्यासाठी ज्योतिष व्हॉट्सअ‍ॅप समुह तयार केला आहे. हा समुह ज्यांना ज्योतिषाची थोडीफार माहिती आहे, या विषयात रस आहे अशा सदस्यांसाठीच आहे याची नोंद घ्यावी. ज्योतिष विषयावर माहितेची देवाण घेवाण, सल्ला मसलत, कुंडलीची चर्चा, बदलत्या ग्रहस्थितीमुळे होणारे परिणाम याची चर्चा, नवीन प्रसिद्ध झालेली मासिके, पुस्तके आणि लेख यावर विचार विनिमय, अशा विषयांसाठी असावा अशी धारणा आहे. या समुहावर ज्योतिष/भविष्य संबंधित विषयाशिवाय इतर कोणतीही चर्चा करता येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -९

लेखक मेघना मन्दार यांनी बुधवार, 08/06/2016 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - नउवा आज जरा तब्येत डाऊन असल्याने सकाळी कुठेच गेले नाही. दुपारनंतर घरात बसून कंटाळा आला होता. सकाळी औषध घेतल्याने आता जरा बरं वाटत होतं म्हणून जवळच्या जवळ एका पार्क मध्ये जायचं ठरवलं. रीजण्टस पार्क. ४ रॉयल पार्क पैकी एक आहे हे पार्क. सगळ्याच पार्क प्रमाणे अतीव सुंदर. या पार्क मध्ये जाण्यासाठी रीजण्टस पार्क ट्युब स्टेशन ला उतरावं लागतं. इथून ५ मिन चालत जाण्याच्या अंतरावर आहे हे पार्क. इतर पार्क प्रमाणे रॉयल या उक्तीला साजेसं. ४ पार्क पैकी मला सगळ्यात जास्त आवडलं ते हेच पार्क.

पिस्तुल्या

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 08/06/2016 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
नागराज मंजुळेची हि पहिली शॉर्टफिल्म. अहमदनगरच्या चित्रकार्यशाळेत तिसऱ्या वर्षी त्यानं केलेला खरंतर हा एक प्रोजेक्ट होता. तंत्रज्ञानाच्या बाबतीत बरीच पिछाडीवर असलेली ही कार्यशाळा नागराजला राष्ट्रीय पुरस्कार मिळवण्यापासून रोखू शकली नाही, यातच खरंतर नागराजचं घवघवीत यश आहे. मोजून दोन दिवसात (की सहा?) पिस्तुल्याचं चित्रीकरण पु्र्ण झालं. मात्र त्याआधी त्याने कित्येक दिवस तयारी केली होती. कॅमेरा कोठे ठेवायचा, लोकेशन्स, पात्रनिवड, वगैरेवर बरीच मेहनत घेतली होती. हि केवळ १५ मिनिटांची शॉर्टफिल्म आहे. मात्र नागराजनं त्यातही एक जग उभं केलंय हे नक्की. पात्रं अभिनय करतायत असं कुठेच वाटलं नाही.

आम्रोत्सव

लेखक गणपा यांनी बुधवार, 08/06/2016 16:12 या दिवशी प्रकाशित केले.

रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
 

भूतकाळ सुरु होतो...

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 08/06/2016 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळं आकाश मोकळा तो रस्ता सकाळची वेळ कोवळ्या उन्हाचा तो खेळ सदा सडा प्राजक्ताचा त्यांवर राज्य ते दवाचं कंसात काळजी त्या फुलांची बळी जाई पावली नकळत मागे अंगणात वृंदावनं मुंग्या जणू देती पहारे कधी साखर कधी नारळाचे कधी ताट नैवेद्याचे मागे विहीर दगडी अखंड थंडगार त्यात पाणी काठावर शेवाळं सुंदर जणू सांगे विहिरीची कहाणी गोठ्यात जीव काळे हंबरती तहानेने जोरात साखळी सोडता हळूच वाट जाई थेट हौदात त्यात ठप्प-ठप्प आवाज कधी कैऱ्या कधी नारळ कधी पक्षांचा जीर्ण पानांचा असं शांत ते वादळ अश्या ह्या आठवणी आता झाली ती स्वप्न भूतकाळ सुरु होतो वर्तमान ठेऊन गहाण #सशुश्रीके । ८ जून २०१६
काव्यरस

...आणि मॅनीमल प्ल्यानेटात निवडून येताना .... :( :( :( :) :) :)

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/06/2016 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
"आहा लssय भारी, मी उत्तर, दक्षीण, पूर्व आणि पश्चिमच्या मतदारांपासून आभार व्यक्त करण्यास सुरवात करतो. दिस लय महत्वाचे हाएत, मोठ्ठे मोठ्ठे आकडे लागताहेत. :) :) कस्स सांगू तुमच्या पाठींब्यामुळे मला कित्ती म्हणूण अत्यानंद झाला आहे. :) कुण्णीपण विचारही करु शकणार नाही ते तुमच्या पाठींब्यामुळे साध्य होणार हाय. तुम्हाला माहितीए साध्य काय हाय त्ये :) आज राजखारणात नवा इति-हास खेळण्याची वेळ आली हाय. आज राज्या राज्यातून पाठींबा मिळत आहे. कित्ती मस्त वाटतयं कित्ती मस्त वाटतय, :) हो क्की नाही ?