Skip to main content

(भेट तुझी अन नेट माझी)

लेखक रुपी यांनी शनिवार, 23/07/2016 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
बागेत काही 'खारी' अशा येतात, कि त्यांचा धुमाकूळ किंवा खादाडी खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या फळांवर खूप खोल दात मारुन जातात.. कुठे कुठे केर करुन जातात... आणि नंतर तुम्हाला ती फळे टाकून देताना परत-परत आठवत राहतात :/ :/ मी त्या वेळी घराच्या दुसर्‍या मजल्यावर होते... लोणी कढवून तूप बनवत होते... खिडकीतून 'बदामा'च्या झाडाच्या फांदीवर अशीच 'ती' (खार :/ ) मला नजरेस पडली... ती बहुधा तिथे रोजच येत असावी...इकडेतिकडे पहात होती... बदामवर बदाम फस्त करत होती ती... आमची नजरेला नजर झाली...

पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 23/07/2016 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले.

तृप्ती

लेखक ज्योति अळवणी यांनी शनिवार, 23/07/2016 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
कंच हिरव्या ओल्या गाली मधुमती फुलांचा बहर फुलवि मोहक धरती आर्जवि हसती घननिळा बरस..मी एक प्यासी क्षितिजावर मग तो ही झुकला शामल देहि कवळुनि तिजला चुंबुन म्हणे त्या गौरीला तुज ओटी माझा अंकुर रुजला नव यौवना ती धरा बहरली अंग अंग कांतिही भरली पर्जन्याच्या सहस्त्र स्पर्शी  नव जन्माने तृप्त जाहली
काव्यरस

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - चंदीगड, मनाली

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 22/07/2016 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - तयारी भाग २ - पुणे ते रोहतक भाग ३ - पानिपत ************************ पानिपत ते चंदीगड हा रस्ता इतर कोणत्याही रस्त्याप्रमाणे चांगला रस्ता होता. आंम्ही आता दिल्ली चंदीगड रस्त्यावरच होतो. हरियाणातला खेड्याखेड्यांमधून प्रवास करताना एक मजा दिसत होती. कोणत्याही वस्तूची पाटी लिहिताना मजेदार शब्दरचना केली होती.

एक संघ मैदानातला - भाग १९

लेखक शि बि आय यांनी शुक्रवार, 22/07/2016 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
मी मात्र तो आवाज कुठून येतोय याचा शोध घेण्यासाठी जनरेटरच्या मागे जाऊ लागले. जाता जाता मी जागूकडे पाहिले तिने मला थांबण्याची खूण केली, मी ती जवळ येईपर्यंत थांबले. ती जवळ येऊन काहीतरी खाणा-खुणा करायला लागली पण मला ती काय म्हणतेय ते समजेना. म्हणून मी हात झटकला आणि मागच्या बाजूला जाऊ लागले. तेवढ्यात परत आवाज आला, "आत्ता बरोबर कोणाला आणलं आहेस का तू ?" " अं... नाही... का ?" " मग इकडे तिकडे बघत हात का झटकत आहेस?" आता तो डोक्यात जायला लागला होता. एवढे प्रश्न मला विचारणारा हा कोण टीकोजीराव? " हॅलो... तुम्ही जरा समोर येता का? मग बोलणं जास्त सोपं होईल नाही? असं आडून आडून बोलण बर नाही " " हम्म..

‪निर्गुणी भजने‬ (भाग २.२) - सुनता है गुरु ग्यानी

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 22/07/2016 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
सुनता है गुरु ग्यानी या भजनात अनेक रूपके आहेत. आणि प्रत्येक रूपक दुसऱ्याशी सुसंगत देखील नाही. म्हणून शोधलेल्या संदर्भातील वाचलेले अर्थ मनाचे समाधान करीत नव्हते. एक दिवस डॉ परळीकरांच्या आणि लिंडा हेस यांच्या पुस्तकातील भजनांचा क्रम बघत होतो. परळीकरांच्या पुस्तकात भजने कुठल्याही क्रमाने येतात तर हेस बाईंच्या पुस्तकात ती अक्षरमालेच्या अकारविल्हे क्रमाने येतात. आणि एकदम जाणवले दोन्ही लेखक कबीरांच्या मनस्थिती किंवा भावस्थिती ऐवजी शब्द आणि अक्षरप्रधान अर्थ देत आहेत. जिथे भजनाचा आत्मा निर्गुण आहे तिथे सगुण शब्द मुख्य मानून लावलेला अर्थ माझ्या मनाचे समाधान करणारा होत नव्हता.

बाप्पाचा नैवेद्य

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 22/07/2016 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया! सालाबादप्रमाणे यंदाही आपण गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्याच्या पाककृती मिसळपाववर प्रकाशित करणार आहोत. गणपतीचे विविध प्रकारचे नैवेद्य आपल्या घरी बनत असतात. घरोघरच्या चालीरीतींप्रमाणे खिरापती ,शिदोरी आदि वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 22/07/2016 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
भारतरत्न सचिन.... या धाग्यावर संदीप डांगे याच्या http://www.misalpav.com/comment/860347#comment-860347 या प्रतिसादावर चाललेल्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले.

दोन मूठ राख

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 22/07/2016 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
काव्यरस

अंबाड्याचे लोणचे

लेखक जागु यांनी गुरुवार, 21/07/2016 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ किलो अंबाडे पाव किलो जाडे मिठ (नसेल तर घरचे बारीक चालेल) १०० ग्रॅम राईची डाळ १ चमचा मेथी १ छोटा चमचा हिंग ४ चमचे हळद ८ चमचे लाल तिखट तेल पाव किलो (गरज लागल्यास जास्तही लागू शकत).