बागेत काही 'खारी' अशा येतात, कि त्यांचा धुमाकूळ किंवा खादाडी खूपच कमी वेळेची असते... काही सेकंदाची, फार-फार तर एक-दोन मिनिटांची... पण त्या आपल्या फळांवर खूप खोल दात मारुन जातात.. कुठे कुठे केर करुन जातात... आणि नंतर तुम्हाला ती फळे टाकून देताना परत-परत आठवत राहतात :/ :/ मी त्या वेळी घराच्या दुसर्या मजल्यावर होते... लोणी कढवून तूप बनवत होते... खिडकीतून 'बदामा'च्या झाडाच्या फांदीवर अशीच 'ती' (खार :/ ) मला नजरेस पडली... ती बहुधा तिथे रोजच येत असावी...इकडेतिकडे पहात होती... बदामवर बदाम फस्त करत होती ती... आमची नजरेला नजर झाली... पाच-दहा सेकंद ती माझ्याशी काही तरी बोलली...नजरेने... बहुतेक मला खिजवले असेल :/ :/ आता माझी सटकली आणि मी पळत बाल्कनीत गेले.. नंतर ती मला कधीच भेटली नाही...पण अनेक वेळा तिचा तो चेहरा मला आठवत राहिला... अगदी मघाशी सफरचंदाच्या झाडावर जाळी टाकताना देखील !!
(प्रेरणा)
वाचने
2075
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
म्हणून टाकल्या टाकल्या तुम्ही
धप्प
In reply to म्हणून टाकल्या टाकल्या तुम्ही by एस
=))
खळ्ळ्ळ्ळ.....
-)
हा हा :)
In reply to -) by श्रीरंग_जोशी
छान लिहलय
पाच दहा सेकंदांच्या गप्पा
हो ना..
In reply to पाच दहा सेकंदांच्या गप्पा by ज्योति अळवणी