Skip to main content

अँटोनी गौडी आणि सेग्राड फॅमिलीया

लेखक देतनूशंसाई यांनी सोमवार, 01/08/2016 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
आर्किटेक्चर (वास्तू विशारद) क्षेत्रा बद्दल मला नेहमीच एक खास आकर्षण वाटत आलंय. जसा एखाद्या सुंदर सिनेमाचा खरा visionary हा दिग्दर्शक असतो तसाच एखाद्या भव्य दिव्य इमारती चा किंवा structure चा visionary हा आर्किटेक्ट असतो असं मला वाटतं. खरं म्हंटलं तर आपण ह्या वास्तू विशारद क्षेत्राचे धन्यवाद मानले पाहिजेत कारण निसर्ग पर्यटन सोडलं तर बरेचदा आपले प्रवासाचे निर्णय हे कुठल्या तरी प्रख्यात वास्तू ला भेट द्यायचेच असतात. भारतात म्हणाल तर देशभर असलेली भव्य मंदिरे, आग्र्याचा ताज महाल, वीसपूरचा गोल घुमट, राजस्थान मधील आलिशान राजवाडे.. एवढंच काय आपल्या महाराजांचे किल्ले..

टच मी नॉट

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 01/08/2016 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार सकाळ. अनयाची वाट बघत होतो. नेमके कशासाठी येणार होते ते माहीत नव्ह्ते पण अंदाज करु शकत होतो. अत्यंत तल्लख बुद्धीची अनया. दोन इयत्ता पुढे. ठरल्या वेळी माय लेकी हजर. झळालले चेह्रेरे सगळे काही सांगुन गेले. आई ने सुद्धा फाफट पसारा न लावता मुद्द्याच्या विषयाला हात घातला. पर्समधुन मेडल काढले. होमी भाभा गोल्ड(रंग) दाखवले. "ऑसम. ये तो होना ही था.अभिनंदन" सर, तुमच्या मार्ग दर्शनाशिवाय शक्यच नव्हते. "मी निमित्तमात्र. सगळी मेहेनत तिची. नेक्स्ट स्टॉप एन्. टी.एस. टॉप ५, राइट अनया." अनया ने मान डोलावली. अनया सरांच्या पाया पडुन आशिर्वाद घे. अनया च्या चेहेर्यावर किंचित ढग. " नको पाया पडायची गरज नाही.

दहशतवादाची आग

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/08/2016 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आज सर्वात जास्त अस्वस्थ करणारी गोष्ट असेल तर ती जागतिक दहशतवाद! आज युध्दे परवडतील. अगदी तिसरे महायुध्द सुध्दा परवडेल. कारण युध्दे समोरासमोर होतात. आपल्याशी कोण लढतं, त्याचं बळ किती, हे आपल्याला कळतं. पण आजचा जागतिक दहशतवाद खूप गंभीर आहे. दहशतवादी संखेने कमी असूनही ते खूप मोठे नुकसान करू शकतात. सैन्यालाच नव्हे तर सर्वसामान्य माणसांना लक्ष्य करतात. एक दहशतवादी पन्नास साठ लोकांना मारून मग स्वत: मरतो. आपल्याला अजून जागतिक दहशतवादाचे गांभीर्य अजिबात कळलं नाही हे अनेक घटनांमधून लक्षात येतं. अशा अमानुष दहशतवादाने जगात माणूस शिल्लक राहणार नाही.

चुकचुकली पाल एक...!

लेखक खेडूत यांनी सोमवार, 01/08/2016 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
गीत : चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी गीतातील सूर असे का मधेच पण तुटले तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार ही अशीच तव छाया पण मागे धावणार सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६ *** अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.

|| चारधाम ||

लेखक संदेश यांनी रविवार, 31/07/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी हुश्श..!! चला आज चारधाम यात्रेची बुकिंग करून झाली.. मोठा टप्पा पार केलाय.. केदारनाथाची कृपा .. त्याच्या बोलावण्याशिवाय आपण त्याला भेटू शकत नाही.. पांडव भेटू शकले नाहीत तर आपण काय चीज..!सुरुवात चांगली बॅग विकत घेण्यापासून झाली ती पण यात्रेच्या आदल्यादिवशी.. स्टारबाझार मधून 15 किलो सामान राहील अशी सफारी बॅग घेऊन आलो.. बाकी वायफळ खरेदी आई बरोबर असेल तर होतंच नाही..या आधी हिमालय काय चीज आहे याचा थोडा अनुभव असल्यामुळे त्या वातावरणाला साजेशे असे गरम कपडे त्यावेळी घेऊन ठेवले असल्यामुळे फक्त सुका मेवा तेवढा घेतला. विमानाने जायचं म्हणजे सामानाच्या वजनाकडे लक्ष द्यावेच लागते..

परतून ये तू घरी

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 31/07/2016 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
परतून ये तू घरी

मेघ गुंजले, पवन रुंजले
आतूर झाल्या सरी
राजसा! परतून ये तू घरी॥

सूर्य, तारका, क्षितिज झाकले
किर्र ढगांनी गगन वाकले
गडगड होता बुरुजाभवती
धडधड भरली उरी
राजसा! परतून ये तू घरी॥

नाग, चिचुंद्री बिळात घुसले
पक्षी पिंपळावरती बसले
कडकडता बघ वीज नभाला
थरथरले गिरी-दरी
राजसा! परतून ये तू घरी॥

शिवार भिजले, तरूवर निजले
अश्रू पिऊनी बुबुळं थिजले
हिरमुसले बघ गायवासरू
अन् गहिवरली ओसरी

जगणे...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/07/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो मरता इथे जरासा, थोडा जगून गेलो. ती वेल अमृताची, मीहि तृषार्त होतो गोडीस चाखताना, पुरता भिजून गेलो. लागून आस तेंव्हा, त्या मोहमयं क्षणांची जाळून समय सारा, त्यातच विझून गेलो. ते वेड जन्मपंथी, त्याची मनात दाटी भोगावयास त्याला, मी जन्ममृत्यू झालो. ह्या धाडसास आता, म्हणतो पुन्हा 'खुळे' मी! मिटताच त्यात अंती, थोडा शिकून गेलो. जगणे कसेच होते?, येथे बघून गेलो...... .... अत्रुप्त...

अकादमीला सादर केलेला अहवाल....

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 31/07/2016 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक, फ्रँझ काफ्काच्या तीन कथा लिहून त्याला आदरांजली वाहण्याची इच्छा या तिसर्‍या कथेने पूर्ण करत आहे. या आदरांजलीतील हे शेवटचे पुष्प...