Skip to main content

कुलदिपक

लेखक विप्लव यांनी सोमवार, 08/08/2016 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
" नाही ग आई, ते तसे नाहीत. त्यांच माझ्यावर खुप प्रेम आहे. त्यांनी मला वचन दिलयं लग्नाच." मेघा कळवळून सांगत होती. रडून रडून तिचे टपोरे डोळे सुजले होते. पार्वतीच्या डोळ्यात मात्र अजुनही आग भडकत होती. 'काय केल हे पोरीनं?' मनातच चरफडत होती. ----------*****---------****-------- पार्वतीला गावात सर्वजण पारुमावशी म्हणुन ओळखत असत. पार्वतीचा नवरा भिकाजी अट्टल दारुबाज आणि जुगारी. तसा कष्ट ही करायचा पण मिळवलेले सर्व पैसे नशा करण्यात आणि जुगार खेळण्यात उडवायचा. पार्वति काहि घरामध्ये परटिणीच काम करुन घर चालवायची. पदरात दोन पोर होती मेघा आणि तिच्या पाठचा मंगेश.

गेम

लेखक लालगरूड यांनी सोमवार, 08/08/2016 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - misalpav.com/node/36902 Pokemon Go गेम कशी खेळता आली पाहिजे... मोकळेपणान फिरता आल पाहिजे... थोड़ थांबून..

बेधुंद (भाग १५ )

लेखक अविनाश लोंढे. यांनी सोमवार, 08/08/2016 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
पियाचा मेल वाचत , सुऱ्या 'डेस्कटॉपच्या' 'स्क्रीनकडे' धडधडनाऱ्या छातीने ,अन धावनाऱ्या विचाराने बघत गालातल्या गालात हसला ! का काय माहित ? पण एक वेगळाच आनंद त्याला झाला होता . पटकन त्याने 'याहू'वर 'लॉगिन' केलं , अन पिया त्याला ऑनलाईन दिसली . भावना पण किती विचित्र असतात नाही ? दोघेही अर्धा-एक तास एकमेकांना ऑनलाईन बघत होते पण कुणीच काही बोलत नव्हत . चुंबकाच्या सारख्या बाजू जश्या एकमेकांना दूर ढकलतात तशीच दोघांची खोटी मन एकमेकांना दूर ढकलत होती सुऱ्याने तिचे फोटो 'ओपन' केले . अगोदर तिने पाठवलेल्या 'फेक 'फोटो इतपत सुंदर नव्हती , हे त्याला जाणवले - तरी पण 'हजारात एक' तरी नक्कीच होती .

व्हेज नुडल्स्

लेखक मानसी१ यांनी सोमवार, 08/08/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
व्हेज नुडल्स साहीत्य: नुडल्स - ३ पाकीट व्हिनेगार - ४ चमचे ग्रीन चीली सॉस - ४ चमचे टमाटो सॉस - २ चमचे लसुण - १२/१५. बारीक चिरुन तेल - ४ /५ मोठे चमचे मीठ - चवीनुसार मिरपुड - १ चमचा भाज्या आवडी प्रमाणे. मी खालील घेतल्या कांदा १ ढब्बु मिर्ची - १ गाजर - १ पत्ता कोबी - वाटी भर बारीक चीरुन वाटाणे - १/२ वाटी कृती: सर्व भाज्या बारीक उभ्या चीरुन घ्या. व्हिनेगार व दोन्ही सॉस एकत्र करुन घ्या. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळा. १ चमचा मीठ आणी १ चमचा तेल घाला. नुडल्स पाण्यात शिजवुन घ्या. चाळणी वर उपसुन ठेवा.

(घंटा हलवून बघ)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 08/08/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दावरती रागावू नकोस विचार करून बघ झोपलेल्या मेंदूची घंटा हलवून बघ शेवाळलेल्या मनावरती पूर्वग्रहाचे थर इतिहास परंपरा जाऊ देत वर्तमान घट्ट धर अनुदान माफी काही नकोत पीक ऑरगॅनिक लाव तेव्हा तुला मिळेल शहरी मॉलमधला भाव दिसतो तसा नाही शहरी स्वार्थी व मग्रूर बळीराजाच्या दुःखासाठी त्याचाही भरतो ऊर देऊ नकोस टॅक्स मित्रा तुझ्या शेतकी उत्पन्नापाई भारताच्या भल्यासाठी भलेही इंडिया टॅक्स वाही धरू नकोस फास मित्रा जरी निराशेची धग डोळे उघडून खाटेशेजारील बायका पोरांकडे बघ चिंता नकोस करू मित्रा श्रद्धेनं वारी घेवं मध्यस्त काढून बाजूला माल कस्टमरपुढे ठेव

वेताळ आणि वेताळ !

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 08/08/2016 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
‘आपल्या देशाच्या वाटचालीची दिशा योग्य आहे?.. तुम्हाला काय वाटतं?’.. असा प्रश्न अचानक कुणी तुम्हाला केला तर? तुम्ही लगेचच, क्षणाचाही विलंब न लावता, विश्वासानं उत्तर देऊ शकाल? की हा प्रश्न तुमचं डोकं पोखरून उत्तर शोधू लागेल?.. बराच प्रयत्न करून एखादं उत्तर सापडलंच, तर ते बरोबर असेल की चूक, या संभ्रमाचा भुंगा तुमच्या डोक्यात गुणगुणू लागेल.. आणि अखेर, तुम्ही उत्तर राखून ठेवाल. मग ज्याच्याशी तुम्ही विश्वासानं विचार शेअर करता, त्याला हा प्रश्न विचाराल. कदाचित, त्याचीही तुमच्यासारखीच अवस्था होईल, आणि या प्रश्नाची परिक्रमा सुरू होईल.. परवा कुठल्या तरी ‘न्यूज पोर्टल’वर हा प्रश्न मला दिसला.

बादलीयुद्ध ५

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 08/08/2016 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
बादलीयुद्ध एक , दोन , तीन , चार ------------------------------------------------------------------------------- "अब्बे ही बादली माझी आहे" "अब्बे ही बादली माझी आहे" "अब्बे ही मी विकत घेतली होती" "अब्बे ही राजेशनं मला विकली होती" "अब्बे कोण राजेश?

शांतता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 08/08/2016 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फारच जीवघेणी असते नाही? ----- परवा तू अचानक आलीस दारात तुला पाहुन चमकलो मग सुखावलो येतांना तू आणलेला मोगरा सगळं घर व्यापून उरला गजरा करायला घेतला तुझ्या केसात माळतांना अवचित एक गाठ सुटली गजरा विखुरला, अन् एकदम जाग आली ---- कोसळून गेलेल्या पावसानंतरची शांतता फार जीवघेणी असते नाही? ------ किनार्‍यावर एकटचं भटकतांना 'तो' खडक दिसला पहिली भेट नजरेसमोरुन तराळून गेली तासन् तास त्या खडकावर सुख म्हणजे कायं?

शेवटची भेट - (काल्पनीक)

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 07/08/2016 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची भेट - (काल्पनीक) आज त्याला खुप उदास वाटत होते . त्याच्या गावातील सिनेमा थिएटर आज पाडण्यात येणार होते . थिएटरची इमारत जुनी झाल्यामुळे गेले सहा महिने ते बंदच होते . ते थिएटर पाडुन तिथे एक भव्य शॉपिंग मॉल बांधला जाणार होता . या थिएटरमध्ये पिक्चर्स पाहायला लहान असल्यापासुन ते थिएटर बंद पडेपर्यंत तो बरेचदा गेला होता . कधी आपल्या कुटुंबियांबरोबर , कधी शाळा , कॉलेजातल्या मित्रांबरोबर , तर कधी ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर . अनेक गाजलेले हिंदी , मराठी चित्रपट त्याने या थिएटरच्या सिनेमा हॉलमध्ये पाहिले होते . इंग्रजी हॉलिवूडपटांच्या अचाट दुनियेशीही याच थिएटरमध्ये त्याची ओळख झाली होती .

प्रेम

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 07/08/2016 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम कस जगता आल पाहिजे... मोकळेपणान अनुभवता आल पाहिजे... थोड़ समजून.. थोड़ समजावता आल पाहिजे... वेड बनून.. वेड करता आल पाहिजे.. सगळ्यांना हे जमतच अस नाही... पौर्णिमेचा चंद्र मन जाळतोच अस नाही... पावसातून रोमान्स घडतोच अस नाही... 'प्रेम' नावाचा शब्द 'भाव' बनतोच अस नाही... तरी आजही प्रेमावर जग चालत.. सगळ काही असूनही आपल् माणूस लागत.. 'प्यार में पागल दीवाने को' आजही जग हासत.. आणि मग लपून-छपुन प्रत्येकजण 'प्यार' करत...
काव्यरस