मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(घंटा हलवून बघ)

पगला गजोधर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
शब्दावरती रागावू नकोस विचार करून बघ झोपलेल्या मेंदूची घंटा हलवून बघ शेवाळलेल्या मनावरती पूर्वग्रहाचे थर इतिहास परंपरा जाऊ देत वर्तमान घट्ट धर अनुदान माफी काही नकोत पीक ऑरगॅनिक लाव तेव्हा तुला मिळेल शहरी मॉलमधला भाव दिसतो तसा नाही शहरी स्वार्थी व मग्रूर बळीराजाच्या दुःखासाठी त्याचाही भरतो ऊर देऊ नकोस टॅक्स मित्रा तुझ्या शेतकी उत्पन्नापाई भारताच्या भल्यासाठी भलेही इंडिया टॅक्स वाही धरू नकोस फास मित्रा जरी निराशेची धग डोळे उघडून खाटेशेजारील बायका पोरांकडे बघ चिंता नकोस करू मित्रा श्रद्धेनं वारी घेवं मध्यस्त काढून बाजूला माल कस्टमरपुढे ठेव

वाचने 5254 वाचनखूण प्रतिक्रिया 19

नाखु 08/08/2016 - 13:47
रॉक्स, बुडघाशी# शॉक्स. द (लालांच्या) प्रतिक्रिया येतीलच असे नाही. बुडघाशी उर्फ वकार यूनुस अशी मिपावर एक जमात आहे.

चाणक्य 08/08/2016 - 17:09
एकदम परखड आणि सच्ची. उगाच फुकाचे उमाळे नाहीत आणि विखारी टीकाही नाही. बेश्ट.

चाणक्य 08/08/2016 - 17:12
एक राहिलं :- स्वतंत्र रचना म्हणून हे काव्य परीपूर्ण आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 08/08/2016 - 17:38
छान ! लिखते रहो. -दिलीप बिरुटे

मुक्त विहारि 09/08/2016 - 18:44
"देऊ नकोस टॅक्स मित्रा तुझ्या शेतकी उत्पन्नापाई भारताच्या भल्यासाठी भलेही इंडिया टॅक्स वाही" हे तर क्लासच...