बादलीयुद्ध ११
सुमडीत कुमडी म्हणून त्यादिवशी नुसताच बसून राहिलो. परीक्षेचे दिवस फार वैतागवाणे. म्हणजे रात्रीसुध्दा डोके वगैरे ओले करुन अभ्यासाला बसणे ही माझी पद्धत होती. पुस्तकात जरा कुठं डोकं घातलं की मन कुठल्यातरी डोंगरावर वगैरे जाऊन भटकायचं. हे फार वाईट.
मागं एकदा कुणी सांगितलं होतं की पेटत्या मेनबत्तीकडे एकटक बघत राहावे. मी लाईट वगैरे बंद करुन तसा बघत ही बसलो होतो. बराच वेळ. मग भीतीच वाटायला लागली. बरीच भुतंबितं आजूबाजूला वावरत असल्यासारखी वाटायला लागली. म्हटलं नकोच हे. नंतर पुस्तक उघडल्यावर अक्षरं दिसायची पंचाईत झाली. ते वेगळंच.
नंतर भिंतीवर एक कोरा कागद लावला. त्याच्या मधोमध ठिपका वगैरे.
मिसळपाव
