Skip to main content

मला आवडलेली ५० पुस्तके

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 29/08/2016 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाने एकदा तरी वाचली पाहिजेत अशी मराठी पुस्तके - १) मी कसा झालो? प्र. के. अत्रे २) कर्हेचे पाणी, प्र. के. अत्रे ३) पानिपत, विश्वास पाटील ४) महानायक, विश्वास पाटील ५) झाडाझडती, विश्वास पाटील ६) युगंधर, शिवाजी सावंत ७) छावा, शिवाजी सावंत ८) मृत्युंजय, शिवाजी सावंत ९) स्वामी, रणजित देसाई १०) श्रीमान योगी, रणजित देसाई ११) पावनखिंड, रणजित देसाई १२) व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे १३) बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे १४) असा मी असामी, पु. ल. देशपांडे १५) पुर्वरंग, पु. ल. देशपांडे १६) आहे मनोहर तरी, सुनीता देशपांडे १७) पडघवली, गो. नी. दांडेकर १८) पवनाकाठचा धोंडी, गो. नी.

सादत मन्टो आदरांजली-३ थंडा गोष्त..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 29/08/2016 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘जेव्हा त्याच्या संवेदनांना ठेच पोहोचते तेव्हाच लेखक त्याची लेखणी उचलतो.....’’ - मन्टो त्याच्यावर चालविलेल्या गेलेल्या खटल्यात न्यायधिशाला. स़ादत हसन मन्टो Simple, Free Image and File Hosting at MediaFire सादत मन्टो आदरांजली-१ सादत मन्टो आदरांजली-२ सादत मन्टो आदरांजली-३ थंडा गोष्त.. इश्र्व

टाळी - शतशब्द कथा

लेखक विशाल चंदाले यांनी सोमवार, 29/08/2016 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
काठीवर डाव्या पायाचा भार देत तिने एकापुढे हात पसरले. पाऊल पुढे टाकत त्याने मान हलवली. उपाशीपोटी ती हात पसरत पुढे निघाली. एक, दोन रुपयांपेक्षा जास्त मिळत नव्हते. नळावर पाणी पीत असताना एका टाळीने तिचं लक्ष्य वेधून घेतलं. एक हिजडा रेल्वेमध्ये टाळी वाजवून हात पसरत होता/ती. लोक लगबग करून दहा रुपयाची नोट हातावर टेकवत होते. तिने हातातल्या एक रुपयांकडे बघून आशाळभूत नजरेने हिजड्याच्या हातातल्या दहा रुपयांकडे बघितले. मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला दूषणे देत ती निघाली. एकाएकी तिचा चेहरा उजळला. ती थबकली. तिला काहीतरी सापडलं होतं. तिने नळावर चेहरा धुतला. रुपयाचं पान खाऊन तोंड रंगवलं.

बारशिंगे

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 29/08/2016 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
बारशिंगे माझा गेली अनेक वर्षे मशिनरी व स्पेअर्स तयार करण्याचा कारखाना आहे . या कारखान्यात काम करण्यासाठी अनेक प्रकारचे लोक आम्हाला नेहमीच लागत असतात .यात मशीन ऑपरेटर ,वेल्डर ,क्लार्क यांची भरती हि सातत्याने चालूच असते . बरेच लोक अनेक वर्षे इथे काम करतात तर कांही लोक अल्प काळातच काम सोडून दुसरीकडे नोकरी साठी जातात .या गोष्टी अनेक वर्षे चालूच आहेत . माझ्या व्यवसायाच्या सुरवातीच्या काळात माझ्या कडे श्री. बारशिंगे ( नाव बदलेले आहे ) नावाचा एक तरुण मुलगा मशीन ऑपरेटर म्ह्णून कामाला होता . बारशिंगे अतिशय बोलक्या स्वभावाचा,दिसायला रुबाबदार, मेहनती व खटपट्या असे एकूण त्याचे व्यक्तीमत्व होते.

आम्ही बाजींच्या लेकी

लेखक दिपाली पोटे यांनी सोमवार, 29/08/2016 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श. दररोजची माझी सीट पकडली आजपण. समोरची ओळखीचे हसली. तसे तिचे तिरकस हसणे सोडून तिच्या बद्दल मला काहीच माहित नाही मात्र सकाळी तिचे दर्शन नाही झाले तर दिवसाची चांगली सुरुवात होत नाही असा माझा वेडा समज आहे. नवरा, सासू, आई आणि दररोजची ट्रेन मधली सखी साऱ्यांना फोन लावून सगळे ठीक आहे तपासून घेतले. शांत होते कुठे ते पुढचे स्टेशन आले. आणि दुसरी फौज चढली ट्रेन मध्ये. कोण कुठे उतरणार चौकशी करून आपापल्या सीट राखून ठेवल्या. मग पुढचे स्टेशन आणि तिसरी फौज, आणि अशा ट्रेन मध्ये फौजा चढू लागल्या आणि उतरू हि लागल्या.

मंटोच्या लघु कथा १ : घाटे का सौदा

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 29/08/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
सआदत हसन मंटो साहित्यातलं असं एक वादळ होतं, ज्याने तत्कालीन समाजाला मुळापासून हादरवून सोडलं. त्याने ५० वर्षांपूर्वी जे लिखाण केलंय ते आजही लागू होतं यातच त्याच्या लिखाणाची प्रगल्भता दिसून येते. आपल्या उण्यापुऱ्या ४२ वर्ष, आठ महिने आणि ७ दिवसांच्या आयुष्यात त्याला लिहायला फक्त १९ वर्षे मिळाली आणि या एकोणवीस वर्षात त्याने २३० कथा, ६७ रेडियो नाटकं, २२ शब्दचित्र आणि ७० लेख लिहलेत. साम्यवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या मंटोला आपल्या लिखाणामुळे कित्येकदा कोर्टाची पायरी सुद्धा चढावी लागली. इथे मी मंटोच्या लघुकथांचं अनुवाद करणार आहे.

शेम्बुड आख्यान

लेखक इल्यूमिनाटस यांनी सोमवार, 29/08/2016 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतला एक प्रसंग आठवला. आता या प्रसंगातून सात्विक बोध घ्यावा असे काही नाही आणि ही गोष्ट फार कौतुकाने सांगावी अशातला ही भाग नाही (नावावरून स्पष्ट च आहे!) तरी विरंगुळा म्हणून लिहितो आहे. वैधानिक इशारा- मन कणखर करा, कारण गोष्टीत बराच शेम्बुड आहे! शाळा सूरू होऊन दोन महिने झाले होते , तरी अजून नवीन युनिफॉर्म चा पत्ता नव्हता. मला या युनिफॉर्म चं भलतंच आकर्षण वाटायचं. युनिफॉर्म घातल्यावर सगळीच माणसं रुबाबदार दिसतात असं उगीचच मला वाटायचं, आणि ज्ञान प्रबोधीनी चा युनिफॉर्म तर काही औरच! गुलाबी कुर्ता, पांढरी विजार आणि डोक्यावर गांधी टोपी. हे कुर्ता वगैरे प्रकरण माझ्यासाठी जरा नवीनच होतं.

न्यू यॉर्क : ०२ : शहराची तोंडओळख

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 29/08/2016 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
=============================================================================== न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...               ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर...

झाडावर पाखरू बसलं : लावणी

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 28/08/2016 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
झाडावर पाखरू बसलं : लावणी

पाडाशी आला आंबा बघुनी
आभाळ खुदू खुदू हसलं
चोच टोचण्यास पोपट बघतंय
टक लावून एकतार टपलं
कुणी तरी याssss गं
पोपट धराssss गं
माझ्या धीराचं अवसान खचलं
गं बाई माझ्याsssss
झाडावर पाखरू बसलं ...||धृ||

आडून येती, झाडून येती
चहुबाजूला थवेच दिसती
लगट करुनी झोंबाझोंबी
पानाच्या आडोशाला धसती
चोचटोचुनी चोची चरती
माझ्या फळांची खादल करती
कुणी तरी याssss गं
अलग कराssss गं
माझं काळीज चोळीत थिजलं