Skip to main content

Isle of Wight

लेखक अश्विनी वैद्य यांनी शुक्रवार, 30/09/2016 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
Isle of Wight सलगच्या तीन आठवड्याच्या पावसाच्या पिरपिरीने अगदी वैताग आला होता तेव्हा अचानक दोन दिवसांनंतर येणारा विकांत सूर्यदर्शनाने उजळून निघणार आहे असे weather app ने दाखवले, तेव्हा लागलीच बुकिंग केले आणि गेल्या शुक्रवारी संध्याकाळी Isle Of Wight या British Island कडे जायचे पक्के झाले. तसे आम्ही South Of England मध्येच असल्याने राहत्या ठिकाणापासून साधारण तासाभराच्या अंतरावर असलेल्या इंग्लिश खाडीमध्ये दिसणाऱ्या या Island वर जाणे फार काही कष्टाचे नव्हते.

बौद्धधर्मप्रसारक... भाग-६ शेवटचा.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/09/2016 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
‘‘ फो ’’ बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह. Simple, Free Image and File Hosting at MediaFire बौद्धधर्मप्रसारक... भाग-१ बौद्धधर्मप्रसारक... भाग-२ बौद्धधर्मप्रसारक... भाग-३ बौद्धधर्मप्रसारक...

खुलता खुळी खुलेना...

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/09/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक चुकून तसे लिहीले गेले नाहीय किंवा टाइपो ही नाहीय :) 'खुलता कळी खुलेना' या धन्य सिरेलचे नाव 'खुलता खुळी खुलेना' असेच काहीतरी असायला हवे होते किंवा मग, तू एक खुळा अन मी एक खुळी, आम्ही सारे खुळे, खुळ्यांचा खेळ चाले, काहीही चालले असते. या नावाचे क्रेडिट एका सखी शेजारणीला, खूप दिवसांनी ती निवांत गप्पा मारायला आली असतांना घरी हा प्रकार लागलेला होता, तेव्हा तिने शिरेलचे असे बारसे झाल्याची मौलिक माहिती पुरवली. आम्हाला काय मग, खी खी करायला तेवढेच निमित्त :) सिरेलचे शीर्षकगीत अत्यंत सुरेल आहे, गायिका श्रेया घोषाल असल्यावर प्रश्नच नाही म्हणा.

दसरा - एक छोटीशी कथा

लेखक स्वलिखित यांनी शुक्रवार, 30/09/2016 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
कर्णपुर्याची यात्रा तशी छान वाटली. आज दसर्याच्या दिवशी गर्दीला ऊत आला होता. चार मित्रांसोबत यात्रेत फिरन्याची मजा काही ओरच. लाल निळ्या पिवळ्या ट्युबच्या उजेडाने तो परिसर जनु इंदधनुष्याचा प्रकाश पडावा असे वाटत होते. पारदर्शक मोरपिसतुन पडनार्या प्रकाशा प्रामने यात्रा वाटली, भरपुर गोश्टींचा आनंद लुटला. मंदिरात देवीचं दर्शन घेतल आणि बाहेर पडण्यसाठी मार्ग शोधला. तिथेच एक आजी आजच सोनं विकत होत्या. पाहुन नवल वाटलं. औरंगाबाद सारख्या शहरातही आजकाल आपट्याची पानं विकली जावित याचच काय ते नवल!! आता औरंगाबादही ईतर शहरांसोबत मोजलं जानार याचं दुख:ही झालं. वीस रुपयाला दोन फांद्या विकत घेतल्या.

काळरात्र (भाग ३) आयझँक असिमोव्ह

लेखक विचित्रा यांनी शुक्रवार, 30/09/2016 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
" असं बघा, या वेळी माझ्याच प्रसिद्धीचा तुम्हाला उपयोग होईल. मी तुम्हाला मुर्खशिरोमणी म्हणून सादर केल्यामुळे लोक तुम्हाला हसतील, टिंगल करतील, पण देशद्रोही नाही समजणार. बदल्यात मला पण सनसनाटी बातमी मिळेल." यावेळी बिनी पण मदतीला आला. " आम्हाला त्याचं म्हणणं पटतंय सर. जर आपल्या गणितामध्ये, गृहीतकांमध्ये एखादी चूक राहिली असेल,अगदी हजारात एक अशी, तरी त्या बाजूनेही आपण पर्याय शिल्लक ठेवला पाहिजे. " आजूबाजूच्या आपल्या सहकार्यांना माना डोलवताना पाहून अँटनचा नाईलाज झाला."ठीक आहे. थांब तुला हवं तर. पण आमच्या कामात कोणताही अडथळा येता कामा नये. मी इथल्या व्यवस्थेचा प्रमुख आहे.

सगळं कस साधं सोप्प

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 30/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं कस साधं सोप्प एक घर, एक गाडी आई बाबा आहेत ना फ्रेम मध्ये एक मुलगी पण मुलगा पाहिजेच आणि बायको अन मी...

एका ठिपक्याची रांगोळी ह्या आगामी कादंबरीचा भाग

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 30/09/2016 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाकोरीबाहेर जाऊन चाकोरी न सोडण्याचं तंत्र आज्जीला खासच जमलं होतं . आज्जी तेव्हा विठ्ठल सायन्नाला म्हणजे ठाण्याच्या सिव्हील हॉस्पीटलला दाई होती. चौथी पास झालेल्या बायांना तेव्हा मिड वायफरीला प्रवेश मिळायचा. ठाण्यात तेव्हा अडलेली बाळंतीण सोडवण्यासाठी गरीबांसाठी असं हे एकच हॉस्पीटल होतं. तेव्हा मालती बाई चिटणीसांच पण हॉस्पीटल नसावं. वैद्य किंवा देवधर तेव्हा नव्हतेच. सांगायचं ते काय की आज्जी दिवसभर बाळंतपणं करण्यात गुंतलेली. ननूमामा म्हणजे आज्जीच्या सवतीचा मुलगा.त्याला त्याच्या मामानी हट्ट करून नंदुरबारलाच ठेवून घेतला होता.

माझ्या मना लागो छंद....!

लेखक अमृत यांनी शुक्रवार, 30/09/2016 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
अर्ध्याहून अधिक बालपण ३ खोल्यांच्या आगगाडीच्या डब्यासारख्या खोल्यांतून गेले त्यामूळे बागेशी व त्यायोगे झाडांशी थेट असा संबंध फारसा आला नाही. नाही म्हणायला मावशीच्या घरी थोडीफार झाडं होती पेरू, डाळिंब, पपई, चक्री (पांढर्या फुलांचे झाड याला विदर्भात चक्री म्हणतात). पण तो संबंध केवळ तिच्या घरी जाण्यापूरता होता. सातवी आठवीत असताना स्वतःच्या घरात राहायला गेल्यावर मात्र बागकामाचे बाळकडू वडीलांकडून मिळायला लागले. सुरुवात झाली ती बोगनवेलीपासून. घराला भलामोठा गोलाकार पोर्च(व्हरांडा) होता.या पोर्चवर बोगनवेल खूप छान बहरली. सोबतीला काही गुलाब, कुंदा, चमेली सुद्धा लावलेत.

श्रावण...

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 30/09/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण... फेकून चादर काळोखाची सोनपावली उन्हे उतरली वारा शीळ घाली धरती नवचैतन्याने थरथरली पावसाच्या शिडकाव्याने हिरवी काचोळी भिजली लेऊन हार नवकुसुमांचा नवयोवना जणू हि सजली घेण्यास बाहुपाशात नभ टेकले क्षितिजा पलीकडे उधळीत सप्तरंग आकाशी इंद्रधनुकली हि अवतरली राजेंद्र देवी