साहित्य
६०० ते ७५० ग्रॅम चिकन, तुकडे करून
२ मध्यम आकाराचे कांदे, बारीक चिरून
३ ते ४ चमचे मिरचीचा खर्डा
१ चमचा जिरं
१ चमचा धने पावडर
१ चमचा मसाला
१/२ चमचा हळद
२ मोठे चमचे तेल
एका लिंबाचा रस
मीठ, चवीनुसार
आल्याचे उभे बारीक काप
बारीक चिरलेली कोथिंबीर
एकदा मित्राने हॉटेलात हि डिश खाऊन मला अवश्य खाऊन बघ, असे सुचवले. मी लगेच पार्सल आणून खाऊन बघितली आणि अर्थातच आवडली. मग थोडे प्रयोग करून घरीच करून बघितली. ह्यात वापरायचा मिरचीच्या खर्ड्याची पाककृती लवकरच टाकेन, तोवर ती इंग्रजीत
इथे वाचू शकता. मी खास ह्या साठी गावरान कोंबडा आणलेला, पण ब्रॉयलर चिकनची पण छान पाककृती होते.
कृती
चिकनच्या तुकड्याना स्वच्छ धुवून कोरडे करून त्याला थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा ते एक तास मुरत ठेवा. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरं घाला. जिरं तडतडलं कि कांदा घालून तो थोडा वेळ परतून घ्या. हळद, धने पावडर आणि निम्मा गरम मसाला घालून परतून घ्या.
ह्यात चिकनचे तुकडे घालून ते रंग बदलेस्तोवर मोठ्या आचेवर परतून घ्या. (साधारण ३ ते ५ मिनिटे). आता गॅस बारीक करून, साधारण एक ते दिड वाटी पाणी घालून, चिकन मंद आचेवर झाकण ठेऊन शिजवा. (पाणी आटून गेले तर थोडं अजून घाला).
चिकन शिजल्यावर, मिरचीचा खर्डा ह्यात घाला. चिकनला खर्डा सगळीकडून लागेल असे ढवळून उरलेला गरम मसाला घालून परत एक वाफ काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून, बारीक चिरलेल्या कोथिंबीर आणि आल्याच्या कापांनी सजवून, गरम भाकरी, कांदा आणि लिंबाच्या फोडी बरोबर वाढा!
[मिरचीचा खर्डा करताना आपण त्यात मीठ वापरतो, म्हणून मीठ शेवटी चव बघून मगच घाला. मिरच्या किती तिखट आहेत त्यावर खर्डा किती घालायचा ह्याचे प्रमाण ठरेल. हि पाककृती झटपट करायची असेल,तर चिकन आधी मिठाच्या पाण्यात उकडून घ्या, मग इतर कृती वरील प्रमाणे करून पटकन तयार करू शकता. गावरान चिकन शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे त्या प्रमाणात पाणी घाला. ह्याला रस्सा अगदीच अंगासरशी ठेवा किंवा ठेवला नाही तरी चालेल. हा पदार्थ तसा सुक्काच असतो, त्यामुळे अर्थातच "चकना" म्हणून देखील चालू शकेल]
प्रतिक्रिया
एकच फोटो न्याय देत नाही.
सायकलवर आणला होता का..??
In reply to एकच फोटो न्याय देत नाही. by मोदक
हा हा हा हा
In reply to सायकलवर आणला होता का..?? by केडी
मस्त फोटो
मस्तच
छान...!
गावरान कोंबडा वापरूनच करून
मस्त! इट, लिव्ह, कुक तुमचाच
हो माझाच आहे. गेली ३ वर्ष
In reply to मस्त! इट, लिव्ह, कुक तुमचाच by यशोधरा
भारीये.
In reply to हो माझाच आहे. गेली ३ वर्ष by केडी
लिन्क
अहो फोटोत दिली आहे लिंक
In reply to लिन्क by सरल मान
धन्यवाद सर....
In reply to अहो फोटोत दिली आहे लिंक by केडी
खायला घाला. नुसत्या रेसिपी
मस्त रेसेपी.. ब्लॉग आवडला
चिकन काही खात नाही. तुमची
__/\__ धन्यवाद!
In reply to चिकन काही खात नाही. तुमची by अजया
वाट पाहीन
खायला न घालता फक्त पाककृती
छान रेसिपी .........!
हो टाकेन अजून एयर फ्रायर च्या
In reply to छान रेसिपी .........! by रॉजरमूर
यम्मी!
हे चिकन करून खाल्ल्यावरच
हो नक्की करून बघा आणि फोटो
In reply to हे चिकन करून खाल्ल्यावरच by आनंदी गोपाळ
(खाली) प्रतिसाद दिला आहे.
In reply to हो नक्की करून बघा आणि फोटो by केडी
2670 वाचने
करने वालोऽ या तो ये चिकन कर के खाओ, या तो डुब मरो...:-))) मंडळ आभारी आहे __/\__
In reply to (खाली) प्रतिसाद दिला आहे. by आनंदी गोपाळ
ब्लॉग मस्त आहे
सह्च दिसते आहे चिअक्न., भारी
पाककृतीत वापरलेल्या मिरची
च्यामाय्ला! कस्ली खत्तरनाक टेस्ट होती भावा!!
आता करुन बघायलाच हवं.
In reply to च्यामाय्ला! कस्ली खत्तरनाक टेस्ट होती भावा!! by आनंदी गोपाळ
क्या बात है! सर (तुम्हा)ला पण
In reply to च्यामाय्ला! कस्ली खत्तरनाक टेस्ट होती भावा!! by आनंदी गोपाळ