Skip to main content

मिराशी

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 16/04/2024 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मी नाही कुणाचा बाप मी नाही कुणाचा आजा रंग बदलतो मी वारंवार कुंपणावरचा सरडा जसा मी न कुणाचे खातो, ल्यातो तो श्रीराम आम्हांला देतो लळा जिव्हाळा नाती गोती मी वेशीवर टांगून रहातो नाही कुणाची पर्वा, आशा नाही पुसले म्हणून निराशा स्वानंदाचे टाळ घेऊन हाती जगतो मी माझीच मिराशी

Being Sentimental.

लेखक भागो यांनी सोमवार, 15/04/2024 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
Being Sentimental. मी आपला खुशाल सकाळचा चहा नाश्ता करण्यासाठी टपरीवर बसलो होतो. चहावाल्याने रेडिओवर हिंदी सिनेगीत लावलं होतं. मूड एकदम मस्त जमला होता. पण तुम्ही तुमच्या धूनमध्ये आनंदात आहात हे लोकांना आवडत नाही, देव सुद्धा त्यांच्या मदतीला धावतो. कसं ते पहा. मी चहाचे घुटके घेत होतो तर “सैय्या बेईमान...” हे गाणं वाजत होतं. तर आलाच तो. चुरगळलेला झब्बा पायजमा, डोळे तारवटलेले. झोप झाली नसणार. माझ्याच शेजारी येऊन बसला. जब गीदड़ की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है हे कुणी तरी चुकून लिहीलं असणार. कारण इथे पळायची गरज नव्हती. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मोबाईल काढला.

अदृष्ट

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 14/04/2024 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिशा-कोन ढळले, सावरले, ...अथांग उरले, रेणुबंध खिळखिळले, जुळले, ...अजोड उरले, नक्षत्रे विझली, झगमगली, ...ओजस उरले, चित्रलिपी अडली, उलगडली, ...अव्यक्त उरले, अज्ञेयाच्या उंबरठ्यावर ज्ञात थबकले, अदृष्ट दिसले.

आज कल पाव जमीं पर .......

लेखक सावि यांनी शनिवार, 13/04/2024 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज कल पाव जमीं पर ....... हो हो अगदी असंच वाटतंय मागचे ३ आठवडे झाले. पण ही भावना सुद्धा थोडी अर्धवट च आहे, कारण माझा एकच पाय जमिनीवर आहे. गुडघा दुखत होता म्हणून डाव्या गुडघ्याची एक छोटीशी मिनिस्कस रिपेअर सर्जरी झाली ३ आठवड्यापूर्वी. हा पाय आणि जमिनीचा स्पर्श ३ आठवडे साठी वर्ज आणि अगदी तेंव्हा पासून मी सगळ्या गोष्टींसाठी एका पायावर तयार असतो ! एक पाय हवेत - "आज मैं उपर आसमा नीचे" गुणगुणत होता तर दुसरा पाय जमिनीवर संपूर्ण भार घेऊन दुःखी शायर बनला होता "बहोत छालो का दुख है नसीब में, शायद उसुलो पे चलने कि सजा मिली है". बरं सगळं काम जमिनीवरचा पाय करत असला तरी कौतुक हवेतल्या पायचेच ..

जमिनींच इनसाईडर ट्रेडींग, एक दुर्लक्षित प्रश्न

लेखक माहितगार यांनी शनिवार, 13/04/2024 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
इनसाईडर ट्रेडींग म्हणजे थोडक्यात गुप्त माहितीच्या आधारे सौदेबाजी. उदाहरणार्थ सार्वजनिक कंपनीच्या शेअर स्टॉक किंवा इतर सिक्युरिटीज (जैसे बॉण्ड्स किंवा स्टॉक ऑप्शन्स) च्या किमतींवर कंपनीच्या आर्थिक स्थिती आणि भावी प्रकल्पांची माहितीचा प्रभाव पडेल. अशी माहिती सर्व शेअर होल्डर्स पर्यंत अधिकृतपणे पोहोचण्या आधीच ज्यांच्या कडे ज्यांना कंपनीबद्दल गुप्त, महत्त्वाची माहिती आहे ते माहिती आधिकृतपणे जाहीर होऊन किमती वाढण्या किंवा कमी होण्या आधीच शेअरची खरेदी किंवा विक्री करून इतर सर्वसामान्य शेअर होल्डरच्या आधीच स्वतःच्या पदरात फायदा पाडून घेतात.

पाकिस्तान- १०

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 13/04/2024 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
. चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.” साहजिकच तो खूप ट्रोल झाला पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण बहुतेक वेळा पाकिस्तानला जिंकताना पाहिले. 2004 पूर्वी भारत पाकिस्तानमध्ये एक सिरीजच काय एक कसोटी सामनाही जिंकू शकला नव्हता. गावस्कर आणि अझरुद्दीनचा संघही अपयशी ठरला. भारतानेही त्यांना सहजासहजी जिंकू दिले नाही. वीसपैकी पंधरा टेस्ट ड्रॉ झाल्या.

इकिगाई(ऐसी अक्षरे...१६)

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 12/04/2024 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
इकिगाई A अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई पश्चिमेकडील जीवनशैली आकर्षित करतांच भारताच्या पूर्वेला एक राखेतून भक्कम उभा राहिलेला देश जपान.लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानमधील ब्ल्यू झोनमधील उदा.ओकिनावा दीर्घायुषी व्यक्ती असणारे सेंटोंरियन्स यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आह

कॉफी __२

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 12/04/2024 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
कॉफी___2 अनोळखी भाषेच्या शहरातल्या म्युझियमच्या लांबलचक संगमरवरी पाय-या चढता चढताच आपण थक्क होऊन जातो. आतल्या दालनांतली रेंम्ब्रां आणि कार्व्हाजिओ आणि विंची आणि कोणन् कोणाची चित्रं शिल्पं पहाताना कळतं यांना फोटोत बंद करणं केवळ अशक्य .. आणि आपोआप मोबाईल पर्समध्ये जातो. ..…. फिरून फिरून पाय दुखायला लागले असतात, दुपार उलटून चालली असते, आता एक शेवटचं दालन मग बाहेर पडायचं असं आपण ठरवतो.

माझ्या मिपावरील लेखांचं इंग्रजी पुस्तक We are the Quarry, Fate is the Hunter

लेखक स्वीट टॉकर यांनी गुरुवार, 11/04/2024 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मिपावर लिहिलेले माझे बोटीवरचे आणि इतर सर्व अनुभव अर्थातच मराठीत आहेत. प्रतिसादामध्ये तुम्ही त्यांचं कौतुक खूपच केलंत. मात्र हल्ली बहुतांश मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण झाल्यामुळे मराठी व्यवस्थित वाचता येत नाही. 'वाचता येत नाही' असं म्हणणं तितकसं बरोबर नाही. ते टाळतात. दुसरी गोष्ट म्हणजे माझे नव्वद टक्के विद्यार्थी अमराठी आहेत. त्यांना मी कॉलेजमध्ये जेव्हां यातल्या काही गोष्टी सांगितल्या तेव्हां त्यांनी आग्रह धरला की मी त्याचं इंग्रजीत पुस्तक करावं. मी सर्व अनुभव पुन्हा इंग्रजीत लिहिले आणि कालच त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आहे.

मी काय चुकीचे केले??

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी गुरुवार, 11/04/2024 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय चुकीचे केले?? “कुणी दहावीचा विद्यार्थी तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाताना दिसल्यास त्याला लिफ्ट द्या.” असा मॅसेज एकाने व्हॉट्सअप समूहात टाकला. त्याला “तुला दहावीत किती टक्के होते??” विचारले. त्याने मला फोन करुन शिव्या घातल्या. मी काय चुकीचे केले?? भालाफेकीत भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. “निरज चोप्रा हा भारतातील दुसरा सर्वात लांब फेकणारा खेळाडू आहे.” मॅसेज मी व्हॉट्सअप समूहात टाकला. समूहसंचालकाने मला रिमूव केले. मी काय चुकीचे केले?? एकाने लग्न झाल्यानंतर प्रिव्हेडिंग चे फोटो फेसबुक वर टाकले. मी “बारश्याला बोलव रे” अशी कमेंट केली.