Skip to main content

निसर्गाचं गाणं

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 14/10/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाचं गाणं ओला घाट, नागमोडी वाट केवड्याचे रान, घनदाट केवड्याचे रान, सळसळते नागीण वारा वाजवी सुमधुर बीन ओले रान, ओले पान ओंजळ छोटीसी, निसर्गाचे दान कडेकपारीतून वाहती निर्झरांचे पाट रानातून हुंदडे वारा पिसाट विसरुनी भान, तुडवितो रान ओठावरती फक्त निसर्गाचं गाणं राजेंद्र देवी

काटा वजनाचा --६

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 13/10/2016 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
काटा वजनाचा -१ काटा वजनाचा -२ काटा वजनाचा -३ काटा वजनाचा --४ काटा वजनाचा --५ अति खाण्याचे सामाजिक मानसशास्त्र-- आता हे आणिक काय ? अशी कल्पना करून पहा आपण आपले वजन कमी करण्याचा सु(दृढ) निश्चय केलेला आहे आणि नेमका त्यात आपल्या मित्रांबरोबर मेजवानीचा बेत ठरला आहे. आपण निश्चय केला आहे आहे कि उगाच तेथे अरबट चरबट खायचे नाही.

रात्र-कोजागरीच्या निमित्ताने

लेखक पिशी अबोली यांनी गुरुवार, 13/10/2016 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोजागरीच्या रात्री जागायचं लहानपणी खूप अप्रूप होतं. 'को जागर्ति' म्हणत देवी आली आणि मी झोपलेली असले तर कसं चालेल, असा माझ्या दृष्टीने बिनतोड प्रश्न बाबांसमोर केलेला आठवतो. 'मी खात्री पटवून देईन तिची तू झोपलेली असलीस तरी जागीच आहेस याची' हे तेवढंच बिनतोड उत्तर पेंगुळलेल्या डोळ्यांनी ऐकताना खरं वाटणारच! पुढे वर्षातून एकदा जागवायची रात्र रोजचीच होऊन गेली, तेव्हा रात्रीचं खरंखुरं रूप कळायला लागलं.. घरी असले, की रात्रीत निरनिराळे आवाज पावसाळ्यात येतातच, पण पावसाळा संपला की रातकिडे किरकिर करू लागतात. कित्येकदा घरच्या फोनवर रातकिड्यांचा आवाज ऐकू येतो आणि खूप शांत वाटतं.

रामोजी फिल्म सिटी बद्दल माहिती हवी आहे...!!

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 13/10/2016 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी..!! नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवस प्रितेर्थ रामोजी फिल्म सिटी (हैद्राबाद) पाहण्याचा मानस आहे. नुसता मानस च नाही तर संकल्प सुद्धा सोडला गेला आहे. अर्थातच म्याडम साहेबानी ...!! अंतर जालावरती खूप पुनरावलोकन तपासली पण मनाचे समाधान नाही झाले.

मन

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 13/10/2016 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
मन विचाराचे घर मन कृतीचे आगर मन अथांग सागर मन मधुर साखर मन आभाळीचा रंग मन आत्मरंगी दंग मन देहाचा आरसा मन स्नेहाचा वारसा मन मायेचे माहेर मन देवाचा आहेर मन चंचल चंचल मन कधी अविचल मन मोकाट मोकाट मन कधीचे मुकाट मन धावे सैरावैरा मन माळावरला वारा मन गरीब पामर मन कधी अनावर मन वेडेही भासते मन मनात हासते...

माझे स्वप्न...

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 13/10/2016 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्वप्न... तुझी नाजुकता फुलात आहे फुलाचा गंध तुझ्यात आहे तुझी अवखळता पाण्यात आहे पाण्याची झुळझुळता तुझ्यात आहे तुझ्या रागाची धग आगीत आहे आगीची तेजस्विता तुझ्यात आहे तुझा अबोला वाऱ्यात आहे वाऱ्याची दिशा तुझ्यात आहे तुझे अस्तित्व स्वप्न आहे माझे स्वप्न तुझ्यात आहे राजेंद्र देवी

खव्याचे काय करू?

लेखक इना यांनी गुरुवार, 13/10/2016 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे गाजर हलवा करायला आणलेला खवा शिल्लक आहे, तरी झटपट करता येतील अशा रेसिपी सूचवाव्यात अशी विनंती. बऱ्याचदा आपण एखादा पदार्थ करण्यासाठी काही विशिष्ट साहित्य आणतो पण ते पूर्ण वापरले जात नाही तर इतर कुणाला ह्या धाग्यावर असे प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावेत, इथल्या पाककलानिपुण सदस्यांच्या सूचनांचा माझ्यासारख्या नवशिक्या स्वैपाकघरात लुड़बुड करणाऱ्याना फायदा होईल आणि सामान वाया जाण्याचे दुःखही होणार नाही. धन्यवाद

अशी सजेल दिवाळी

लेखक नूतन यांनी बुधवार, 12/10/2016 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, श्री गणॆश चित्रमालॆनॆ माझ्या क्विलींग कलॆच्या आविष्काराचा श्रीगणॆशा कॆला. काही मिपाकरांनी पसंतीची दाद दिली. साहजिकच हुरूप यॆऊन माझा पुढील कलाविष्काराचा विषय काय असावा असॆ विचार मनात घॊळू लागलॆ. गणपती,नवरात्रा पाठॊपाठ वॆध लागतात तॆ दिवाळीचॆ.

अंधार्या रस्त्यावरची लिफ्ट

लेखक स्वीट टॉकर यांनी बुधवार, 12/10/2016 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू. दोन्हीकडच्या पावसांमध्ये मात्र दोन मोठे फरक आहेत. एक म्हणजे पावसाचं प्रमाण. मुंबईला प्रचंड पाऊस. संततधार लागायची. पुण्याचा पाऊस त्याच्या एक त्रितियांश. दुसरा फरक म्हणजे या पावसाचा विद्युतपुरवठ्यावर होणारा व्यस्त परिणाम. (मराठी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे inverse. हिंदी भाषेत ‘व्यस्त’ म्हणजे busy.