Skip to main content

आज तु आठवलीस...

लेखक Pradip kale यांनी गुरुवार, 13/04/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु आठवलीस आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले खंत यासाठी की, मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी भीती नव्हती बोलण्याची, हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही अन् आनंदाचे यासाठी की, आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस, ताल बिघडले मनाचे, हो तालचं बिघडले मनाचे कारण तु सुरचं घेऊन गेलीस आता आजही शोधत असतो फक्त तुला, कधी मोगर्याच्या गंधात कधी फुलांच्या पाकळ्यात कधी सागराच्या लाटेत कधी चंद्राच्या चांदण्यात तर कधी तार्यांच्या
काव्यरस

वेडे'कर'णारी बेडेकर मिसळ

लेखक सरनौबत यांनी गुरुवार, 13/04/2017 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील रविवार सकाळ. खरं तर ही वेळ म्हणजे 'सकाळ' च्या बातम्या वाचत (चितळे च्या दुधाचा) चहा पीत आता ब्रेकफास्ट ला रूपाली, गुडलक आणि बेडेकर ह्यापैकी कुठे जायचं हे ठरवण्याची वेळ. पण बायको सुद्धा बरोबर येणार असेल तर हा प्रश्न सहज सुटतो (तिच्या इच्छेनुसार जातो. सकाळी सकाळी वाद कशाला ?!) मित्राबरोबर जायचं असेल तर मग भरपूर चर्चा होऊन ठिकाण निश्चित होतं. गेली ४ वर्षे मस्कत ला नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने आता मात्र रविवार हा ऑफिस चा पहिला दिवस असतो (इकडे शुक्र -शनि वीकएंड!) पुण्यातील मित्रांच्या भाग्याचा हेवा करीत गप-गुमान ऑफिस ला जावं लागतं...

शब्दतुला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 13/04/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
बहरून येती अलगद कधी मनीचे भाव अनामिक निःशब्द होती ओठ कधी मौनाच्या लाख तर्‍हा मनपाखरू शोधत फिरते मौनाच्या अन शब्दकळा सगळेच कसे गं उलगडुनी सांगायाचे सांग तुला? कधी अचानक येई भरते झरतो हलके शब्दझरा हळवी होते कधी कविता बांध फोडुनी अस्तित्वाचा कधी घुटमळते ओठी, मौनाची होऊन चंद्रकला कधी मनाच्या उंबरठ्यावर झुलत राहते मौनझुला या डोळ्यातून स्वप्न तुझे हातात लाजरा हात तुझा क्षुब्धता कधी, कधी तृप्तता, आवेग अन मिलनाचा काय-काय अन कसे किती सांगायाचे सांग तुला? मन होई बावरे झुलताना स्वप्नांचा तो चांदणझुला तू लाजून हंसता गाली, जीव होतसे अधीर असा या जगण्याचे होते अत्तर मृदगंधही होतसे फिका मी सांगत फिरतो प
काव्यरस

मोह !

लेखक संजय क्षीरसागर यांनी बुधवार, 12/04/2017 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेट बँकींगमुळे हल्ली वर्षानुवर्ष बँकेत जायलाच लागत नाही पण काल एका पर्सनल कामासाठी जरा उशीरानं बँकेत गेलो. तिथे काम करणारी ऑफिसर ओळखीची आहे. कस्टमर्स नसल्यानं ती नेहेमीच्या सरावानं झपाझप काम उरकत होती. तेवढ्यात तिथल्या काचेच्या पार्टीशनवर लावलेल्या, सीसीटिवी इमेजसारख्या, एका फोटोकडे लक्ष गेलं.

नाही; माझा प्रॉब्लेमच आहे

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 11/04/2017 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा रोजची गर्दी, रोजचा प्रवास, कटकट करत मी ऑफिसला येतो कंपनी ची कॉन्फरन्स, गोव्याला जायचं, आनंदाचा माहोल असतो हो काय? मी साशंक होतो. कसला तरी विचार करतो आता मिळाला ना ब्रेक ! मग यावं नाही का आनंदाला उधाण! मी म्हणतो उलट इथे मात्र मनालाच कसलातरी ब्रेक लागतो नाही; माझा प्रॉब्लेमच आहे. कसं जायचं? विमानाने? की कोकण रेल्वेने? चर्चा चालू ए कॅमेरा आण हं... स्विमिंग कॉश्चूम आहे का एक्स्ट्रॉ? जुळवाजुळव चालू मी आजच स्टॉक आणतो आपला! बेत आखणं चालू सहकर्मचारी मित्र होतो आणि प्रत्येक जण जणु गोव्यात पोचतो आणि मी?

अंबरनाथ ते म्हसा ०९/०४/१७ सायकल भ्रमंती

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 11/04/2017 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलिंग च्या सुरवातीच्या दिवसांत , सायकल बदलण्यापुर्वी जीला अनेक वेळा त्रास देउन , अनेक चौकशा करुन भंडाउन सोडलं ती , सीएफयू( सी एफ यू= कॅम्प फायर अनलिमिटेड नावाचा व्हाटस App गृप) ची एक लेडी सायकलिस्ट नंदिनी जोशी (बदलापूर ) चा एक मेसेज होता सात / आठ तारखेला .. " या रवीवारी जर राईड करणार असाल तर मला कळवा " मला ही यायचय तुमच्याबरोबर. हा रवीवार मला ही मोकळा होता , कल्याण सायकलिस्ट ची राईड होती कल्याण ते व्हिवियाना मॉल ठाणे अशी .. म्हणजे सिमेंट च्या जंगलातुन सिमेंट च्या रस्त्याने सिमेंट च्या कोअर फॉरेस्ट मध्ये जायचे ते ही अनेक वाहन चालकांच्या रागाला तोंड देत .