बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे
'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे.
यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे.
मिसळपाव
नमस्कार मंडळी..
"BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल" बघण्याचा रविवारी योग आला. अचाट साहस आणि चिकाटीने पूर्ण केलेल्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांवरील शॉर्ट फिल्म्स दाखवल्या गेल्या.
आणखी फारसे वर्णन न करता सरळ फिल्म आणि त्यासंबंधी माहिती देतो.
तसेच, या धाग्यामध्ये खूप व्हिडीओ द्यावे लागणार आहेत - धागा लोड होण्यास वेळ लागू शकतो.