कथुकल्या १४ ( अंतिम भाग )
१ .गडदघटनांचे लिखित, छापील अवशेष
नियतीचे वर्तुळ
रेखा झपझप पावलं उचलत चालत होती. कामावर जायला फार उशीर झाला होता. आठ तेराची लोकल आज पुन्हा सुटणार होती. आजकाल कामावर जायला उशीर होणं रोजचंच झालं होतं. अलार्म वाजूनसुद्धा तिची बिछान्यातून बाहेर पडायची इच्छाच होत नसे. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नसे. ती सतत प्रदीपचाच विचार करी. तासंतास त्याचेच विचारचक डोक्यात फिरत राही. प्रदीपबरोबर आपण जसं वागलो त्याचे ती मनातल्या मनात सारखं समर्थन करण्याचा प्रयत्न करीत राही. आपलं वागणं चूक की बरोबर होतं याचा ती निर्णय करू शकत नव्हती.
रेखाचे वडील तीन वर्षांपूर्वीच एका खाजगी शाळेतून शिपाई म्हणून रिटायर झाले होते.
पारिजात मनातला
पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी .
पारिजातकाची अगदी पहिली आठवण खुप लहानपणीची आहे . वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही खूप घरं बदलली . त्या पैकी एका घराच्या अंगणातच खूप मोठं परिजातकाचं झाडं होतं . श्रावण महिन्यात ते बहरलं आणि रोज अंगणात फुलांचा सडा पडू लागला . आमची आजी देवभोळी होती . तिने प्राजक्ताचा लक्ष शंकराला वहाण्याचा संकल्प केला .
विस्थापन आणि अंतर _आवृत्ती २_वैशेषिक सूत्रातील संदर्भांसह (Displacement and Distance)
(आवृत्ती २: या आवृत्तीमध्ये प्राचीन भारतीय ग्रंथामधले संदर्भ कोणत्याही अभिनिवेशाशिवाय, योग्य तिथेच व तेवढेच देण्यात आले आहेत.)
फार दिवसांनी राजा विक्रम पुन्हा त्या झाडापाशी आला. वेताळ नाही असे त्याला वाटते न वाटते तोच त्याच्या पाठीवर वेताळ धपकन येऊन बसलाही. “हा, हा, हा...तुला मी गेलोय असं वाटलं काय? इतक्या लवकर नाही जाणार मी..बर आज इतका वेळ का लागला तुला? पटकन सांग नाहीतर तुझ्या तलवारीने तुझे मुंडकेच उडवितो बघ.”
राजा विक्रम वेताळाला घेउन चालू लागला व बोलू लागला” अहो वेताळ महाराज, आज माझ्या राज्यात मी एक स्पर्धा ठेवली होती.
चायना आणि चुंबी (२)
आधीचा भाग
वस्तुतः भारत-चीन संघर्षमय संबंधास आशियातील युरोपीयन वसाहतवादाचा इतिहासाचीही पार्श्वभूमी असावी हे सहसा आपल्याला माहित नसते. युरोपीयन वसाहतवादाच्या इतिहासाची आपल्याला माहित असलेली थोडक्यात उजळणी करावयाची झाली तर इ.स. १४९८ च्या सुमारास पोर्तुगीज वास्को द गामा पाय भारतीय किनार्यास टेकले १६०० च्या नंतर ब्रिटीशांनी आळस झटकून पोर्तुगीज, फ्रेंच, डच स्पर्धकांना मात देत व्यापारात आणि वसाहतवादात आघाडी घेतली. हा आपल्यासा माहित असलेला ढोबळ इतिहास, १५०० ला पोर्तुगीजांनी भारतास दर्शन दिले तर चिनी लोकांना १५५० मध्ये.
उगवता सूर्य आणि तो
उगवत्या सूर्याला पाहून तो छद्मीपणानं म्हणाला
तुझं उगवतं रूप फार फसवं आहे मित्रा
सकाळच्या किरणांना कोवळं म्हणण्यापेक्षा दुबळं म्हटलं पाहिजे
कारण मी तुझं हे शतकानुशतकाचं राहाट गाडगं पाहून कंटाळलोय
संध्याकाळी मावळताना हसलेलं आणि उगवताना वैतागलेलं पाहिलंय
तरीही तुझा उदयच लोकांना का आवडतो अस्त का नाही?
उगवत्याला दंडवत मावळत्याला का नाही?
सूर्य म्हणाला
ज्याच्याकडं काम असतं त्यालाच जग हात जोडते
काम संपत आलं की लगेच त्यालाच रद्दीत काढते
मग रक्त आटवलं तरी जग दखल घेत नाही
तुम्ही नष्ट झालात तरी जगाचं आडत नाही
कामाचा सूर्य थकल्यावर लोक पाठ फिरवतात
कामचुकारपणा जपण्यासाठी नव्या सूर्याला कवटाळतात
काव्यरस
भूमिपुत्र आणि काळी आई
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या
त्याच्या सुकल्या डोळ्यांनाही भिजवेल एवढं पाणी
त्याला द्यायला सरकार तयार नव्हतं
त्याला दिलेल्या अश्रूंचाही कोटा त्यानं खर्च केला होता
कधी मरणारं जित्राब पाहून
कधी सावकाराला जमीन विकून तर
कधी हातातोंडाशी आलेलं पिक अवकाळी पावसानं झोडपलेलं पाहून
अपयशाच्या पहिल्या पायरीवरच जगत
त्याच्या अनेक पिढ्या काळ्या मातीत मिसळल्या
पण त्या समिधांनीही भूदेवता प्रसन्न झाली नाही
की लक्ष्मी देवतेने भरभरूनवआशीर्वाद दिला नाही
सावकार रूपी लक्ष्मीपुत्रांच्या दावणीला मात्र त्याचं नशीब बांधलं गेलं ते कायमचंच
अंधार्या भविष्याच्या सात-बार्यावर मात्र
त्याच्या आर्त वेदनांचं गोंदण झालं
कधी भूमिही
काव्यरस
व्याकुळकथा
तो शुद्धीवर नव्हता तेव्हा
कोणीतरी त्याला नकळत जमिनीवर उतरवलं
आणि अनोळखी टापूमध्ये त्याची पावलं त्याच्या इच्छेविरूद्ध पडू लागली
आजुबाजूच्या अनोळखी लोकांनी त्याच्या रडण्याचा आनंद घेतला
तो ओळखीचा संकेत समजून
त्याने तो प्रदेश आपलाच असण्याचा समज करून घेतला
पहाटवेळच्या आश्वासक आवाजांतून आणि स्पर्शांतून
दररोजच्या सूर्योदयांच्या विभ्रमांतून
याच्याही डोळ्यांमधीळ काळ्या बाहुल्यांच्या पडद्याआडच्या मनात
काही इंद्रधनुष्यं दबा धरून बसली
सूर्य जसा जसा वर येऊ लागला
तसे पहाट स्वनांच्या इंद्रधनुष्यांमागे याची अबोध पावलं
प्रारब्धाच्या वार्याबरोबर अलगद पडू लागली आणि मोठी होऊ लागली
सूर्य माथ्यावरून जसा कलू लागला
काव्यरस
भरारी
..आणि त्याचं विमान त्या सवयीच्या झालेल्या रन-वे वरून
पुन्हा भरारी घेत उंचच उंच आकाशी झेपावलं
विमानाच्या वेगानं मन मात्र पुढं सरकायला तयारंच नव्हतं
त्याच्या उमलत्या काळाच्या आठवणी,
त्याच्या पावलांना चालतं करणारे आश्वासक हात
त्याच्या वेगाला मूकपणे वाखाणणारे डोळे
त्याच्या वेड्या साहसांनंतरही मायेने त्याचे अपराध पोटात घेणारी मनं..
त्याच्या इंद्रधनुष्याकडे जाणार्या रस्त्यावर ढगासारखी आड येत होती
तेवढ्यात सर्रदिशी वीज लखलखून त्याला भविष्यकाळ दाखवून गेली
मग त्यानंतर समुद्रात पाऊस पडला
सोडलेला देश अंधुकसा दिसू लागला
त्याला सूर्य दिसावा म्हणून त्याच्या देशानं स्वत:ला अंधारात ठेवणं पसंत केलं.
काव्यरस
मिसळपाव