Skip to main content

उदय कॉर्लिझम्सचा अंतिम भाग

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 30/09/2017 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग मायकलने जस्टिनचा हात धरून त्याला अंगणात आणले. अंगणातील एका लहानश्या कारंज्याशेजारी बसायची सोय होती. महत्वाच्या चर्चेसाठीची मायकलची ही आवडीची जागा होती. काही व्यवसाइकांनी मायकलसाठी पुरवलेले अंगरक्षक वगळता तिथे कुणीही नव्हते. जस्टिनने बोलायला सुरवात केली. " तू एवढा हरामखोर असशील याचा विचार मी कथी केलाच नव्हता. तूला त्या महापुरुषाची जागा घेताना तुझ्या गुन्ह्याचा कोणताही पुरावा मागे ठेवायचा नव्हता. त्यासाठी माझ्या आईला मारलस. मला तरी का मागे सोडलस? की मीच तुला महापुरुष आहे यामुळे घाबरलास मला मारायला ?

हे बहुरुपी

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 30/09/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हे बहुरुपी मृत्यो एकदाच सांग, थांबवून इथल्या समुद्राची गाज कोणतं रूप घेऊन घिरट्या घालतोयस आज? उघड्या मॅनहोल मधली जलसमाधी प्रलयी? की पुलावरच्या गर्दीची चिरडती घुसमटघाई? कळत नाही, दोष देऊ कुणा ? या बजबजपुरीचा बकालपणा ? की तुझा निरंतर मायावीपणा ?
काव्यरस

घराकडून घराकडे सायकल प्रवास एक स्वप्न पूर्ती भाग २

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी शनिवार, 30/09/2017 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
घराकडून घराकडे सायकल प्रवास.... एक स्वप्न पूर्ती! भाग २ Asmi@Khed खेड च्या घराच्या पुढील दारी अस्मिचा एक फोटो काढला. तेव्हढ्यात विलास आला ( खेड चे घर साफसुफ ठेवायचे काम गेली ९ वर्षे विलास करतोय) सध्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अगदी प्राथमिक सुविधा ही कशाबशा सुरु आहेत खेडच्या घरात. तरीही विलास व त्याच्या कुटुंबियांच्या प्रेमादरामुळे खेड चे अल्पसे वास्तव्य सुखावह झाले.

बघ तुला जमतं का ...

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 30/09/2017 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
बघ तुला जमतं का ... तू साबुदाण्याच्या खिचडीसाठी उपवास कर किंवा बटाट्याच्या चिप्स साठी मर्जी तुझी... उपवासाचे पुण्य नाही मिळाले तरी चालेल पण एकादशी दुप्पट खाशी हे नेहमी लक्षात ठेव..... तू जिम मध्ये रोज जा किंवा नको जाऊस इच्छा तुझी... तिथे वाकला, पळाला नाहीस तरी चालेल पण वजन उचलतानाचे फोटो शेअर करायला मात्र विसरू नकोस..... तू मित्र, नातेवाईक यांच्या बरोबर फेस-टू-फेस संवाद कर किंवा नको करूस युअर विश... पण फेसबुकवर स्टेटस अपडेट करायला मात्र विसरू नकोस..... तू सोशल गॅदरिंग्ज मध्ये सहभागी हो किंवा नको होऊस हक्क तुझा... पण सोशल मीडियावर लॉग-इन करायला मात्र विसरू नकोस.....

संघर्ष : भाग ०५ (अंतिम)

लेखक दिपक लोखंडे यांनी शनिवार, 30/09/2017 07:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ०४ पासून पुढे.. काही वेळानंतर.. (वेळ : संध्याकाळी ६ वा. स्थळ : जयसिंगपूर पुलिस स्टेशन.) सागरची मनस्थिती समजावता येण्या पलीकडची झाली होती. थरथरत्या हातांनी प्रिती आपले डोळे पुसत पोलिस स्टेशनच्या बाहेर उभी होती इन्स्पेक्टर राणे साठी स्थितीचा अंदाज लावणं खूपच कठीण झालं होतं अशी अचानक झालेली घटना त्यांना मुळीच अपेक्षित नव्हती. सगळेच शॉक मधे होते राणेंनी स्थितीचा अंदाज घेत विचारपूस करण्यासाठी कॉन्स्टेबलला सागरला आत बोलावण्यास सांगितलं.

तिन्ही सांजा.....

लेखक रुस्तुम यांनी शुक्रवार, 29/09/2017 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी हृदयगंधर्व हे पुस्तक वाचताना त्यातील स्वरोत्सव ह्या डॉक्टर लीना आगाशे ह्यांच्या लेखात, पंडितजींच्या एका वाक्याचा संदर्भ येतो, की त्यांना तिन्हीसांजा हे गाणं करताना त्यांना यमन राग पिवळसर रंगासारखा दिसू लागला होता. प्रत्येक राग हा कुठल्याही रंगात, कुठल्यातरी विशिष्ट रूपात त्यांना दिसतो. त्यांचं हे बोलणं ऐकून लेखिकेने स्वतःचा ह्या वाक्याशी संबंधित एक अनुभव मांडलाय. 'तिन्हीसांज ही माझी आवडती कविता आहे. आता त्या कवितेबरोबरच एक चित्र हि माझ्या मनात वास्तव्याला आलं. दिवस ढळलेला असावा. दूर क्षितिजावर संध्यकाळ मावळात असावी.

हिरवाईच्या गप्पा - भाग २

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 29/09/2017 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवाईच्या गप्पा - भाग १ हिरवाईच्या गप्पा - भाग १ बराच मोठा झाल्याने हा दुसरा भाग सुरू करत आहे. काही दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे मिरचीला नवीन फुलोरा सुरु झाला आहे.

परेल-एलफिंस्टनच्या निमित्ताने ....

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 29/09/2017 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज सकाळची बातमी आपल्या सगळ्यांनाच हलवून गेली आहे. २२ बळी! आणी अनेक जखमी. परेल-एलफिंस्टनचा ब्रिज म्हणजे साक्षात यमाने टाकलेला फासच होता आज. मुळात ही दोन्ही स्टेशन्स ब्रिटिशकालीन आहेत. सदर पूल हा सुद्धा खूप जुना आहे. या दोन्ही स्टेशनचा फलाट आपण बघितला तर तो आयलंड प्लॕटफाॕर्म आहे. ( परेल ला तर आहेच आहे) अशा परिस्थितीत दोन्ही फलाटांवर गाड्या आल्या तर पुलावर खूपच गर्दी होते. त्यात आज पाऊस होता. त्यामूळे लोकं पुलावरुन हललेच नाहीत. पुलाचा पत्रा तुटला. त्याचा मोठ्ठा आवाज झाला. आणी मग पळापळी सुरु झाली. त्यात लोकांचा चेंगरुन जीव गेला. रेल्वेचा हा गलथानपणा आहेच.

उदय कॉर्लिग्झम्सचा भाग ३

लेखक शब्दानुज यांनी शुक्रवार, 29/09/2017 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 (http://www.misalpav.com/node/40857) भाग 2 (http://www.misalpav.com/node/40953) आॉस्टिनामधली गुप्त बैठक संपवुन मायकल कॉर्लिगला परतला. नव्या धर्माची घोषणा करण्याआधीची संपुर्ण वातावरण निर्मीती झाली होती. ब-याच लोकांच्या मनात आपण कॉर्लिगचे पुरते तारणहार बनलो आहोत हे मायकलने चाचपुन पाहिले होते. मायकलला भेटणा-या लोकांचा अोघ वाढतच जात होता. व्यवसायिकांशिवाय सामान्य लोक येऊन आता मायकलला काहीतरी करण्यासाठी गळ घालत होते. एकंदरित मायकलच्या मनासारखे घडून येत होते.