राजांचे मावळे - 2
भाग पहिला
घोडखिंड : मल्हारी
मल्हारी सगळ्यांच्या पुढे होता कारण त्याला हा रस्ता तळहाताच्या फोडाप्रमाणे माहीत झाला होता. मुसळधार पाऊस आणि त्यामुळे झालेला गुढघाभर चिखल. आता ते सगळे एका छोट्या पठारावर पोचले होते. थोडाच वेळ का होईना पण ते सगळे उघड्यावर आले होते. न सांगताच मावळे राजांच्या आजूबाजूला पसरले. मल्हारी अजून पुढेच होता आणि त्याच्या मागेच राजे पळत होते. राजांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला प्रत्येकी 2 2 मावळे होते आणि मागे बाजी. पालखीवाले सगळ्यात मागे पडले होते ते आता हळू हळू अंतर कमी करत होते.
मिसळपाव