Skip to main content

उठ मावळ्या ...

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 22/11/2017 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात. उठ मावळ्या फोडू चल नळ्या कुकुटाची सर ना कधी पाचोळ्या चल मदिरालयी तु घुस ये सोडूनि घास फूस कोंबड्यासम केस रंगविसी कोंबडीस मग का तू वर्जिशी ६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस ये सोडूनि घास फूस वय का आपुले असे मोजिले चार पेग जर रिते तू केले यौवन भासेल तूस ये सोडूनि घास फूस

डेस्टिनेशन - देवभूमी अर्थात हिमाचल प्रदेश, मु.पो.सांगला, किन्नर कॅंप्स भाग १

लेखक मालविका यांनी बुधवार, 22/11/2017 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
फिरायला जायचं ठरवलं तेव्हा दोघांच्याही डोक्यात आणि मनात बरेच विचार होते . शांत पण निसर्गयरम्य ठिकाणी जायचं. अगदी जिथे वायफाय सोडा मोबाईलची रेंज सुद्धा नाही आली तरी चालेल. खूप गर्दी नको पण सुरक्षित सुद्धा हवं. काही वेगळं ट्राय करता आलं तरी हरकत नाही. तीच ती मोठाली हॉटेल्स , तेच ते खाणं या सर्वापासून काहीतरी वेगळं असं ठिकाण आम्ही शोधत होतो. सगळ्यांनी नेहमीची सगळी ठिकाण सांगून बघितली. कुणी केरळ ला जायचा सल्ला दिला तर कुणी शिमला मनाली सुचवलं. काहींनी परदेशात जायचा सल्ला दिला. यातील एकही ठिकाण आमच्या पसंतीस उतरत नव्हतं. कारण हि सगळी टिपिकल टुरिस्ट डेस्टिनेशन झालेली आहेत.

आता फक्त घासफूस ...

लेखक गबाळ्या यांनी बुधवार, 22/11/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून "आता फक्त घास फुस" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी. केल्या रित्या बाटल्या चकण्यांच्या ताटल्या पडे बिअरचाच पाऊस पण आता... आता फक्त घास फुस चापिल्या बोट्या फोडिल्या नळ्या ढेरी तुडुंब करी मन खुश पण आता... आता फक्त घास फुस दिन ते गेले वय ही झाले झाली शरीराची नासधूस अन आता ... आता फक्त घास फुस
काव्यरस

"शिवप्रभुंच्या अप्रतिम युद्धकौशल्याची गाथा सांगणारी डोंगरयात्रा..."

लेखक दिलीप वाटवे यांनी बुधवार, 22/11/2017 13:52 या दिवशी प्रकाशित केले.

शिवप्रभुंच्या अप्रतिम युद्धकौशल्याची गाथा सांगणारी डोंगरयात्रा...

शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।। शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी ।।

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी समर्थ रामदासांनी जे समर्पक उद्गार काढले आहेत, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी रविवारी २० अॉगस्टला "महाबळेश्वर ते प्रतापगड" अशी एक डोंगरयात्रा आयोजिली होती... निमित्त होतं शिवप्रभुंच्या अप्रतिम युद्धकौशल्याच्या आणि शौर्याच्या आठवणी जागवण्याचं.

एक सल नेहमीच - भावानुवाद

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 21/11/2017 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक सल नेहमीच एक दरवळ नेहमीच अंगावरून जातो डोळ्यांदेखत नेहमीच एक काठ नदीचा भरतो एक नाव नेहमीच किनाऱ्याशी थडकते एक रीत मला नेहमीच, लांबून खुणावते मी आहे तिथेच बसतो एक दृश्य नेहमीच, धूळीत साकार होते एक चंद्रही नेहमीच खिशात सापडतो धिटुकली खार झाडावर सूर्य गिळून घेते हे जग तेव्हा नेहमीच वाटाण्याएवढे भासते एका तळहातावर जणू अलगद मावते मी आहे तिथून उठतो एक रात्र नेहमीच, मुंगीच्या पावलांनी येते एक हसणे नेहमीच झुळूकीसारखे वाटते एक नजर नेहमीच उबदार कानटोपी चढवते एक गोष्ट नेहमीच पर्वतासारखी दिसते एक नीरवता नेहमीच मला गुंडाळून ठेवते मी जिथे असतो तिथून चालू लागतो एक सल नेहमीच, प्रवास होऊ

आर्य की याम्नाया-पशुपालक ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 21/11/2017 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
धागा लेखास कारण sciencenews.org या वेबसाईटवर, 'भटक्या आशियायी पशुपालकांचा ताम्रयुगीन (ब्राँझ एज) सांस्कृतीक घडणीवर प्रभाव कसा पडला असावा ?' अशा अर्थाचा एक लेख आला आहे. लेखास त्यांनी जनुकीय, पुरातत्वीय अनुवंशशास्त्र असा टॅग लावल्याचे दिसते.

भूनंदनवन काश्मीर – भाग ७ (मानसबल सरोवर – दल सरोवर)

लेखक के.के. यांनी मंगळवार, 21/11/2017 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
भूनंदनवन काश्मीर – भाग ७ (मानसबल सरोवर – दल सरोवर) ==================================== भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ भाग-५ भाग-६ ==================================== गान्देरबलहून आम्ही मानसबल सरोवर पहायला गेल

विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी मंगळवार, 21/11/2017 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही.

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 21/11/2017 05:22 या दिवशी प्रकाशित केले.
१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई
 

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

सुरमई एनपॅपिलो

लेखक मोदक यांनी मंगळवार, 21/11/2017 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस स्वयंपाकघरात हात साफ केला नव्हता म्हणून आणि शेफ केडी व जॅक ऑफ ऑल यांनी फोटो टाकून टाकून जळवले म्हणून एकदाची किचनमध्ये एंट्री मारलीच.. स्वतः मासे फ्राय करण्याची लज्जत मागच्या वर्षी अनुभवली होती म्हणून मासे हाच प्रकार निवडला आणि आमचे द्रोणाचार्य शेफ केडींना शरण जाऊन "माशांचा एखादा वेगळा प्रकार करायचा आहे. काय करू..?" असे विचारले. शेफ केडी यांनी "अरे बेटा.. दॅट्स व्हाय यू शूड कॉल मी..!!" असे बोलून चांगली व ताजी भाजी कुठे मिळेल, मासे कुठे मिळतील याची इत्यंभूत माहिती दिली.एनपॅपिलो या प्रकाराची ओळखही करून दिली.