Skip to main content

प्रिय वेगवान गोलंदाजास -

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शनिवार, 23/12/2017 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय वेगवान गोलंदाजास - हॉल लिलीचा वंश सांगसि, मुखी मार्शलची गाथा होल्डिंग गार्नरच्या पाईका तुजला काय जाहले आता? आठव वकार, आठव डोनाल्ड पुनःश्च अक्रम आठवूदे पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे|| कोण कोठला फलंदाज, अंगभर चिलखतसे लावितो शिरस्त्राण घालून उन्मादे पाय पुढे टाकितो | सुसाटणारा चेंडू तुझा पाय तयाचे जखडू दे पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे|| बॅटीच्या सोट्याच्या जीवे करतो बॅट्समन माज पण हत्तीवरही हल्ला चढवी तोच खरा वनराज | बाऊन्सरच्या मार्‍याने बॅट्समन पुन्हा एकदा विव्हळू दे पुन्हा एकदा तव वेगाने स्टंप धरित्रे उखडू दे|| प्रेक्षक असतिल त्यां बाजूनी - षटकार त्यांना

मजूर

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 23/12/2017 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

गडद

लेखक समयांत यांनी शनिवार, 23/12/2017 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गाला : निष्कारण एके ठिकाणी सुंदर फुले फुलवण्याची कला असते दूरवर निरंतर आवाजाचे निर्मम साज लावण्याची कला असते पसरलेल्या लाखो लाखो तारकांना दिशा देण्याची कला असते क्षणभर परिघापलीकडल्या काजव्यांना चमकवण्याची कला असते इतिहासातल्या पानांमध्ये संस्कृतींना गाडण्याची कला असते आपल्यासारखी त्याला मान्य-अमान्यतेची कसली सक्ती नसते

आपल्यातला कुणीही मी

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 22/12/2017 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यातला कुणीही मी कुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे.

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग १ - अंगकोर वाट

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शुक्रवार, 22/12/2017 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग १ - अंगकोर वाटचा शोध आणि इतिहास.

अंगकोर वाटचे विहंगम दृश्य. पश्चिम दिशा डावीकडे आणि उत्तर दिशा वर

अनवट किल्ले २५: धुळ्याचा शेजारी, लळींग ( Laling )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 22/12/2017 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात अनेक शहरांना किल्ल्यांची पाश्वर्भूमी लाभली आहे. अशाच अनेक शहरांपैकी एक शहर धुळे शहर आहे, अहिराणी ही या शहराची मुख्य भाषा आहे. या भागातील किल्ले फिरण्याची मजा काही औरच कारण दिवसा येथील तापमान ४० पर्यत जाते, तर रात्री तेच १० ते १२ पर्यंत खाली उतरते. येथील किल्ले फिरतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येथे झाडांचे प्रमाण फारच कमी आहे. मुंबई-आग्रा महामार्गाने धुळय़ाहून नाशिकच्या दिशेने जाऊ लागलो की, अदमासे दहा किलोमीटरवर एक डोंगररांग आडवी येते. या डोंगररांगेला छेदत हा महामार्ग वाहतो. खरे तर तो इतिहासकाळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली शहरांकडे धावतो आहे.

भाग ४: अनवट घाटवाटा, रतनगड-आजोबा परिसरातल्या

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 22/12/2017 14:48 या दिवशी प्रकाशित केले.

--भाग दुसरा--

"चिकणदरा, एक अपरिचित वाट रतनगडाची"

रतनगड पाहिला नाही असा ट्रेकर खरं म्हणजे क्वचितच सापडेल. अशा या ट्रेकर्सच्या आवडत्या रतनगडाला एकूण तीन दरवाजे आहेत. रतनवाडीकडील गणेश दरवाजा, साम्रदचा त्र्यंबक दरवाजा आणि कोकण बाजूकडे असल्यामुळे कोकण ऊर्फ कल्याण दरवाजा. गडावर असलेल्या राणीच्या हुड्यापासून डावीकडे जाऊ लागायचं. पुढे जाऊन उजव्या बाजूच्या टेकडीला वळसा घातला की नेढ्याकडे जाता येतं. आणखी थोडं पुढं गेलं की डाव्या हाताला भरभक्कम तटबंदीत बांधलेला एक दरवाजा दिसतो. त्याचं नाव कोकण उर्फ कल्याण दरवाजा. दरवाज्याच्या बाहेर खोल दरी आहे जिथून खाली उतरण्याची वाटच दिसत नाही.

भाग ३: अनवट घाटवाटा, रतनगड-आजोबा परिसरातल्या

लेखक दिलीप वाटवे यांनी शुक्रवार, 22/12/2017 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
-- भाग पहिला -- "पाथरा घाट, आजोबा आणि गुयरीदार घाट" --दिवस तिसरा-- आजचा टप्पा कालच्या एवढा अवघड काही नव्हता. एकतर गुयरीदार घाट सोप्या प्रकारातला होता आणि तो उतरायचा होता. त्यामुळे सकाळी थोडं आरामातच आवरलं. समोरच कात्राबाईचा डोंगर दिसत होता. त्याच्या उजव्या बाजूला कुमशेतचा कोंबडा आणि या दोन्हीच्या मधे कात्राबाईची खिंड जाणवत होती. कोंबड्याच्या जवळच सुर्योदय होत होता. . सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्‍यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते.

एका अनावर कैफात

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 22/12/2017 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
एका अनावर कैफात लिहिली होती ती कविता नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत? मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली तेव्हा थोडी भुंडी पण थोडी खरीही वाटली ती कविता नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत? मग कापलं सपासप - वायफळ शब्दतण तेव्हा जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा जास्तच खरी वाटली ती कविता नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ? मग खोडायला गेलो दोन चार ओळी तेव्हा ओळीतल्या रिकाम्या जागेतून सण्णकन फणा काढत जिव्हारी डसली ती कविता
काव्यरस

द डेक्कन क्लिफहँगर - चेकर्ड फ्लॅग..!!!!!

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 22/12/2017 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
द डेक्कन क्लिफहँगर..!! द डेक्कन क्लिफहँगर - रेस डे.. ************ देशपांडे मामा.. .

सुमित

यथावकाश निपाणी सोडले आणि मामांनी येणाऱ्या तवंदी घाटाचं शिवधनुष्य पेललं! पुढचा हा टप्पा खरंच फार कठीण होता. मामांच्या वाटेला फार कठीण आणि लांब लांब चढ आले. मामांनी बहुधा एकच बॉटल सोबत घेतली असावी. त्यांची ती बॉटल संपली आणि त्यांनी पाणी मागितलं. रात्रीच्या वेळी चालू कार रायडरला काही देऊ शकत नाही असा नियम होता.